पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१४०) निःसंशय सिद्ध होते. यांत बीजसंस्कार निराळा सांगितला नाही. ती हिशोबात घेऊनच गति दिल्या आहेत. याच्यापूर्वीचे प्रसिद्ध करणग्रंथ पंचसिद्धांतिका, खंडखाय, राजमृगांक, यांत मध्यम ग्रहसाधन अहर्गणावरून केलेले आहे. ह्मणजे करणासोय. पासून गेलेल्या वर्षसंख्येस सुमारे ३६५॥ यांनी गुणून येणारी जी दिवससंख्या तीवरून दिनगति व मध्यमग्रह काढण्याची रीति दिलेली आहे. परंतु वर्षसंख्या जसजशी वाढत जाते तसतसा अहर्गण वाढत जातो. आणि यामुळे गुणाकारभागाकार फारच वाढतात. मध्यमग्रह करण्यास दिनगतीची कोष्टकें केली तर मध्यमग्रहसाधन फार थोड्या वेळांत होईल. किंवा एक वर्षांतील ग्रहांची गति देऊन करणगत वर्षगणावरून मध्यमग्रह केले तरीही फारच थोड्या वेळांत होईल. परंतु पंचसिद्धांतिका, खंडखाय, राजमृगांक आणि यानंतरचेही प्रसिद्ध करणग्रंथ करणप्रकाश, करणकुतूहल, ग्रहलाघव, ज्यांवरून अद्याप गणित होत आहे, त्यांत मध्यमग्रहसाधन अहगणावरून करण्याची अतिश्रमाची रीति दिलेली आहे, हे आश्चर्य आहे. त्या रीतीने एक ग्रह करण्यास जो वेळ लागतो त्याच्या दशांश किंवा कमीच वेळांत वर्षगणावरून किंवा कोष्टकांवरून मध्यमग्रह होतो. प्रस्तुत ग्रंथ करणकमलमार्तड यांत ग्रहसाधन वर्षगणावरून केले आहे, इतकेच नाही, तर वर्षगणास गतींनी गुणण्याचे परिश्रम वांचावे ह्मणून कोष्टके तयार करून दिली आहेत. ही मोठी सोय आहे. सांप्रत ग्रहलाघवावरून अहगणावरून ग्रह करण्यास दिनगतिकोटके तयार केलेली कांहीं जोशांपाशी आढळतात. तशी पंचसिद्धांतिकायनुसार कोष्टकेंत्या त्या कालीं ज्योतिष्यांनी कदाचित केलेली असतील. परंतु ग्रंथांत ती रीति नसल्यामुळे पुष्कळ अज्ञज्योतिषी कोष्टकांचा उपयोग न करितां ग्रंथोक्त अति परिअमाची रीति स्वीकारितात असें मी पाहिले आहे. तर यासंबंधे करणकमलमार्तडकाराची स्तुति केली पाहिजे. यांत मध्यममेषापासून मध्यमग्रहसाधन केलें आहे. ग्रंथारंभीचे क्षेपक आणि वर्षगति श्लोकबद्ध सांगितल्या नाहीत हे अमळ आश्चर्य आहे. परंतु ग्रंथासमवेत असणाऱ्या कोष्टकांत ते सर्व दिले असावे असे दिसते. मी जो ग्रंथ पाहिला (पुणे डे० कालेजसंग्रह नंबर २० सन १८७०।७१), त्यांत तिथिशुद्धीची मात्र कोष्टके आहेत, बाकीची नाहीत. यामुळे तेवढ्यावरूनच ग्रह करण्यास तो ग्रंथ काही उपयोगी नाही. यांत मध्यमाधिकार, स्फुटाधिकार, त्रिप्रश्नाधिकार, चंद्रग्रहणाधिकार, सूर्यग्रहण, उदयास्त, शृंगोन्नति, महापात, ग्रहयुति, स्फुटाधिमाससंवत्सरायन, असे १० अधिकार असून त्यांत अनुष्टुप् छंदाचे सुमारे २७९ श्लोक आहेत. यांत शके ४४४ मध्ये अयनांश शुन्य मानून अयनगति वर्षास एक कला मानली आहे. करणप्रकाश. हा एक करणग्रंथ आहे. यांत आरंभवर्ष शक १.१४ आहे. आरंभीच करणकार काल. ह्मणतीनत्वाहमार्यभटशास्त्रसमं करोमि श्रीब्रह्मदेवगणक: करणप्रकाशं ॥ यावरून ब्रह्मदेव नामक ज्योतिष्याने आर्यभटग्रंथास अनुसरून हा ग्रंथ केला असे स्पष्ट होतें. ग्रंथाच्या शेवटीं मटले आहे: कर्ताः