पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३०) ग्रंथ मिळाला होता. त्यांत अंकगणित आणि क्षेत्रगणित हे विषय होते. यावरून हा श्रीधर आणि महावीराच्या ग्रंथांत आलेला श्रीधर एकच असे दिसते, आणि महावीराच्या कालावरून या श्रीधराचा काल शके ७७५ हून अर्वाचीन नाही असे दिसून येते. भास्कराचार्याने श्रीधर म्हणून एक बीजगणितमंथकार लिहिला आहे तो हाच असावा. महावीर. याचा सारसंग्रह नांवाचा एक ग्रंथ व्यक्तगणितावर आहे. ह्मणजे त्यांत अंकगणित आणि क्षेत्रगणित हे विषय आहेत. त्याची एक त्रुटित प्रत के० डा० भाऊ दाजी यांच्या संग्रहांतली माझ्या पहाण्यांत आली. तींतल्या आरंभीच्या वर्णनावरून दिसते की, महावीर हा जैनधर्मी होता, आणि जैनधर्मी राजा अमोघवर्ष ह्याचा त्याला आश्रय होता. यावरून राष्ट्रकूटवंशांतला जैनधी राजा पहिला अमोघवर्ष याच्या राज्यांत म्हणजे शके ७७५ च्या सुमारास हा झाला असे दिसून येतें. सारसंग्रहग्रंथ भास्कराचार्याच्या लीलावतीसारखा आहे; परंतु तिजपेक्षां तो विस्तृत आहे. त्याची ग्रंथसंख्या सुमारे २००० तरी असावी. सारसंग्रहांत वर वर्णिलेल्या श्रीधराचार्य नामक ग्रंथकाराच्या ग्रंथांतील मिश्रकव्यवहारांतली काही वाक्ये आली आहेत. द्वितीय आर्यभट (सुमारे शके ८७५). आर्यभटाचा एक सिद्धांत पूर्वी सांगितला त्याखेरीज दुसरा एक आर्यसिद्धांत आहे. पुणे डे. कालेजसंग्रहांत त्याची एक प्रत आहे, तीत ग्रंथ. त्यास लघु आर्यसिद्धांत म्हटले आहे. परंतु स्वतः ग्रंथकार व्यास बृहत् किंवा लघु असें कांहींच कोठे म्हणत नाही. पहिल्याच आर्येत तो म्हणतोः विविधखगागमपाटीकुट्टकबीजादिदृष्टशास्त्रेण ॥ आर्यभटेन क्रियते सिद्धांतो रुचिर आर्याभिः ॥ २॥ यांत तो आपल्या ग्रंथास सिद्धांत असेंच ह्मणतो. हा पूर्वीच्या आर्यभटाहून अचीन आहे, म्हणून यास द्वितीय आर्यभट आणि याच्या सिद्धांतास द्वितीय मार्यसिद्धांत असें सोईसाठी म्हणणे बरे म्हणून मी तसे केले आहे. याने आपला काल सांगितला नाही. यानें पाराशरसिद्धांतनामक दुसऱ्या एका सिद्धांतांतील मध्यममाने आपल्या सिद्धांतांत दिली काल. आहेत. त्या दोन्ही सिद्धांतांविषयीं तो म्हणतोः पतत्सिद्धांत द्वयमीषद्याते कलौ युगे जातं ॥२॥ अध्याय २. यावरून कलियुग लागल्यावर लवकरच हे दोन सिद्धांत झाले असे दाखवि