पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४७) कुलवृत्त. भास्कराचार्याने आपलें थोडेसें कुलवृत्त आणि वसतिस्थल पुढील श्लोकांत दिले आहे. आसीत् सह्यकुलाचलाश्रितपुरे विद्यविद्वज्जने नानासज्जनधानि विज्जडविडे शांडिल्यगोत्रो द्विजः। श्रौतस्मातविचारसारचतरो निःशेषविद्यानिधिः साधनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणिः॥ ६१ ॥ तज्जस्तचरणारविन्दयुगलप्राप्तप्रसादः सुधीर्मुन्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम् । एतत् व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां सिद्धांतग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर ॥ ६२ ॥ गोले प्रश्नाध्यायः यावरून याचे गोत्र शांडिल्य होते, याच्या बापाचें नांव महेश्वर होते, आणि त्याजपासून त्यास विद्या प्राप्त झाली; त्याचे राहण्याचे स्थान सह्य पर्वतासन्निध असणारे विज्जडविड हे होते. खानदेशांत चाळिसगांवच्या नैर्ऋत्येस १० मैलांवर पाटण ह्मणून खेडे आहे. सांप्रत तें उजाड आहे. त्यांत भवानीच्या देवळांत एका शिळेवर एक लेख *आहे. भास्कराचार्याचा नातू चंगदेव हा यादववंशांतील सिंघणराजाचा ज्योतिषी होता. हा सिंघण (सिंह) देवगिरि एथे शके ११३२ पासून ११६९ पर्यंत राज्य करीत होता. चंगदेवाने पाटण एथे भास्कराचार्याच्या व त्याच्या वंशांतल्या इतरांच्या ग्रंयांच्या अध्यापनाकरितां मठ स्थापिला. सिंघणाचा मांडलिक (भृत्य ) निकुंभवंशांतला सोइदेव याने त्या मठाकडे शके ११२९ मध्ये काही नेमणूक करून दिली. आणि त्याचा भाऊ हेमाडी यानेही नेमणूक दिली. इत्यादि हकीगत सदई शिलालेखांत आहे. शक ११२८ नंतर काही वर्षांनी तो लेख चंगदेवाने लिहिलेला आहे. सांप्रत तो मठ नाही परंतु मठाची चिन्हे आहेत. या शिलालेखांत भास्कराचार्याच्या पूर्वापर पुरुषांचा वृत्तांत असा आहे: शांडिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोभूत् तनयोस्य जातः । यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा ॥ १७ ॥ तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसंनिभः । प्रभाकरः सुतस्तस्मात् प्रभाकर इवापरः॥ १८ ॥ तस्मान्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः । श्रीमन्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः ॥१९॥ तत्सूनः कविवृन्दवन्दितपदः सवेदविलताकेदः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्याशेदः । यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचिग्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः ॥२०॥ लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमख्यो वेदार्थवित् तार्किकचक्रवर्ती ।। क्रतुक्रियाकांडविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत् ।। २२ ।। सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः । जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः ॥ २२ ॥ तस्मात् सुतः सिंघणचक्रवर्तिदैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेवः ।। श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः ॥ २३ ॥ भास्कररचितग्रन्थाः सिद्धांतशिरोमणिप्रमुखाः॥ तदूंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात् ॥ २४ ॥

  • कै० डा० भाउ दाजी यांनी या लेखाचा शोध लावून तो Jour. R. As. So. N. S. vol. I, p. 414 ff. यांत प्रसिद्ध केला. पुनः तो Epphia Indica, vol I, p.340 . मध्ये चांगल्या रीतीने छापला आहे. पाटण हे गांवाव त्यांत आले आहे.