पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४१) आसीत्पार्थिवबंद वंदितपदांभोजयो माथुरः श्रीश्रीश्चंद्रबधो गुणैकवसतिः ख्यातो द्विजेंद्रः क्षितौ ।। नत्वा तस्य सुतोंग्रिपंकजयुगं खंडेंदुचूडामणेः वृत्तः स्पष्टमिदं चकार करणं श्रीब्रह्मदेवः सुधीः ॥ १२॥ यावरून ब्रह्मदेवाच्या बापाचें नांव चंद्र असें होते असे दिसते. चंद्र हा एखाद्या राजाच्या आश्रयास असावा; निदान त्यास राजाकडून चांगला मान मिळत असावा, असें वरील श्लोकावरून दिसते. माथुर यावरून तो कदाचित् मथुरेचा राहणारा असेल. आर्यभटशास्त्रसम ग्रंथ करितों असें आरंभी झटले आहे, तो आर्यभट पहिला होय. तरी प्रथमार्यभटसिद्धांतावरून येणान्या ग्रहगतिस्थितीस आधार लल्लोक्त बीजसंस्कार द्यावा तेव्हां यांतील गतिस्थिति मिळते. यांत बीजसंस्कार निराळा सांगितला नाही. तो हिशेबांत घेऊनच गतिस्थिति सांगितल्या आहेत. क्षेपक सांगितले आहेत, ते चैत्र शुक्ल प्रतिपदा शुक्रवार शके १०१४ या दिवशींचे मध्यम सूर्योदयींचे आहेत. ते असे आहेतः रा. अं. क. वि. रा. अं. क. वि. रवि १११६ ३२ ५७ शुक्र १०११ २८ ५८. चंद्र ११२७ २० २० शनि ३ २ १४ २३ मंगळ ३,१३ २० ६ चंद्रोच्च १ ५४९१६ बुध ७४ ३१ १२ चंद्रपात १ ३ १७ १२ गुरु ६ २ ५६ २७ प्रथमार्यभटीयावरून येणाऱ्या ग्रहांस लल्लोक्त बीजसंस्कार देऊन हे क्षेपक विकलांमुद्धां बरोबर मिळतात. यांत अहर्गणावरून मध्यमग्रहसाधन केले आहे. या ग्रंथाचे मध्यमाधिकार, स्पष्टीकरणाधिकार, पंचतारास्पष्टीकरण, छाया, चंद्रग्रहण, विषय. सूर्यग्रहण, उदयास्त, शृंगोन्नति, ग्रहयुति असे ९ अधिकार आहेत. यांत शके ४४५ मध्ये अयनांश शून्य मानले आहेत आणि अयनगति वर्षास एक कला मानिली आहे. एकादशीच्या उपोषणासंबंधे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. एकादशीच्या पूर्वदिवशी दशमी ५६ घटिका किंवा जास्त प्रसार. असली मणजे ती एकादशी दशमीविद्ध समजून भागवत सांप्रदायी त्या एकादशीस उपोषण न करतां दुसरे दिवशीं करितात. दशमी किती घटिका आहे हे काढण्याच्या संबंधाने सोलापूर, कर्नाटक व बहुतेक दक्षिण, येथील वैष्णवसांप्रदायी लोक आर्यपक्षाप्रमाणे चालतात. करणप्रकाश हा ग्रंथ आर्यपक्षाचा आहे,आणि त्या ग्रंथावरून कोणतीही तिथि सूर्यसिद्धांत, ब्रह्मसिद्धांत यांवरून येणाऱ्या तिथीपेक्षां सुमारे दोनतीन घटका जास्त येते. करणप्रकाशावरून सर्व तिथि केलेल्या असें पंचांग सांप्रत कोठे चालत असेल असे मला वाटत नाही. कारण ग्रहलाघवग्रंथानुसार पंचांग करण्यास तिथिचिंतामणीच्या सारण्या आहेत, त्यांवरून ३१