पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकपंचाशदधिके सहले १०५१ शरदां गते । शकस्य सोमभूपाले सति चालुक्यमंडने ॥ समुदरसनामुर्वी शासति क्षतविद्विषि । सर्वशास्त्रार्थसर्वस्वपायोधिकलशोद्भवे ॥ सोम्यसंवत्सरे चैत्रमासादौ शुक्रवासरे । परिशोधितसिद्धांतलब्धाः स्युर्बुवका इमे ।।* यावरून त्या शकांतील चैत्र शुक्ल प्रतिपदा शुक्रवारचे क्षेपक या ग्रंथांत दिले आहेत आणि अहर्गणावरून ग्रहसाधन केलें आहे असे दिसते. प्रत्यक्ष तो ग्रंथ मी पाहिला नसल्यामुळे कोणत्या सिद्धांतावरून ग्रह घेतले आहेत वगैरे समजत नाही. शके १०७२ पूर्वीचे दुसरे ग्रंथ व ग्रंथकार. भास्कराचार्याच्या सिद्धांतशिरोमणींत पूर्व ग्रंथकारांची व ग्रंथांची नांवें आली आहेत, त्यांत यापूर्वी ज्यांचे विवेचन झाले त्यांखेरीज कांहीं आहेत. माधवरूत सिद्धांतचूडामणि याचा उल्लेख शिरोमणींत दोनदा आला आहे. (पंडित बापूदेव यांचे पुस्तक पृ. २३४, २६९). सांप्रत हा सिद्धांत उपलब्ध नाहीं. ब्रह्मा आणि विष्णुदैवज्ञ हे बीजगाणितग्रंथकार भास्कराचार्यापूर्वी होऊन गेले असें त्याच्या बीजगणितांत आहे. त्यांचे ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीत. यांतील ब्रह्मा हा कदाचित् करणप्रकाशकार ब्रह्मा असेल. भास्कराचार्य हा एक मोठा नामांकित ज्योतिषी होऊन गेला. याचा कीर्तिदुंदुभि सुमारे ७०० वर्षे या देशांत सर्वत्र गाजत आहे एवढेच नाही, तर परदेशांतही गाजत आहे. याचे थोडेसें वर्णन करूं.. याचे सिद्धांतशिरोमणि आणि करणकुतूहल असे दोन ज्योतिषगणितग्रंथ आहेत. शिरोमणींत तो लिहितो की, काल. रसगुणपूर्णमही१०३ ६समशकनृपसमयेऽभवन्ममोत्पत्तिः रसगुण३६वर्षेण मया सिद्धांतशिरोमणी रचितः ॥ ५८॥ गोले प्रश्नाध्याये. यावरून शके १०३६ मध्ये याचें जन्म झालें, आणि ३६ व्या वर्षी ह्मणजे शके १०७२ मध्ये त्याने सिद्धांतशिरोमणि रचिला. करणकुतूहल ग्रंथाचा आरंभशक ११०५ आहे. यावरून त्या वर्षी तो रचिला. सिद्धांतशिरोमणीच्या ग्रहगणित आणि गोल या दोन अध्यायांवर त्याची स्वतःचीच वासनाभाष्य टीका आहे. तीत एके स्थली (पाताधिकार ) तो ह्मणतो, “तथा शरखंडकानि मया करणे कथितानि" आणि टीकेंत कांहीं स्थली अयनांश ११ घेतले आहेत. त्याच्या मते ११ अयनांश शके ११०५ मध्ये होते. यावरून शके ११०५ च्या सुमारास टीका केली असे दिसते. तथापि कांहीं टीका पूर्वीच केली असेल, कांहीं मूलसिद्धांताबरोबरच केली असेल, असें संभवतें. वयाच्या ६९ व्या वर्षी त्याने करणग्रंथ केला, आणि टीकेचाही काही भाग रचिला. यावरून इतक्या उतारवयांत त्याचा उत्साह व बुद्धि कायम होती असे दिसून येते. सांप्रतकाली असे लोक आपल्या देशांत फार थोडे सांपडतील. याच्या कालाविषयीं याच्या ग्रंथांत व दुसन्याही ग्रंथांत इतकी प्रमाणे आहेत की त्याविषयी काही संशय नाही,

  • प्रोफेसर भांडारकर यांचा दक्षिणेचा इतिहास पृष्ठ ६७।६८ (इंग्रजी पहा.