पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रभाकर (२४८) वरील श्लोकांवरून भास्कराचार्याची वंशावळ बाजूस लिहिल्याप्रमाणे निघते. यांतील गोत्र आणि भास्कराचार्याच्या बापाचें नांव स्वतः त्रिविक्रम. भास्कराचार्याने दिलेल्याशी मिळतात. भास्कराचार्यापासून भास्करभट्ट. पूर्वीचा ६ वा पुरुष भास्कर हा भोजराजाचा विद्यापति होगोविद. ता असें शिलालेखांत आहे. शिरोमणिकारभास्कराचार्याचा जन्म शके १०३६ मध्ये झाला. दर पिढीस २० वर्षे मानली असतां भोजविद्यापति भास्कर याचा जन्म शके मनोरथ. ९३६ मध्ये येतो. तेव्हां तो शके ९६४ मध्ये झालेल्या रा जमृगांककार भोजाचा विद्यापति असणे असंभवनीय महेश्वर. नाही. शिरोमणिकारभास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर यास भास्कर. जैत्रपाल राजानें बोलावून घेऊन आपल्या सभेत बाळगिलें, लक्ष्मीधर. आणि त्याचा पुत्र चंगदेव हा सिंघण चक्रवर्तीचा ज्योतिषी होता असें शिलालेखांत आहे. जैत्रपाल हा देवगिरि येचंगदेव. थील यादववंशांतील राजा शके १११३ पासून ११३२ पर्यंत गादीवर होता; आणि त्याचा पुत्र सिंघण हा शके ११३२ पासून ११६९ पर्यंत देवगिरी एथे गादीवर* होता. खानदेशांत चाळीसगांवच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ ह्मणून गांव गिरणेच्या जवळच आहे. तेथे सारजा देवीच्या देवालयांत एक शिलालेख आहे. शांडिल्यगोत्री मनोरथाचा पुत्र महेश्वर, त्याचा श्रीपति, त्याचा गणपति, त्याचा अनंतदेव हा यादववंशीय सिंह (सिंघण) राजाच्या दरबारी दैवज्ञाग्रणी होता, त्याने शके ११४४ मध्ये पूर्वोक्त देवीचे देवालय बांधलें असें या लेखांत आहे. त्यानेच तो लेख कोरिवलेला आहे. हे वंशवर्णन चंगदेवाच्या लेखांतील वर्णनाशी मिळतें. ह्या कुलांत विद्वत्परंपरा पुष्कळ काल चालली आणि हे कुल नामांकित होते असें दिसून येते. चंगदेवाच्या शिलालेखांतला पहिला पुरुष त्रिविक्रम हा दमयंतीकथानामक ग्रंथाचा कर्ता होय. जा भास्कराचार्य कोणा राजाच्यामिरी होत असें त्याने लिहिले नाही आणि वरील दोन्ही शिलालेखांतही नाही. त्याचे वसतिस्थान स्थळ. विज्जलविड होते असें त्याच्या लिहिण्यावरून दि सते. या शब्दांतील शेवटल्या दोन अक्षरांवरून ते बीड असेल असें मनांत येते. परंतु बीड हे अहमदनगरच्या पूर्वेस ४० कोस मोगलाईत आहे. ते सह्याद्रीच्या सन्निध नाहीं व सांप्रत तेथे भास्कराचार्याचे कोणी वंशज नाहीत असें मी शोध केल्यावरून कळले. भास्कराचार्याच्या लीलावतीचें भापांतर परशियन भाषेत अकबराच्या हुकुमावरून इ० स०१५८७ (शके १५०९) त झाले आहे. त्यांत भाषांतरकार ह्मणतो की मूळ ग्रंथकार भास्कर याची जन्मभूमि दक्षिणेत बेदर ही आहे. सोलापूरच्या पूर्वेस सुमारे ५० कोसांवर मोगलाईत * प्रो० भांडारकर यांचा दक्षिणेचा इतिहास (इंग्र० पृ० ८२) पहा ।। + Epigraphia Indica, Vol. III, p. 112 यांत हा लेख पला आहे. लेखांत देवीचें नांव द्वारजा असें आहे. | Potts' Algebra (1886 ) Se. II.