पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दामोदरः श्रीगुरुपद्मनाभपदारविदं शिरसा प्रणम्य ।। प्रत्यब्दशुध्यार्यभटस्यतुल्यं विदां मुदेहं करणं करोमि ॥ २ ॥ मध्यमाधिकार. श्रीनर्मदादेवसुतस्य मत्पितः श्रीपद्मनाभस्य समस्य भावतः ।। यस्मात् सुसंपनमनुग्रहात् गुरो यादिहैतत्पठनात् प्रदं श्रियः ॥ १६ ॥ सच्छिष्यैरसकृत् कृतप्रणतिभिः संप्रार्थितो बीजवित् वत्क्रांभोजरविश्वकार करणं दामोदरः सत्कृती ॥ १९ ॥ उपसंहार. यावरून दामोदराच्या पित्याचें नांव पद्मनाभ होते आणि त्याचा गुरु तोच होता; तसेच त्याच्या आजाचें नांव नर्मदादेव होते; असे या श्लोकावरून निष्पन्न होतं. ध्रुवभ्रमयंत्रग्रंथ वर सांगितला त्यांत आरंभी ग्रंथकार ह्मणतो. श्रीनर्मदानुग्रहलब्धजन्मनः पादारविंदं जनकस्य सद्गुरोः नत्वा त्रियामासमयादिबोधकं ध्रुवभ्रमं यंत्रवरं ब्रवीम्यथ ॥ १ ॥ आणि त्यांत शेवटी झटले आहे. इति श्री नार्मदात्मजश्रीपद्मनाभविरचितयंत्ररत्नावल्यां स्वविवृतौ ध्रुवभ्रमणाधिकारो द्वितीयः ।। यावरून या पद्मनाभाचा पिता नार्मद होता. आणि यावरून निःसंशय वाटते की हा पद्मनाभ दामोदराचा पिता होय. दामोदराचा ग्रंथ शके १३३९ मधील आहे. तेव्हां दर पिढीस २० वर्षे धरली तर पद्मनाभाचा सुमारे शके १३२० मधील असावा. शके १४६० च्या सुमारे झालेल्या जातकाभरण नामक ग्रंथांत (पुढे जातकस्कंध पहा) ध्रुवभ्रमयंत्राचा उल्लेख आहे. त्यावरून वरील ह्मणण्यास बळकटीच येते. रंगनाथाने ज्या नार्मदाचा श्लोक दिला आहे (पृ. १८३ पहा), तोच पद्मनाभाचा पिता असें वरील श्लोकावरून निःसंशय सिद्ध होते असें नाहीं, तरी नामसादृश्य आहेपद्मनाभाचा पिता नार्मद विद्वान होता आणि तोच त्याचा गुरु होता असें पद्मनाभ ह्मणतो, यावरून तो ग्रंथकार असणे संभवतें. रंगनाथाने सांगितलेला नार्मद अर्थात् रंगनाथाच्या (शके १५२५) पूर्वी असला पाहिजे; तेव्हां या गोष्टीनेही विरोध येत नाहीं; आणि सर्वांत महत्वाची गोष्ट अशी की दामोदराने भटतुल्य ग्रंथांत अयनगति वर्षास ५४ विकला घेतली आहे. ही सूर्यसिद्धांतांतली आहे. आतापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही पौरुष ग्रंथकाराने इतकी गति घेतली नसून दामोदराने घेतली यावरून याचा आजा जो नार्मद तोच मूर्यसिद्धांतटीकाकार असला पाहिजे असें निःसंशय दिसून येते. त्याच्या टीकेचा काल शके १३०० असावा. भटतुल्यग्रंथांत क्षेपक शके १३३९ मध्यममेषसंक्रमणकालाचे आहेत. ते प्रथमायसिद्धांतास लल्लोक्त संस्कार देऊन मिळतात. मंदोच्चे आणि पात प्रथमार्यसिद्धांताप्रमाणे आहेत. याने अयन गति ५४ विकला आणि अयनांश शून्य शके ३४२ मध्ये मानले आहेत. याविषयी जास्तविवेचन पुढे येईल. या ग्रंथांत मध्यम, स्फुटीकरण, पंचतारास्फुटीकरण, त्रिप्रश्न, चंद्रग्रहण, उदयास्त, ग्रहयुति असे ८ अधिकार आहेत. यांत निरनिराळ्या वृत्तांची २२२ पर्ये आहेत. अनुष्टुपछंदाने त्यांची संख्या ४०० असें ग्रंथकाराने शेवटी सांगितले आहे.