पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५३) टीका आहे. ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याचा प्रपौत्र गणेश याची शिरोमणिप्रकाश नामक टीका सुमारे शक १५०० ची आहे. गोलग्रामस्थ नृसिंह याची वासनाकल्पलता अथवा वासनावार्तिक नांवाची टीका शक १५४३ ची आहे. मुनीश्वर अथवा विश्वरूप याची मरीचि या नांवाची टीका फारच विस्तृत व उत्कृष्ट आहे. ती शके १५५७ ची आहे. तसेच सिद्धांतसूर्योदय नामक टीका भैरवात्मज रघुनाथानुज गोपीनाथ याची शक १४५० नंतरची आहे. सगळ्या सिद्धांतशिरोमणीवरील टीका अशाः-ज्ञानराजपुत्र सूर्यदास याची चारही खंडांवर सूर्यप्रकाश नामक टीका आहे. तीत लीलावती आणि बीज यांवरील टीका शक १४६० ची आहे. प्रथमार्यभटटीकाकार परमादीश्वर याने भास्करग्रंथावर सिद्धांतदीपिकानामक टीका केल्याचे लिहिले आहे. ती चारही अध्यायांवर आहे असे दिसते. गोलग्रामस्थ नृसिंहपुत्र रंगनाथ याची मितभाषिणी नांवाची टीका आहे; ती शके १५८० नंतर लवकरच झालेली आहे. आफ्रेचसूचीत सिद्धांतशिरोमणीच्या आणखी टीका सांगितल्या आहेत त्या अशाः-वाचस्पतिपुत्र लक्ष्मीदास याची गणिततत्वचिंतामाणि टीका, इ. स. १५०१%; विश्वनाथी उदाहरण; आणि राजगिरिप्रवासी, चक्रचूडामणि, जयलक्ष्मण किंवा जयलक्ष्मी, महेश्वर, मोहनदास, लक्ष्मीनाथ, वाचस्पतिमित्र (?), हरिहर, यांच्या टीका. यांतल्या बहुतेक टीका ग्रहगणिताध्याय आणि गोलाध्याय यांवर मात्र असतील असे दिसते. करणकुतूहलावर सोढल नार्मदात्मज पद्मनाभ, शंकर कवि, यांच्या टीका आहेत. त्यांत शेवटील टीकेंत उदाहरणार्थ शक १५४१ घेतला आहे. शके १४८२ ची एक टीका आहे, तींत उदाहरण आहे. तो टीकाकार उन्नतदुर्ग एथील राहणारा होता. त्या स्थलाची पलभा ४।४८ आणि देशांतर ६० योजनें पश्चिम आहे. आफ्रेचसूचीत आणखी टीका आहेत त्याः-केशवार्ककृत ब्रह्मतुल्य गणितसार; हर्षगणिकृत गणककुमुदकौमुदी, विश्वनाथी उदाहरण, आणि एकनाथकृत टीका. आणखीही अनेक टीका भास्करग्रंथांवर असतील.* शके १५०९ मध्ये लीलावतीचे भाषांतर पर्शिअन भाषेत झाले आहे. तसेंच बीजाचे शक १५९७ मध्ये झाले आहे. इ. स. १८१७ मध्ये कोलबूकनें लीलावती आणि बीजगणित यांचे इंग्रजी भाषांतर करून छापले आहे. इ० स० १८६१ मध्ये बिब्लिओथिका इंडिकामध्ये पंडित बापदेव यांनी केलेलें गोलाध्यायाचें इंग्रजी भाषांतर छापलें आहे. त्यांत पुष्कळ टीपाही आहेत. शिरोमणीचे सर्वखंड आणि करणकुतूहल हे ग्रंथ हल्ली आमच्या देशांत अनेक ठिकाणी छापले आहेत. रत्नमालाटीकाकार माधव (शके ११८५) यानें व इतर ग्रंथकारांनी भास्करव्यवहार म्हणून एक मुहूर्तग्रंथ सांगितला आहे. तो भास्कराचार्याचाच असावा. रामरुत विवाहपटलटीकेंत (श०१४४६) भास्कराचा एक श्लोक विवाहसंबंधे दिला आहे. भास्कररुत विवाहपटल ग्रंथाचा उल्लेख शामय विवाहपटलांत व दुसऱ्याही एकदोन

  • वर लिहिलेल्या कांहीं टीकांविषयी माहिती दुसऱ्या पुस्तकांतून घेतली आहे. मी प्रत्यक्ष सर्व टीका पाहिल्या नाहीत.