पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५४ ) ग्रंथांत मला आढळला. व डे. का. संग्रहांत भास्करविवाहपटल म्हणून लहानसा एक ग्रंथ आहे. त्यांत ग्रंथकाराची माहिती नांवावांचून कांहीं नाहीं. तरी भास्कराचार्याचा विवाहपटलनामक एक ग्रंथ असावा असे दिसते. अनंतदेव. हा भास्कराचार्याच्या वंशांतला होय. ह्याचा शके ११४४ चा शिलालेख बहाळ एथे असलेला वर सांगितला (पृ. २४८), त्यांत याने ब्रह्मगुप्ताच्या सिद्धांतांतील छंदश्चित्युत्तर या (२० व्या ) अध्यायावर आणि बृहज्जातकावर टीका केली असे लिहिले आहे. आदित्यप्रतापसिद्धांत. श्रीपतिकत रत्नमालेवरील महादेवी टीकेंत या सिद्धांतांतील काही वाक्ये दिली आहेत. महादेवटीका शके ११८५ मधील आहे. तेव्हां हा सिद्धांत त्यापूर्वीचा असला पाहिजे. हा भोजराजकृत आहे असें आफ्रेचसूचीत आहे. हे खरे असेल तर तो शक ९६४ च्या सुमाराचा आहे. वाविलालकोच्चन्ना. तैलंगणांतल्या वाविलाल कोच्चन्ना नामक ज्योतिष्याने केलेला एक करणग्रंथ आहे. तो शके १२२० या वर्षांचा आहे. आणि त्यांतले क्षेपक फाल्गुन कृष्ण ३० गुरुवार शके १२१९ या दिवशींचे दोनप्रहरचे आहेत. वर्तमानसूर्यसिद्धांतावरून या वेळचे ग्रह मी करून पाहिले, ते त्या क्षेपकांशी पूर्णपणे मिळतात. यावरून तो ग्रंथ वर्तमानमूर्यसिद्धांतावरून केलेला आहे हे उघड आहे. मकरंदादि ग्रंथांत सूर्यसिद्धांताला जो बीजसंस्कार दिला आहे तो वाविलालच्या ग्रंथांत नाही. वारन नामक एका मद्रासेकडील युरोपियनाने इ. स. १८२५ मध्ये कालसंकलित या नांवाचा इंग्रजी ग्रंथ केला आहे, त्यांत हा करणग्रंथ बहुतेक दिला आहे; व त्याविषयी काही माहिती दिली आहे. तीवरून तो ग्रंथ अद्यापि तैलंगणांत चालतो, व त्यावरून पंचांग करितात, असे दिसते. त्या पंचांगास सिद्धांतचांद्रपंचांग असें ह्मणतात. ग्रहसिद्धि. हा एक करणग्रंथ आहे. यास महादेवी सारणी असेंही नांव आहे. यांत आरम शक १२३८ आहे. यावरून त्या सुमारास हा झाला. प्रथमच ग्रंथकार ह्मणतोः-- चक्रेश्वराब्धनभश्चराशुसिद्धिं महादेव ऋषींश्च नत्वा ॥ १ ॥ यावरून चक्रेश्वर नामक कोणी ज्योतिष्यानें आरंभून अर्धवट राहिलेला ग्रंथ महादेवानें पूर्ण केला असे दिसते. याजवर धनराजरुत वृत्तांत. टीका आहे. मूलांत शेवटी ४ पद्यांत महादेवाने आपला कुलवृत्तांत दिला होता. परंतु ती फार अशुद्ध म्हणून टीकाकाराने त्यावर टीका केली नाही. ह्या टीकेची एक प्रत डे. का. संग्रहांत आहे. आनंदाश्रमांत ह्या ग्रंथाची टीकाविरहित प्रत आहे (नंबर २०८५). तीत ते श्लोक आहेत. ते