पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४२) गणित फार जलद होते, तसे करणप्रकाशानुसार गणित करण्यास काही साधन नाही. यामुळे वैष्णव लोक महाराष्ट्र प्रांतांतले तर इतर तिथींच्या संबंधे ग्रहलाघवी पंचांगच वापरितात; परंतु एकादशीसंबंधैं मात्र आर्यपक्षाने चालतात. ते तरी स्थूल मान ठरल्यासारखेच आहे की ग्रहलाघवी पंचांगापेक्षां आर्यपक्षाची तिथि २ घटका जास्त असावयाची. तेव्हां ग्रहलाघवी पंचांगांत दशमी ५४ घटी असली झणजे आर्यपक्षाने ती ५६ घटका आहे असे समजून पुढील एकादशी दशमीविद्ध समजतात. शके १८०९ च्या आषाढ कृष्णपक्षांत ग्रहलाघवी पंचांगांत दशमी शुक्रवारी घ० ५२ प० १५, एकादशी शनिवारी घ० ५४ प० ३२ आणि द्वादशी रविवारी ५५।३९ आहे.* यांत एकादशी दशमीविद्ध नाही आणि दुसरेही कारण दोन एकादशा होण्यास नाही. यामुळे सर्व मराठी पंचांगांत शनिवारी एकादशी लिहिली आहे. परंतु त्या वेळी रायचुराकडील एक वैष्णव आचार्य आपल्या शिष्यवर्गासह मला सहज भेटले. ते ह्मणाले, आमची एकादशी दुसरी आहे. व त्याचे कारण विचारतां आर्यपक्ष, करणप्रकाश, लिप्ता, असें कांही त्यांनी सांगितले; परंतु त्यांस आर्यपक्ष आणि करणप्रकाश मणजे काय हें कांहीं माहित नव्हते. किंचित् छलपूर्वक विचारले तेव्हां त्यांनी सांगितले की धारवाडाकडून आह्मांस लिहून आले आहे, ह्मणून आह्मी दुसरी एकादशी करितों. तिकडे तरी हल्ली प्रत्यक्ष गणित करणप्रकाशावरून कोणी करीत असतील असे वाटत नाही. शके १७५८ चें विजापुरचें एक हस्तलिखित पंचांग मी पाहिले.तें ग्रहलाघवादिकांवरूनच केलेलें होते असे दिसून आले. मात्र त्यांत दशमी, एकादशी, ह्या तिथि करणप्रकाशावरून निराळ्या काढून दिल्या होत्या. सोलापूरचे एक वैष्णव ज्योतिषी मला भेटले होते. त्यांनी सांगितले की आमी एकादशीचे गणित मात्र कधी करणप्रकाशावरून करितों. बीड एथले एक चांगले ज्योतिषी मला शके १८०६साली भेटले होते. त्यांस करणप्रकाश सर्व अवगत होता, परंतु नेहमी सर्व गणित त्यावरून करीत नाही असे त्यांनी सांगितले. वरील दशमीचे गणित करणप्रकाशावरून मी करून पाहिले, तेव्हां दशमी मध्यमोदयापासून ५४ घटि ५९ पळे उज्जयिनी रेखांशांवर आली. स्पष्टोदयापासून ५६ घटिका येते. सारांश इतकाच की, करणप्रकाशग्रंथ अयापि कांहीं प्रचारांत आहे. या प्रांतांत त्याची प्रत मिळविण्यास मला पुष्कळ प्रयास पडले, परंतु मिळाली. गण एथे हे सांगितले पाहिजे की प्रथमार्यसिद्धांतास लल्लोक्त बीजसंस्कार दिला तर आर्यपक्षतिथि २।३ घटका जास्त येते, नाहीतर येत नाही. तेव्हां आर्यपक्षाने एकादशीचा निराळा शास्त्रार्थ लल्लानंतर केव्हांतरी प्रचारांत आला असला पाहिजे. पूर्वी तो असण्याचा संभवच नाही. मुहूर्तमार्तंड ह्मणून एक मुहूर्तग्रंथ आहे (शके १४९३). त्यांत "ब्रह्मपक्षतिथीहून आर्यपक्षतिथि ४ घटका जास्त असते" असे झटले आहे. त्यावरून व ग्रहलाघवावरून दिसते की शकाच्या १५ व्या शतकांत आर्य, ब्राह्म, तीन पक्ष. सौर ह्या तीन पक्षांचें भिन्नत्व प्रबल होऊन त्याचे त्याचे अभिमानी लोक झाले होते. करणकुतूहल, राजमगांक हे ग्रंथ ब्रह्मपक्षाचे आहेत. खंडखाय सौरपक्षाचा म्हणण्यास हरकत नाही. आर्यपक्षाचा स्वतंत्र ग्रंथ १०१४ च्या

  • शके १८०९ च्या सायन पंचांगांत छापलेल्या ग्रहलाघवी पंचांगावरून हे अंक घेतले आहेत. प्रित्यक्ष करणप्रकाशावरून एकादशीचे गणित करण्यास ४ तासही पुरणार नाहीत. मी करणप्रकाशाशी तुल्य परंतु सुलभ अशा दुसऱ्या रीतीने तेच सुमारे पाऊण तासांत केलें.