पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बेदर आहे. तेही सह्याद्रीसन्निध नाही. मोगलाइतील कल्याण नामक प्रख्यात शहरच्या पूर्वेस १५ कोसांवर बेदर आहे. भास्कराचायीच्या वेळी कल्याण एथे चालुक्य वंशाचे राजे राज्य करीत होते. इतकें जवळ मोठं राज्य असतां त्याशी भास्कराचार्याचा काही संबंध असल्याचे कोठे लिहिले नाही. यावरून बेदर हे भास्कराचार्याचें स्थान नव्हे. चंगदेवाच्या शिलालेखांत २२ व्या श्लोकांत 'भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्यास जैत्रपालाने ह्या (पाटण) पुराहून बोलावून नेले ' असें ह्मटलें आहे. पाटण हें गांव यादवांची राजधानी जी देवगिरि (दौलताबाद) तिजपासून जवळच आहे व तें सह्याद्रीचे फांटे चांदवडचे डोंगर ह्यांच्या लगतच आहे, ह्मणजे भास्कराचार्याने लिहिल्याप्रमाणे सह्याचलाश्रित आहे. भास्कराच्या वंशांतला अनंत ह्याने बांधलेलें देवालय ज्या बहाळ गांवीं आहे ते पाटणच्या जवळच २० मैलांवर आहे. यावरून भास्कराचार्याचे मूळ गांव पाटण हेच किंवा त्याच्याजवळच विजलविड यासारख्या नांवाचे होतें असें निःसंशय दिसतें. सांप्रत तें प्रसिद्ध नाहीं. सिद्धांतशिरोमणीचे मुख्य चार खंड आहेत. त्यांस अध्याय असेंही म्हणतात. प्रत्येक खंडाच्या पोटांत दुसरे अध्याय आहेत. सिद्धांतशिरोमणिविषय. पहिल्या खंडास पाटीगणित किंवा लीलावती असें ग्रंथ काराने म्हटले आहे. अंकगणित आणि महत्वमापन (क्षेत्रफळ घनफळ) यांवर हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे मटले तरी चालेल. यांत एकंदर पर्ये सुमारे २७८ आहेत. मधून मधून उदाहरणांचें स्पष्टीकरण वगैरे गयांतही आहे. यांत प्रथम विविधपरिमाणांची कांहीं कोष्टके आहेत. पुढे संख्यांच्या स्थानसंज्ञा परार्धपर्यंत आहेत. पुढे पूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, ही आठ कृत्ये आहेत. त्यांस परिकाष्टक म्हटले आहे. पुढे भिन्न (अपूर्णांक) परिकर्माष्टक, शून्यपरिकष्टिक, इष्टकर्म, वैराशिक, पंचराशिक, श्रेठी इत्यादि विषय; तसेंच पुढे निरनिराळ्या क्षेत्रांचें आणि घनांचें क्षेत्रफलघनफल इत्यादि विषय आहेत. पुढे कुद्दकगणित आणि पाक्षिक विपर्यय, सर्वांशिक विपर्यय, यांतले काही विषय, उदाहरणे, वगैरे आहेत. मध्ये एक उदाहरण विशेष महत्वाचे आले आहे. तें असें की नऊ हात स्तंभावर एक मोर बसला होता. त्याने स्तंभाच्या मुळापासून २७ हातांवर एक सर्प स्तंभाच्या मुळाशी असणान्या बिळाकडे येणारा पाहिला. त्यास धरण्यास तो उडाला. दोघांची गति समान झाली. तर स्तंभापासून किती अंतरावर गांठ पडली? याचे उत्तर स्तंभापासून १२ हातांवर असे लिहिले आहे. मोराचें गमन काटकोन त्रिकोणाच्या कर्णरेषेने झणजे सरळ रेषेनें १५ हात झाले असे समजून हे उत्तर येतं. तथापि मोराचा गमनमार्ग ही वर्तुलपरिघाहून निराळ्या प्रकारची एक वक्ररेषा होते, अशा प्रकारचा महत्वाचा गणितविचार इतर संस्कृतग्रंथांत आला नाही, तो भास्कराचार्याच्या मनांत आला होता, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. लीलावती शिकून झाडांची पार्ने मोजतां येतात इत्यादि समजुती व्यर्थ आहेत, हे सांगणे नकोच; परंतु त्यांवरून ग्रंथाविषयों पूज्यबुद्धि दिसून येते. दुसरा खंड बीजगणित, यांत धनर्ण संख्यांची बेरीज इत्यादि, अव्यक्तांची बेरीज इत्यादि, करणी संख्यांची बेरीज इत्यादि, पुढे कुद्दक पुढे ३२