पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६०) सारणी), इत्यादि ग्रंथ गणेश दैवज्ञानें केले. विवाहवृंदावनटीकेंत गणेशानेही आपण केलेले कांहीं ग्रंथ सांगितले आहेत ते असे. कृत्वादौ ग्रहलाघवाख्यकरणं तिथ्यादिसिद्धिद्वयं ॥ श्लोकः श्राद्धविधि सवासनतया लीलावतीव्याकृति ॥ सप्रक्षेपमुहूर्ततत्वाविवात पर्वादिसनिर्णयं ॥ तस्मान्मंगलनिर्णयाद्यथ कृता वैवाहसद्दीपका ॥ यांन वरीलपेक्षां एक पर्वनिर्णय ग्रंथ जास्त आहे. हे ग्रंथ कालानुक्रमें सांगितले असतील असें नाही. परंतु त्यांत ग्रहलाघव प्रथम केला असे दिसते. त्यांत ग्रहारंभवर्ष शक १४४२ आहे. या वेळी तो निदान २०१२२ वर्षांचा असला पाहिजे. ह्मणजे त्याचा जन्मकाल सुमारे शके १४२० असावा. लघुचिंतामणि ग्रंथ शक १४४७ मधील आहे. लीलावतीटीका शके १४६७ मधील आहे. पातसारणीवरून पाहतां तो ग्रंथ शके १४६० च्या पुढे केव्हां तरी रचला होता असे दिसते. विकाल. वाहवंदावनटीकेची एक छापलेली प्रत मी पाहिली, तींत टीकाकाल मोठ्या चमत्कारिक रीतीने दिला आहे. तो असाः हायनार्क १२ लवतुल्यमायनं तद्युतीरस ६ युता युतिर्भवेत् ॥ सापि सागर ४ युतोडुपोद्रुकं तत्रिनेत्र २३ लव एव पक्षकः ॥१॥ पक्षः सपक्षो २ यदि वासरः स्यात् तदीयरामां ३ शसमस्तिथिः स्यात् ॥ यचाखिलैक्यं कुयमा २१ हतं तत् नंदा ९धिकं मत्शकवत्सराः स्युः ।। तदयनतिथिपक्षास्तुल्यतां यांति यस्मिन् ......... । यावरून असे निष्पन्न होते की, शक १५०० बहुधान्य संवत्सर उदगयन माघ शुक्ल १ भौमवार, धनिष्ठा नक्षत्र, परिषयोग, या दिवशी टीका समाप्त झाली. शके १५०० माघ शुक्ल १चे गणित करून पाहतां वार, नक्षत्र, योग, बरोबर मिळतात. गणेशळत विवाहवृंदावनटीकेचा काल हाच असेल तर त्या काली त्याचे वय सुमारे ८० वर्षांचे होते. १६ व्या वर्षी त्याने ग्रहलाघव केला असे मानले तरी ७५ वर्षांचे वय येतेच. हे असंभवनीय नाही. तरी विवाहवृंदावनटीकेची एक लेखी प्रत मला माझा गांव कोंकणांत दापोली तालुक्यांतील मुरूड एथे रघुनाथ जोशी यांजकडे आढळली, तींत एका साध्या श्लोकांत 'रसनगमनुतुल्ये शाक आनंदवर्षे (शक १४७६ आनंद संवत्सरी) टीका केली असें ह्मटले आहे हे विश्वसनीय दिसते. 'हायनार्क' हा श्लोक दुसऱ्या कोणाचा असावा. ग्रहलाघव ग्रंथांत आरंभवर्ष शक १४४२ आहे. क्षेपक दिले अहेत, ते शक ग्रहलायव १४४१ अमान्त फाल्गुन कृष्ण ३० सोमवार (ता.१९ मार्च सन १५२०)या दिवशींचे सूर्योदयींचे आहेत.ते असेःरा. अं. क. रा. अं. क. १११९ ४१ बुधशीघ्रकेंद८ २९ ३३ चंद्र ११ १९ ६ गुरु ७२ १६ चंद्रोच्च शुक्रशीघ्रकेंद्र ७ २०९ राहु शनि ९ १५ २१ मंगळ १०७८ *संव. अयन योग नक्षत्र पक्ष वासर तिथि मास (१२+ १+ १९ +३+१+३+१+११)X२१+९%१५०० रवि