पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३४) आहत. यानं सप्तऋषीस गति मानून त्यांचे कल्पभगण दिले आहेत. परंतु सप्तऋषींस वस्तुतः गति मुळीच नाही मटले तरी चालेल. पाराशरसिद्धांत. पाराशर्या दिविचरयोगे नेच्छांति दृष्टिफलं ॥ १ ॥ अध्याय ११. असे याने मटले आहे. आणि कलिसंज्ञे युगपादे पाराशर्यं मतं प्रशस्तमतः ॥ वक्ष्ये तदहं ...... ॥ १ ॥ अध्याय २. असें ह्मणून त्याने त्यांतील भगणादिमाने दिली आहेत. यावरून पाराशरसिद्धांत स्वतंत्र असावा असे दिसते, परंतु सांप्रत तो उपलब्ध नाहीं. बलभद्र. पृथूदकाच्या ब्रह्मसिद्धांतावरील टीकेंत बलभद्राचें नांव पुष्कळ वेळा आलें आहे, आणि त्याच्या नांवावर अनुष्टुप् छंदाचे पुष्कळ श्लोक दिले आहेत. त्या सर्व श्लोकांत ब्रह्मसिद्धांतांतलींच मानें श्लोकांनी दिली आहेत. भटोत्पलकत बृहत्संहिताटीकेंतही बलभद्राच्या नांवावर काही श्लोक व कांहीं आर्या आहेत. त्या गणितस्कंधाच्या आहेत, तरी त्यांचा ब्रह्मसिद्धांताशी काही संबंध नाही.यावरून त्याचा ग्रहगणितावर स्वतंत्र ग्रंथ असावा असें अनुमान होते. पृथूदकानें बलभद्राची वाक्ये दिली आहेत, ती कदाचित् त्याने ब्रह्मसिद्धांतावर केलेल्या टीकेंतील असतील. पयात्मक ग्रंथाच्या टीकेचाही काही भाग पद्यबद्ध अशी पद्धति पूर्वी असेल असे वाटते. याचे एक उदाहरण परमादीश्वराने आर्यभटीयावरील टीकेंत आपल्या लीलावतीवरील टीकेंतले काहीं श्लोक दिले आहेत हे आहे. बलभद्राचा स्वतंत्र ग्रंथ असल्यास सांप्रत उपलब्ध नाही. त्याचा काल भटोत्पलाच्या पूर्वीचा ह्मणजे शके ८८८ पूर्वीचा आहे हे उघड आहे. भटोत्पल. हा एक मोठा टीकाकार होऊन गेला. बृहज्जातकावरील टीकेचा काल त्याने काल. असा दिला आहे:चैत्रमासस्य पंचम्यां सितायां गुरुवासरे || वस्वष्टाष्ट ८८८ मिते शाके कृतेयं विवृतिर्मया ।। आणि बृहत्संहिताटीकाकाल असा दिला आहे:फाल्गुनस्य द्वितीयायामसितायां गरीदिने ॥ वस्वष्टाष्ट ८८८ मिते शाके कृतेयं विवृतिर्मया ॥ शके ८८८ हें गत असें मानून त्यांतील अमान्त माघ किंवा फाल्गुन कृष्ण द्वितीयेस गुरुवार येत नाहीं; फाल्गुन शुक्ल द्वितीयेस गुरुवार येतो. शके ८८७ च्या अमान्त माघ कृष्ण द्वितीयेस गुरुवार येतो. फाल्गुनांतल्या शुद्ध किंवा वद्य द्वितीयेस येत नाही. यावरून असे वाटते की वरील दुसऱ्या श्लोकांतील ८८८ हे वर्तमान वर्ष असावें. ह्मणजे गत ८८७ होतात. आणि फाल्गुन हा पूर्णिमांताचा ह्मणजे अमांत माघ असावा असे वाटते. परंतु पहिल्या श्लोकांतील चैत्र शुक्ल ५ च्या दिवशी शके ८८८ किंवा ८८७ कोणत्याही वर्षी गुरुवार येत नाही. ८८७ मध्ये शुक्रवार येतो, आणि ८८८ मध्ये बुधवार येतो. यावरून यांत कांहीं तरी चूक असावी. आणि ती समजेपर्यंत शके ८८८ हा वर्तमान असेंच निश्चयाने ह्मणतां येत नाही,