पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काल. (२४५) भास्वतीकरणावर भास्वतीकरणपद्धति, रामकृष्णकृत तत्त्वप्रकाशिका, रामकृष्णरुत भास्वतीचक्ररश्म्युदाहरण, शतानंदकृत उदाहरण, वृंदावन कृत उदाहरण, ह्या टीका आहेत; तसेंच अच्युतभट्ट, गोपाल, चक्रविपदास, रामेश्वर, सदानंद ह्यांच्या टीका आहेत, आणि वनमालिरुत प्रारुत टीका आहे, असें आफ्रेचसूचीत आहे. यांनले बहुतेक टीकाकार उत्तर हिंदुस्थानांतले आहेत. यावरून भास्वतीकरण तिकडे प्रसिद्ध असावें. सांप्रत तें प्रसिद्ध नाहीं; व त्याचा उल्लेख दुसन्या एखाद्या ग्रंथांत मला आढळला नाही. करणोत्तम या नांवाच्या करणग्रंथाचा उल्लेख महादेवकृत श्रीपतिरत्नमाला टीकेंत पुष्कळ वेळा आला आहे. त्यांत अयनांशविचारांत त्या करणांतलें एक वाक्य "शाको वसुत्र्यंबरचंद्र १०३८ हीनः " असें दिले आहे. तसेच दुसरें एक “कलारूपा याताः करणशरदः षट्शतयुताः" असें दिले आहे. आणि “करणोत्तमादौ चाप्ययनांशा दशसंख्याः " असें झटले आहे. यावरून करणोत्तम ग्रंथ शके १०३८ या वर्षांचा आहे, आणि त्यांत शके ४३८ मध्ये अयनांश शून्य मानून अयनगति वर्षास एक कला मानली आहे, असे स्पष्ट दिसून येतं. सूर्यनुल्य, करणोत्तम, किंवा राजमृगांक, यांवरून स्पष्ट ग्रह करावे अशा अचें ताजकसार (शक १४४५) ग्रंथांतलें एक वाक्य पूर्वी दिले आहे (पृ. १८१). त्यांतला सूर्यतुल्य ग्रंथ सौरपक्षाचा असला पाहिजे. राजमृगांक ब्रह्मपक्षाचा असें वर दाखविले आहे. तेव्हां तिसरा करणोत्तम आर्यपक्षाचा असावा असे दिसून येते. आणि तो शके १४४५ मध्ये प्रचारांत होता असेंही ताजकसाराच्या शकावरून होते. सांप्रत तो कोठे प्रचारांत किंवा उपलब्ध असल्याचे ऐकण्यांत किंवा वाचण्यांत नाहीं. । महेश्वर प्रसिद्ध ज्योतिषी सिद्धांतशिरोमाणिकार भास्कराचार्य याचा हा पिता होय. याचा जन्म शक १००० च्या सुमारे झाला असावा आणि याचे ग्रंथ शक १०३०।४० च्या सुमारास झाले असावे. याचें वंशवृत्त पुढे भास्कराचार्याच्या वर्णनांत येईल. शेखर नांवाचा करणग्रंथ, लघुजातकटीका, एक फलग्रंथ आणि प्रतिष्ठाविधिदीपक हे ग्रंथ याने केले असें याचा पणतू अनंतदेव याच्या शिलालेखांत आहे. (भास्कराचार्यवर्णनांत पहा.) वृत्तशत या नांवाचा आणखी एक ग्रंथ याने केले. ला आहे.* वृत्तशत नामक मुहूर्तग्रंथ आहे तोच हा असेल. मामलामायापनामाणसSITE अभिलषितार्थचिंतामणि उत्तरचालुक्य वंशांतील राजा तिसरा सोमेश्वर, ज्याला भूलोकमल्ल, सर्वज्ञ भू STER पाल, अशीही दुसरी नावें होती, त्याने अभिलषितार्थचिंताम आणि किंवा मानसोल्लास नांवाचा ग्रंथ केला आहे. त्यांत अनेक विषय आहेत, त्यांत ज्योतिष हाही आहे. त्यांत ग्रहसाधनार्थ आरंभकाल शके: १०५१ हा आहे. यासंबंधे असें मटले आहे:*Jour, R. As. No., N. S. vol. I, p. 410. प्रसार. कर्ता.