पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३१) ण्याचा याचा उद्देश आहे. परंतु ब्रह्मगुप्ताच्या नंतर हा झाला अशी मला खात्री वाटते. कारण हा आपला सिद्धांत कलियुगारंभानंतर लवकरच झाला असे म्हणतो, तरी आपली गणना पौरुषग्रंथकारांतच करतो. ब्रह्मगुप्ताच्या पूर्वी याचे वर्षमान किंवा इतर मानें प्रचारांत असल्याचें कांहीं अन्य प्रमाण नाही. आणि ब्रह्मगुप्ताने आयभटास दिलेली दूषणे सर्व पहिल्या आर्यभटसिद्धांतास लागतात; याच्यास मुळींच लागत नाहीत. याच्या सिद्धांतांतील कोणत्याच गोष्टीचा उल्लेख ब्रह्मगुप्ताने केला नाही. जर त्या वेळेस हा सिद्धांत उपलब्ध असता तर याची काहीं तरी दूषणे काढल्यावांचून ब्रह्मगुप्त राहताना. पंचसिद्धांतिकेंत अयनगति आहे असे दिसत नाही. पहिला आर्यभट, ब्रह्मगुप्त आणि लल्ल यांच्या ग्रंथांत ती नाहीं. या आर्यसिद्धांतांत ती आहे. आणखी पहिल्या आर्यभटास ब्रह्मगुप्ताने जी जी दूषणे दिली आहेत ती ती सुधारण्याचा याने प्रयत्न केलेला दिसतो. याच्या ग्रंथांत युगपद्धति आहे. कलपारंभ रविवारी आहे. आणि पहिल्या आर्यभटाच्या ग्रंथांत युगारंभापासून गणित असून त्या वेळी मध्यमग्रह मात्र एकत्र येतात, स्पष्ट एकत्र येत नाहीत, याबद्दल ब्रह्मगुप्ताने दूषण दिले आहे (अ.२ आर्या ४६). परंतु या आर्यभटाच्या ग्रंथाप्रमाणे सृष्टयारंभी स्पष्ट ग्रह एकत्र येतात. या सर्व प्रमाणांवरून मला खात्रीने वाटते की ब्रह्मगुप्तानंतर म्हणजे शके ५८७ च्या नंतर हा झाला. ही त्याच्या कालाची प्राचीन मर्यादा झाली. अर्वाचीन मर्यादा पाहिली तर भास्कराचार्याने याचा उल्लेख केला आहे. सिद्धांतशिरोमणीच्या स्पष्टाधिकारांत ६५ व्या श्लोकांत तो म्हणतो "आर्यभटादिभिः सूक्ष्मत्वार्थं दृक्काणोदयाः पठिताः " हक्काण मणजे राशीचा तिसरा अंश, म्हणजे १० अंश. पहिल्या आर्यभटानें लग्नमानें तीस तीस अंशांची सांगितली आहेत, दहा दहा अंशांची नाहीत. परंतु दुसऱ्या आर्यभटानें अध्याय ४ आर्या ३०-४० यांत दृक्काणोदय (लग्नमाने) सांगितली आहेत. याप्रमाणे दृकाणोदय सांप्रत दुसन्या आर्यभटाखेरीज दुसन्या कोणाच्या ग्रंथांत आढळत नाहीत. यावरून भास्कराचार्याने वरील वाक्यांत म्हटलेला आर्यभट पहिला नव्हे, दुसरा होय. यावरून शके १०७२ पूर्वी दुसरा आर्यभट झाला असला पाहिजे हे उघड आहे. याने अयनांश काढण्याची रीति दिली आहे. तीवरून अयनगति सर्वदा सारखी येत नाही, पुष्कळ कमजास्त होते ( याविषयी जास्त विवेचन अयनचलनविचारांत येईल). परंतु अयनगति सर्वदा सारखी असते म्हटली तरी चालेल. तीत फरक पडतो तो फारच थोडा पडतो. सांप्रतच्या मूर्यसिद्धांतांत गति सर्वकाल सारखीच आहे, परंतु त्याचा काल निश्चितपणे माहीत नाही. राजमृगांकग्रंथांत (शके ९६४) अयनगति सर्व काल सारखी मानली आहे. त्यापूर्वीचें निश्चित प्रमाण सध्या उपलब्ध नाही. यावरून अयनगतीचें ज्ञान बरोबर होण्याच्या पूर्वी दुसरा आर्यभट झाला असावा. भटोत्पलाच्या टीकेंत (शके ८८८) पुष्कळ ग्रंथांतले उतारे आहेत, परंतु दुसऱ्या आर्यसिद्धांतांतला नाही. यावरून दुसरा आर्यभट भटोत्पलाच्या पूर्वी झाला असल्यास नुकताच झाला असावा. दुसऱ्या आर्यसिद्धांतावरून येणारे अयनांश आणि त्याच्या स्पष्टमेषसंक्रमणकाली त्या अयनांशांइतका सायन रवि ही दोन्ही समान येण्याचा काल सुमारे