पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशुद्धच आहत. त्यावरून महादेव हा गौतमगोत्री ब्राह्मण होता व त्याच्या बापाचें नांव पद्मनाभ व आजाचे माधव होते असे समजतें. जातकसार म्हणून एक जुनें संस्कृत आणि गुजराथी भाषांत लिहिलेले पुस्तक मला आढळले, त्यांत महादेवी सारणीवरून ग्रहसाधन करण्यास सांगितले आहे. महादेवी सारणीचे डे० कालेजांतील पुस्तक अमदाबाद एथे मिळाले आहे. टीकाकारही गुर्जर देशच्या समीपचा आहे. आणि स्वतः महादेवाने चरसाधनार्थ पलभा ४॥ घेतली आहे. यावरून तो गुजराथेत सुरतेजवळ राहणारा असावा, आणि गुजराथेंत हा ग्रंथ बराच काल प्रचारात असावा असे दिसते. या ग्रंथांत सुमारे ४३ पये आहेत. त्यांत मध्यम ग्रह आणि स्पष्ट ग्रह यांचे मात्र विषय. साधन आहे. क्षेपक मध्यममेषसंक्रमणकालचे आहेत, आणि वर्षगणावरून मध्यम ग्रहसाधन करण्यास सारण्या आहेत. यामुळे गणित करण्यास फार सोईचे आहे. ग्रहगतिस्थिति दिल्या आहेत त्या राजमृगांकोतबीजसंस्कृतब्रह्मसिद्धांततुल्य आहेत. टीकाकाराने आपला वृतांत शेवटीं दिला आहे त्यांतील थोडा एथे देतो. टीका वर्षेनेत्रनवांगभू १६९२ परािमते ज्येष्ठस्य पक्षे सिते टम्यां सद्गुण पृथक्यमनरय (?) पद्मावतीपत्तने ॥ राजायत्करवैरिनागदमनो राठोडवंशोद्भवः । श्रीमान् श्रीगजसिंहभूपतिवरोस्ति श्रीमरोमंडले ॥ जैने शासन एवमंचलगणे...॥ यावरून हा टीकाकार जैन होता. त्याने आपलें नांव धनराज असे दिले आहे. टीकेंत देशांतरसाधन सिरोहीचें केलें आहे ( उज्जनीच्या पश्चिमेस ३० योजनें): त्यावरून तो तेथील राहणारा होता असे दिसून येते. टीकेचें नांव महादेवीदीपिका आहे. टीकासंख्या १५०० सांगितली आहे. वरील श्लोकांतील १६९२ हा विक्रमसंवत आहे; म्हणजे शक १५५७ हा टीकाकाल होय. नार्मद. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतावर टीका किंवा त्याच्या आधारे रचलेला कांहीं ग्रंथ नामंदाचा असावा असें सूर्यसिद्धांतविचारांत लिहिलेच आहे (पृ. १८३). त्या नार्मदाचा काल शके १३०० असावा. याविषयी विवेचन पुढे दामोदरीयभटतुल्यविवेचनांत केले आहे. ती टीका किंवा तो ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाही. पद्मनाभ. हा वरील नार्मदाचा पुत्र होय. याचा काल सुमारे १३२० आहे. याविषयी विवचन पुढच्याच सदरांत केले आहे. याचा यंत्ररत्नावलि ह्मणून एक ग्रंथ आहे त्याचा दुसरा अध्याय धुवभ्रमयंत्र ह्मणून मजपाशी आहे. त्याजवर त्याची स्वताचीच टीका आहे. या ग्रंथाचे विवेचन पुढे यंत्रप्रकरणांत येईल. दामोदर. दामोदराचा भटतुल्य ह्मणून एक ग्रंथ आहे. त्यांत आरंभवर्ष शके १३३९ आ. है, ग्रंथकार ह्मणतोः--