पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• २३२) शके ९०० येतो. त्याच्यापूर्वी तो झाला असल्यास थोडीच वर्षे झाला असावा. -या सर्व गोष्टींवरून शके ८७५ च्या सुमारास तो झाला असावा. याच्या व पराशराच्या सिद्धांतांचा बेंटलीने काढिलेला काल चुकीचा आहे हे मागे दाखविलंच आहे. (पृ. १७५). याच्या ग्रंथाचे १८ अधिकार आहेत, आणि त्यांत सुमारे ६२५ आर्या आहेत, पहिल्या १३ अध्यायांत करणग्रंथांतील निरनिराळ्या आधिग्रंथाचें वर्णन. " कारांत असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. चवदाव्या अध्यायांत गोलसंबंधे विचार व प्रश्न आहेत. पंधराव्यांत १२० आर्यांत पाटीगणित झणजे अंकगणित आणि क्षेत्रफळघनफळ आहे. त्यांत भास्कराच्या लीलावतींतले बहतेक विषय आहेत. १६ व्यांत भुवनकोश ह्मणजे त्रैलोक्यसंस्थाविवेचन आहे. १७ व्यांत ग्रहमध्यगतीची उपपत्ति इत्यादि आहे. व १८ व्यांत बीजगणित, त्यांतही मुख्यत्वें कुट्टकगणित आहे. त्यांत ब्रह्मगुप्तापेक्षा काही विशेष दिसतात. याने संख्या दाखविण्याकरितां पाटीगणितांत मात्र प्रसिद्ध संज्ञा योजिल्या आ हेत, बाकी सर्वत्र संख्या दाखविण्यास अक्षरसंज्ञा योजिल्या अंकसंज्ञा. आहेत. त्या संज्ञा पहिल्या 'आर्यभटाहून भिन्न आहेत. त्या अशा:वर्ण. वर्णबोधितसंख्या. वर्ण. वर्णबोधितसंख्या. क, ट, प, य -१ च, त, ष - ६ ख, ठ, फ, र = २ छ, थ, स = ७ ग, ड, ब, ल -३ ज, द, ह = ८ घ, ढ, भ, व = ४ झ, ध, = ९ ङ, ण, म, श = ५ ञ, न, = ० वर्णांनी संख्या दाखवितांना "अंकानां वामतोगतिः" हा नियम पहिल्या आर्यभटानें सोडिला नाही, परंतु यानें सोडिला आहे. आणि डावेकडून उजवेकडे मांडित जावयाचे असा नियम ठेविला आहे. उदाहरण या पद्धतीने घडफ ह्मणजे ४३२ होतात.* या अक्षरसंज्ञांनी कसा घोटाळा होतो हे पहिल्या आर्यभटाच्या वर्णनांत दाखविलेंच आहे, तेंच यासही पूर्णपणे लागू आहे. याच्या सिद्धांतांतील भगणादि माने आणि यांत दिलेली पाराशरसिद्धांतांतील माने कल्पांतली खाली दिली आहेत.

  • स ७ भावः ४४ कामता ६५१ जद्विकरा २१९८ नारीरधीरयः ।।

जादुजारमराः कांडाः प्रश्नाऽनपपदाक्षराः॥ या श्लोकांत वर सांगितलेल्या अंकसंज्ञांनी तैत्तिरीयसंहितेतील कांडे, प्रश्न (अध्याय ), अनुवाक, पन्नासा, पदें आणि अक्षरें सांगितली आहेत. अंक उजवीकडून डावेकडे लिहावयाचे हा नियम यांत आहे (व त्याप्रमाणे एथे लिहिले आहेत.) कांहीं अंकांविषयी संशय आहे, ते लिहिले नाहींत. हा श्लोक तैत्तिरीय प्रातिशाख्यांतला आहे असे एका तेलंग ब्राह्मणाने मला सांगितले. मी तें प्रातिशाख्य पाहिले नाही.