पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वंगप्रकति ह्मणून एक प्रकरण, पुढे एकवर्णसमीकरण, अनेकवर्णसमीकरण, एकानकवर्णवर्गादिसमीकरण, इत्यादि विषय आहेत. यांत एकंदर सुमारे २१३ पयें व म. ध्ये काहीं गये आहेत. गणिताध्याय आणि गोलाध्याय या दोन खंडांत ज्योतिःशास्त्र आहे. पहिल्यांत उपोद्घातांत सांगितलेल्या अधिकारांतले सर्व ग्रहगणितविषय आहेत. टीकेसुद्धा याची ग्रंथसंख्या १३४६ दिलेली आहे. गोलाध्यायांत ग्रहगणिताध्यायांतील सर्व विषयांची उपपत्ति, त्रैलोक्यसंस्थावर्णन, यंत्राध्याय, इत्यादि विषय आहेत. याची ग्रंथसंख्या २१०० दिलेली आहे. शेवटी ज्योत्पत्ति ह्मणून लहानसें परंतु महत्वाचे प्रकरण आहे. मध्ये ऋतुवर्णन ह्मणून एक लहानसें प्रकरण आहे; तें भास्कराचार्याने आपले कवित्व दाखविण्याकरितांच रचिलें आहे. मध्यमाधिकारांतील ग्रहभगणादि सर्व माने आणि स्पष्टाधिकारांतील परिध्यंश इत्यादि सर्व माने भास्कराचार्याने ब्रह्मसिद्धांतांतली घेतली कर्तृत्व. आहेत. मध्यमग्रहांस बीजसंस्कार राजमृगांक ग्रंथावरून अक्षरशः घेतला आहे. अयनगतिही पूर्वीच्या ग्रंथांतलीच घेतली आहे. सारांश वेधाने साध्य अशा गोष्टींसंबंधे भास्कराचार्याच्या सिद्धांतांत नवीन असें कांहीं नाही. परंतु केवळ विचारसाध्य अशा ज्ञानाने भास्कराचार्याचा ग्रंथ भरलेला आहे. असें ज्ञान ह्मणजे ज्योतिःसिद्धांताची उपपत्ति हे होय. अहर्गणावरून ग्रहसाधन या यःकश्चित् गोष्टीपासून तो लंबन, ज्योत्पत्ति, इत्यादि गहन विषयांपर्यंत प्रत्येकाच्या निरनिराळ्या सुलभ रीति आणि त्यांची उपपत्ति इत्यादिकांच्या योगाने सिद्धांतशिरोमणि हा इतका उत्कृष्ट ग्रंथ झाला आहे की तो एकच वाचल्याने भारतवर्षीय ज्योतिःशास्त्राचे सर्वस्व आपणास यथार्थ कळेल. आणि भास्कराचार्याची जी इतकी कीर्ति झाली आहे ती यामुळेच असे वाटते. याच्या ग्रंथाच्या योगानें अनेक चांगलेवाईट ग्रंथ मागे पडले असतील. भास्कराचार्यास गुरुस्थानी असलेला जो ब्रह्मासद्धांत तोही भास्करासिद्धांतानें जर मागे पडला तर इतर किती ग्रंथकार लोपले असतील, याचे अनुमान सहज करितां येते. पहिल्या आर्यभटापासून भास्कराचार्यापर्यंतचा काल झटला ह्मणजे भारतीय ज्योतिःशास्त्रासंबंधे पूर्ण भराचा होय. बगदादच्या खलीफांच्या भरभराटीत त्यांनी हिंदुस्थानांतून ज्योतिषी नेले, हिंदूंच्या ग्रंथांची आरबीत व लाटिन भाषेत भाषांतरे झाली, आणि आरबलोक व ग्रीकलोक ज्योतिषांत हिंदूंचे शिष्य झाले याच कालामध्ये. अयनगतीचा पूर्ण विचार झाला याच कालामध्ये. तर अशा ह्या ज्योतिःशास्त्राच्या भरभराटीच्या कालांत अनेक ग्रंथकार झाले असतील. परंतु त्यांतले कांहीं नामशेष मात्र झाले आहेत, आणि काहींचे तितकेंही भाग्य नाही. हे कालमाहात्म्य तर आहेच, तथापि असे होण्यास भास्कराचार्य बरेच अंशी कारण झाला असे मला वाटते. त्याच्या मागाहून तसा कोणी ग्रंथकार झाला नाही. भास्कराचार्याचे ग्रंथ भरतखंडाच्या सर्व कोनाकोपन्यांत प्रसिद्ध आहेत, इतकेच नाही, तर परभाषांत त्यांची भाषांतरे झाली आहेत. परंत एवढ्या कल्पकाच्या हातून, युरोपांत अर्वाचीन काल जे महत्वाचे शोध झाले त्यांतील काही शोध झाला, किंवा एखाद्या शोधाचा पाया पडला. अमें कहीं