पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीकाग्रंथ. कसेही असले तरी शके ८८८ किंवा ८८७ या दोहोंतला कोणता तरी शक आहे याविषयी संशय नाही. खंडखायावर उत्पलाची टीका आहे. परंतु तीत कोणता शक आहे हे समजले नाही. परंतु बृहत्संहिताटीकेंत " खंड खाद्यकरणे अस्मदीय वचनं " असें एके ठिकाणी (अध्या. ५) आले आहे. त्यावरून खंडखायावरील टीका त्याने पूर्वी केली असे दिसून येते. तसेंच वराहाच्या "यात्रा" या ग्रंथावरही टीका बृहत्संहिताटीकेच्या पूर्वी केली असें बृ. सं. टीकेंतील उल्लेखावरून (अध्या. ४४) दिसते. लघुजातकावरही याची टीका आहे. ह्मणजे वराहमिहिराच्या ग्रंथांपैकीं याबा, बृहज्जातक, लघुजातक आणि बृहत्संहिता आणि ब्रह्मगुप्ताचे खंडखाय इतक्या ग्रंथांवर उत्पलाने टीका केल्या आहेत. पैकी यात्रा यावरील टीका प्रस्तुत उपलब्ध नाहीं. बृहज्जातक, लघुजातक आणि बृहत्संहिता यांवरलि टीका या प्रांती आहेत. त्यांपैकी पहिल्या दोन छापल्या आहेत खंडखाद्यावरील टीकेचें डे. का. संग्रहांतलें पुस्तक भूर्जपत्रावर लिहिलेलें काश्मिरांत मिळालें. इतर प्रांती ही टीका उपलब्ध असेल असे वाटत नाही. काश्मिरांत ही टीका फार प्रसिद्ध होती असें शके १५६४ मधील खंडखाद्यावरील दुसरी एक टीका, आणि १५८७ मधील पंचांगकौतुक. या काश्मिरांत झालेल्या दोन ग्रंथांवरून दिसते. यावरून भटोत्पल हा काश्मिरांत स्थल. राहणारा असावा असे अनुमान होते; व खंडखायटीकाकार वरुण यानें तो काश्मीरवासी असे स्पष्टच सांगितले आहे. बृ. सं. टीकेंत पहिल्या अध्यायांत “अस्मदीय वचनं " असें एके ठिकाणी स्वतंत्र ग्रंथ. ह्मणून त्याने एक आर्या दिली आहे, त्यावरून गणितस्कं धावर त्याचा स्वतंत्र ग्रंथ असावा असे वाटते. कदाचित् तें वचन त्याने खंडखायटीकेंतही दिले असेल. प्रश्नज्ञान या नांवाचा ७२ आर्यांचा एक प्रश्नग्रंथ भटोत्पलाने केलेला आहे. उत्पल हा प्राचीन ग्रंथांचा अति शोधक होता आणि त्याचे वाचन फारच होतें शोधकता. असें बृहत्संहिताटीकेवरून दिसते. वराहमिहिराने जे जे विषय लिहिले आहेत त्यांतील बहुतेक प्राचीन ग्रंथांच्या आधाराने लिहिले असें जागोजाग त्याने लिहिले आहे, व कांहीं स्थली त्या ग्रंथांची नांवेंही लिहिली आहेत. अशा बहुतेक किंवा सर्व स्थली उत्पलाने त्या त्या विषयावरील प्राचीन संहिताकारांची वचनें आधारास दिली आहेत. कोठे कोठे एका विषयावर ८१० प्राचीन संहिताकारांची वचने आहेत. ह्या सर्व संहिता त्याच्या वेळीं उपलब्ध होत्या असे स्पष्ट दिसते. तसेंच संहिता, जातक यांवरील किंवा यांच्या एखाद्या पोटविषयावरील अनेक पौरुष ग्रंथकारांचीही नवि व त्यांची वाक्ये याने दिली आहेत. संहिताशाखेतील विविध विषयांचे ज्ञान आपल्या देशांत प्राचीन काली कसे होते आणि ते कसे वाढत गेलें यासंबंधे इतिहास समजण्यास ब. सं. वरील उत्पलटी का हे मोठे साधन आहे आणि या व अनेक कारणांनी ती टीका छापण्यासारखी आहे. ही टीका फार विस्तृत आहे. एकंदर ग्रंथ सुमारें*

  • अशा स्थली ग्रंथसंख्या याचा अर्थ '३२ अक्षरांचा एक अनुष्टुप् श्लोक याप्रमाणे ग्रंथांतील सर्व अक्षरांचे श्लोक बांधिले तर जे होतील त्यांची संख्या' असा समजावा.