पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५१) झाले नाही, हे आमच्या देशाचे दुर्भाग्य होय. वेधसंबंधे काहीच प्रयत्न भास्कराचार्याने केला नाही. तो तो करिता तर उपपत्तिविवेचन हे जें: केवळ टीकाकाराचें काम, त्याकडे त्याचें बुद्धिसर्वस्व खर्च झाले आहे, त्याचा ओघ नवीन शोधांकडे निःसंशय वळला असता, असे मला माझ्या स्वतःच्या अत्यल्पानुभवावरूनही वाटते. याच्या ग्रंथांत नवीन विशेष कांहीं नाहीं, तरी याने उपपत्तीकडे बुद्धिसर्वस्व खचिलें आहे; आणि त्यामुळे वेधसाध्य नव्हत तर केवळ विचारसाध्य असे काही नवीन शोध त्याच्या ग्रंथांत आहेत. गोल तर त्यास करतलामलकवत् होता असे दिसते. त्रिप्रश्नाधिकारांत त्याने अनेक प्रकारच्या नवीन रीति बसविल्या आहेत, व त्यांत अनेक विषयांत आपलें फारच कौशल्य दाखविलें आहे. शंकूसंबंधे इष्टदिकछायासाधन पूर्वाचार्यांनी सांगितले नाही, ते याने सांगितले आहे. “पात साधनामध्ये पूर्वाचार्यांस भ्रम होता, त्याचे साधन मी सांगतों" असे त्याने झटले आहे. ग्रहांचा शर हा कांतिसूत्रामध्ये झणजे ध्रुवाभिमुख अशी याच्या पूर्वीच्या ग्रंथकारांची समजूत दिसते. परंतु शर हा कांतिवृत्तावर लंब, असें त्याने स्पष्ट दाखवून दिले आहे. उदयांतर हा एक याचा नवीन शोध आहे. त्याचे स्वरूप थोडक्यात सांगतो. अहर्गणावरून ग्रह काढण्यांत सर्व दिवस सारख्या मानाचे होतात. परंतु वस्तुतः ते सारखे नसतात. विषुववृत्तावरही ६० घटिकांहून किंचित् कमजास्त दिवस होतो. यामुळे मध्यम सूर्योदय आणि स्पष्ट सूर्योदय यांत अंतर पडते. अहर्गणावरून निघणारे ग्रह मध्यम मूर्योदयींचे निघतात. त्यांस स्पष्टोदयींचे करण्याकरितां भुजांतर आणि चर हे संस्कार पूर्वग्रंथकारांनी सांगितले आहेत. भास्कराचार्याने उदयांतर ह्मणून एक जास्त सांगितला आहे. सूर्याची गति क्रांतिवृत्तांत सर्व काल सारखी नसते. इष्टकाली मध्यम रवि आणि स्पष्ट रवि यांमध्ये जे अंतर, ह्मणजे फलसंस्कार, त्या मानाने स्पष्टोदय मागेपुढे होतो. यासंबंधे संस्कारास भुजांतर ह्मणतात.पृथ्वी आंसाभोंवती फिरते, ती विषुववृत्तांत फिरते, क्रांतिवृत्तांत फिरत नाही, यामुळे क्रांतिवृत्ताचे ३० अंश क्षितिजावर येण्यास जो वेळ लागतो तितकाच नेहमी विषुववृत्ताचे ३० अंश येण्यास लागतो असें नाही. यासंबंधे संस्कारास उदयांतर असें नांव भास्कराचार्याने दिले आहे. आणि तो संस्कार पाहिजे हे उघड आहे. भुजांतर आणि उदयांतर या दोहों मिळून 'इक्वेशन आफ टाइम' हे एकच नांव युरोपिअन ज्योतिषांत आहे. असो; तर उदयांतर हा एक संस्कार त्याने नवीन काढला. सूर्यसिद्धांतकारास हा संस्कार इष्ट होता असे स्पष्टाधिकार श्लो० ५९ च्या टीकेंत रंगनाथ टीकाकाराने दाखविण्याचा यत्न केला आहे; आणि स्वल्पांतरत्वास्तव सूर्यसिद्धांतांत तो सांगितला नाही असें झटलें आहे. सिद्धांततत्त्वविवेककाराने उदयांतरसंस्काराबद्दल भास्कराचार्याचे खंडन करण्याचा यत्न केला आहे; परंतु तो व्यर्थ आणि दुराग्रहाचा आहे. उदयांतराखेरीज आणखीही काही किरकोळ गोष्टी सिद्धांतशिरोमणीत नवीन आहेत. त्यांत दोन तीन स्थळी ब्रह्मगुप्ताची चुकी दाखविलेली आहे. करणकुतूहलकरणग्रंथांत आरंभकाल शक ११०५ आहे. क्षेपक दिले आहेत करणकुतूहल. ते शक ११०४ फाल्गून कृष्ण ३० गुरुवार सूर्योदयींचे