पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५८) केशव (दुसरा). प्रख्यात ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याचा हा पिता होय. हा स्वतः मोठा विद्वान् होता. पुत्र गणेश दैवज्ञ याचें ग्रहगणितविषयांत याजवर वर्चस्व झालें हैं" सर्वत्र विजयं चेच्छेत् शिष्यादिच्छेत्पराजयं" या न्यायाने केशवास मोठे भूषणच होय. केशव स्वतः विद्वान् नसता तर त्याचा पुत्र इतक्या योग्यतेचा झाला नसता हे उवड आहे. ग्रहकौतुक ह्मणून याचा एक करणग्रंथ आहे. त्यांत आरंभवर्ष शक १४१८ आहे. यावरून त्या सुमारास हा होता. मुहूर्ततत्त्व ग्रंथांत शेवटीं तो ह्मणतो. ......गुरुवैजनाथचरणद्वंद्वे रतः केशवः ॥ नंदिग्रामगतः सुतस्तु कमलज्योतिर्विदग्र्यस्य... ॥ याजवरील टीकेंत त्याचा पुत्र गणेश दैवज्ञ ह्मणतो,–“ नंदिग्रामगतः अपगंतदेशे पश्चिमसमुद्रस्य पूर्वतीरस्थितो नदिग्रामः प्रसिद्धस्तत्रगतः निवासीत्यर्थः" यावरून याच्या पित्याचें नांव कमलाकर होते; तोही मोठा ज्योतिषी होता; केशवाने अध्ययन वैजनाथ याजपाशीं केलें; आणि कोकणांत समुद्रतीरी नांदिग्राम गांवी हा राहणारा होता. सांप्रत जंजिरा संस्थानांत हा गांव आहे, त्यास नांदगांव म्हणतात. हा मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २० कोश आहे. गणेश दैवज्ञाने दिलेल्या आपल्या वृत्तावरून यांचे गोत्र कौशिक होते; आणि केशवाच्या पत्नीचें नांव लक्ष्मी होतें. केशव आणि गणेश यांचे हे वंशवृत्त त्यांच्या इतर ग्रंथांतही आहे. केशवाने केलेले ग्रंथ गणेश दैवज्ञाने मुहूर्ततत्त्वटीकेंत असे सांगितले आहेतः सोपायं ग्रहकौतुकं खगकृति तचालनाख्यं तिथेः ग्रंथ. सिद्धि जातकपद्धति सविवृति तायके पद्धति ॥ सिद्धांतेप्युपपत्तिपाठनिचयं मौहूर्ततत्वाभिधं कायस्थादिजधर्मपद्धतिमुखं श्रीकेशवार्योंकरोत् ॥ त्याच टीकेंत गणेश दैवज्ञ पुनः लिहितोः-. ग्रहकौतुकतट्टीकावर्षग्रहसिद्धितिथिसिद्धिग्रहचालनगणितदीपिकाजातकपद्धतितट्टीकाताजिकपद्धतिसिद्धांतपाठकायस्थाद्याचारपद्धतिकुंडाष्टलक्षणादिग्रंथजातनिबंधानंतरमहं केशवो मुहूर्ततत्त्वं वक्ष्ये. हे गद्य स्पष्टच आहे. यांतील जातकपद्धति आणि ताजकपद्धति हे ग्रंथ सांप्रत प्रसिद्ध आहेत. ते केशवी याच नावाखाली मोडतात आणि त्यांचा उपयोगही पु. कळ ज्योतिषी करितात. दोन्ही ग्रंथ छापले आहेत. मुहूर्ततत्त्व हाही ग्रंथ छापला आहे. शक १४९३ मध्ये देवगिरी (दौलताबाद ) जवळ झालेल्या मुहूर्तमार्तड ग्रंथांत केशवी जातकपद्धतीचा उल्लेख आहे. आणि शक १५२५ मध्ये काशी एथे झालेल्या रंगनाथकृत सूर्यसिद्धांतटीकेंत मुहूर्ततत्त्वाचा उल्लेख आहे. यावरून हे ग्रंथ केशवानंतर लवकरच ह्या देशांत पुष्कळ पसरले होते असे दिसून येतें. केशवाचे गणितग्रंथ त्याच्या पुत्राच्या ग्रंथांमुळे मागे पडले असे दिसते; परंतु वे धासंबंधे केशवाची योग्यता फार मोठी आहे. याच्यासारखे ज्योध तिषी आपल्या देशांत फार थोडे झाले. ग्रहकौतुकावरील स्वरुत मिताक्षराटीकेत तो ह्मणतो: