पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

याने त्रिप्रश्नाध्यायांत बराच विस्तार केला आहे. त्याची ८७ पये आहेत त्यांत काही प्रश्नही आहेत. प्रश्नांत ५ पलभा बरेच वेळा आली आहे. प्रथमार्थ सिद्धांतांत नक्षत्रभोग नाहींत. करणप्रकाशयंथ आर्यपक्षाचा, त्यांतही नक्षत्रभोग नाहीत. परंतु दामोदराने जे दिले आहेत ते इतर सर्व ग्रंथांहून काहीसे भिन्न आहेत. यावरून यासंबंधे त्याचा स्वतंत्र शोध दिसून येतो. यासंबंधे थोडे जास्त विवेचन पुढे नक्षत्रयुत्यधिकारांत करूं. मकरंद. मकरंद हा पंचांगसाधन फार सुलभ रीतीनं करितां येण्यासारखा सारिणीग्रंथ आहे. तो मकरंद नांवाच्याच ज्योतिषाने केला आहे. आरंभी तो ह्मणतो श्रीसूयसिद्धांतमतेन सम्यग्विश्वोपकाराय गुरुप्रसादात् ॥ तिथ्यादिपत्रं वितनोति काश्यामानंदकंदो मकरंदनामा ॥ १॥ यावरून सूर्यसिद्धांतानुसार हा ग्रंथ केलेला आहेआणि ग्रंथकार काशी एथे राहणारा होता. तिथ्यादघटपिलें या ग्रंथावरून निघतात, ती मुख्यतः काशीची निघतात. यांत सूर्यसिद्धांत मटला आहे तो सांप्रतचा सूर्यसिद्धांत होय असें उपपत्तीवरून दिसते. काशी एथे छापलेल्या पुस्तकांत ग्रंथारंभी शक १४०० होता असे लिहिले आहे. त्याबद्दल दुसरें अंत:प्रमाण नाहीं, व बाह्यप्रमाण मला आढळले नाही. तथापि तो शक खोटा ह्मणण्यास काही कारण नाही. यावर दिवाकराची टीका मकरंदविवरण नांवाची श. १५४० च्या सुमारास केलेली आहे. या ग्रंथावरून तिथ्यादिकांची घटपिळे आणि सर्व ग्रह अल्पश्रमाने निघतात. विस्तरभयास्तव यांतील पद्धति एथे सांगत नाही. सांप्रत उत्तरहिंदुस्थानांत काशी, ग्वाल्हेर वगैरे बऱ्याच प्रदेशांत या ग्रंथावरून पंचांगें करितात. ती तद्देशीय लोकांत चालतात. हा ग्रंथ काशी एथे छापलेला आहे. गोकुलनाथ दैवज्ञाने शक १६८८ मध्ये यांतील सारण्यांची उपपत्ति लिहिली आहे तीही छापली आहे. मकरंदकाराने सूर्यसिद्धांतास बीजसंस्कार दिला आहे, त्याविषयी पूर्वी लिहिलेंच आहे. केशव. ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याने विवाहवृंदावननामक ग्रंथावर टीका केली आहे, तो ग्रंथ केशवाचा आहे. याच केशवाने करणकंठीरवनामक ग्रंथ केला आहे असें गणेश ह्मणतो. हा अर्थात् करणग्रंथ असला पाहिजे. तो मला कोठे आढळला नाही. हा केशव भारद्वाजगोत्री औदीच्य ब्राह्मण होता. ह्याचा पिता इत्यादि त्रयीची नर्वि क्रमाने राणग, श्रियादित्य आणि जनार्दन अशी होती. ग्रहलाघवकार गणेशाचा पिता केशव ह्याहून हा केशव प्राचीन असला पाहिजे. रामकृत विवाहपटलाच्या शके १४४६ च्या निर्णयामृतटीकैत विवाहवृंदावन ग्रंथाचा उल्लेख आहे. यावरून या केशवाचा काल शक १४०० हून अर्वाचीन नसावा. विवाहवृंदावन ग्रंथ प्रसिद्ध आहे. तो हल्ली छापला आहे. त्यावर आणखी कल्याणवर्मकृत टीका आहे असें आफ्रेचसूचीत आहे.