पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिद्धांतांतील ग्रह आणि प्रत्यक्ष वेधावरून आलेले ग्रह यांत में अंतर दिसले असेल त्या मानाने व इतर ग्रंथांशी जुळण्यासारखा हा संस्कार निश्चित केला असेल असें संभवते. स्वतः भोजराजास करणग्रंथ करण्याइतकें ज्योतिषाचे ज्ञान होते की नाहीं न कळे. तें नसल्यास त्याच्या आश्रित ज्योतिष्यांनी ग्रंथ करून त्यावर राजाचे नांव घातले असेल. परंतु तसे असले तरी वेधादि अनुभव घेऊन नवीन ग्रंथ करण्याचे सामर्थ्य ज्योतिष्यांस आलें तें राजाश्रयामुळेच होय यांत संशय नाही. या ग्रंथांत मध्यमाधिकार आणि स्पष्टाधिकार असे दोनच अधिकार आहेत. दो हों मिळून सुमारे ६९ श्लोक आहेत. ग्रहणसाधन इत्यादि विषय. दुसन्या गोष्टी प्रत्यक्ष सिद्धांतावरून करीत असतील असें दिसते. सांप्रत हा ग्रंथ कोठे प्रचारांत नाही. आणि यास फार वर्षे झाल्यामुळे यांतील अहर्गण फारच मोठा होणार; तो मध्यम ग्रह करण्यास गैरसोईचा आहे; यामुळे व दुसरे करणग्रंथ झाल्यामुळे हा मागे पडला हे साहजिकच आहे. तथापि बरीच वर्षे हा प्रचारांत असावा असे दिसते. शके १२३८ मध्ये झालेला महादेवीसारणी ह्मणून एक करणग्रंथ ब्रह्मपक्षाचाच आहे. त्यांत राजमृगांकाचा उल्लेख आहे. तसेच ताजकसार ह्मणून शके १४४५ मध्ये झालेला एक ग्रंथ आहे, त्यांत श्रीसूर्यतल्यात्करणोत्तमावा स्पष्टा ग्रहा राजमृगांकतो वा ॥ असें झटले आहे. यावरून शके १४४५ पर्यंत राजमृगांकावरून स्पष्टग्रह करीत असावे असे दिसते. यांत अयनांशसाधन असें आहे: शकः पंचाब्धिवेदी ४४५ नः षष्टि ६० भक्तोयनांशकाः ॥ २५ ॥ मध्यमाधिकार. करणकमलमार्तड. हा एक करणग्रंथ आहे. त्यांत आरंभबर्ष शके ९८० हे आहे. राजमृगांका प्रमाणे याचाही कर्ता एक राजाच आहे. याच्या शेवटी मटले आहे वलभान्वयसंजातो विरोचनसुतः सुधीः ॥ इदं दशबल: श्रीमान् चक्रे करणमुत्तमम् ॥ १० ॥ धन्यैरार्यभटादिभिनिजगुणैर्दिडीरफेलोज्वलराब्रह्मांडविसारिभिः प्रतिदिनं विस्तारिताः कीर्तयः॥ स्मृत्वा तचरणांबु जानि रचितोऽस्माभिः परप्रार्थितैर्मथोयं तद्पाजितैश्च स्कृतैः प्रीतिं भजंतां प्रजाः ॥ ११ ॥ अधि. १०. यावरून वलभ वंशांतील दशबल नामक राजाने हा ग्रंथ केला. यांत हा अमुक सिद्धांतास अनुसरून केला असे म्हटले नाही. तरी यांत अआधार. ब्दप (मध्यमेषसंक्रमणकाल ) आणि तिथिशुद्धि (मध्यममेषीं गत मध्यमतिथि) यांची वर्षगति दिली आहे ती राजमृगांकोक्त बीजसंस्कृत ब्रह्मसिद्धांतमानाशी मिळते. तसेंच यांतील मंदोच्चे, नक्षत्रध्रुव, पात, इत्यादि गोष्टी ब्रह्मसिद्धांताशी मिळतात. यावरून हा ग्रंथ बीजसंस्कृतब्रह्मसिद्धांततुल्य आहे असे काल. कर्ता.