पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काल. (१३६) १४००० होईल. आणि एवढी विस्तृत टीका याने सुमारे ११ महिन्यांत लिहिली (अस वरील दोन श्लोकांवरून होतें) हे आश्चर्य आहे. वराहमिहिराचा पुत्र पृथुयश याच्या षट्पंचाशिका नामक जातकग्रंथावर उत्पलाची टीका आहे. तिची एक प्रत पुणे कालेजसंग्रहांत आहे ( नंबर ३५५ सन. १८८२१८३) चतुर्वेदपृथूदकस्वामी. ब्रह्मगुप्ताच्या ब्रह्मसिद्धांतावर याची टीका आहे. भास्कराचार्याने याचें नांव पुष्कळ वेळा सांगितले आहे. खंडखायावर वरुणहत टीका आहे ती सुमारें शक ९६२ या वर्षांची आहे. तींत पृथूदकस्वामीचें नांव आले आहे. यावरून हा शक ९६२ च्या पूर्वी झाला असें सिद्ध होते. भटोत्पलास हा ठाऊक नव्हता असे दिसते. परंतु याच्या ब्रह्मसिद्धांतावरील टीकेंत बलभद्राचे नांव आहे. यावरून हा भटोत्पलाचा समकालीन असावा किंवा त्याच्या किंचित् मागाहून झाला असावा. ह्मणजे याचा काल सुमार शक ९०० हा आहे. ब्रह्मसिद्धांत अध्याय ७ आयी ३५ हिजवरील टीकेंत 'अथ साक्षभागाः कान्य कुब्जे.. कन्यकुब्जे स्वनत भागा... असें मटले आहे. तसेंच स्थल. ३८ व्या आर्यंत “यथेह कन्यकुब्जे" असें मटले आहे. यावरून हा कान्यकुब्ज देशांतला किंवा खुद्द कनोज शहरचा राहणारा असावा असे दिसते. ब्रह्मसिद्धांताच्या पहिल्या दहा अध्यायांवर याची टीका आहे. तिची एक प्रत पुणे पाकालेजसंग्रहांत आहे. त्या टीकेंत पुष्कळ ठिकाणी" उ सतं पूर्व गोलाध्यायेस्माभिः" असें झटले आहे. यावरून त्याने ब्रह्मसिद्धांताचा २१ वा अध्याय गोलाध्याय यावर प्रथम टीका केली व मागाहून दहा अध्यायांवर केली असें दिसतें. गोलाध्यायावरील टीका सुमारे दीड हजार आहे असे दहा अध्यायांवरील टीकेच्या शेवटींच्या एका वाक्यावरून दिसते. दहा 'अध्यायांवरील टीका सुमारे ५३०० आहे. टीका एकंदरीत चांगली आहे. मूळ ग्रंथच जर चांगला तर त्यावरील टीका शुद्ध असेल यांत आश्चर्य नाही. तथापि भास्कराचार्याने एक दोन ठिकाणी "एथे मूळची ब्रह्मगुप्तकति सुंदर असतां ती चतुर्वेदानें बिघडविली (तिचा अर्थ भलताच केला)" असा दोष दिला आहे. आणि तो खरा आहे. हा टीकाकार स्पष्टवक्ता दिसतो. एके ठिकाणी " पिष्टपेषणमेतत्" असा त्याने ब्रह्मगुप्तास दोष दिला आहे (अध्या. ७ आर्या २८।२९). दहाव्या अध्यायाच्या शेवटी यानें “पृथुस्वामी चतुर्वेदश्चके...मधुनंदनः" असें व कांहीं अध्यायांच्या शेवटी "मधुसूदनसुत" असें झटले आहे. यावरून याच्या बापाचें नांव मधुसूदन असें होतें. खंडखायावरही याची टीका असावी व तिचा काही भाग पद्यात्मक असावा असें वरुणटीकेवरून दिसते. याने आपणास पृथुस्वामी झटले आहे. यावरून टीका केली तेव्हां याने चतुर्थाश्रम घेतला होता की काय न कळे. याच्या ब्रह्मसिद्धांतावरील टीकेंत बलभद्राच्या खेरीज कोणत्याही पौरुषग्रंथांतले उतारे नाहीत. अपौरुषही फार थोडे आहेत. भगवान मनुः, व्यासमुनिः, पुराणकार:' एवढींच नांवें आली आहेत. ग्रंथ.