पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२९) पाहिले तर त्याने आपल्यास आर्यभटाशिष्य असें कोठे झटले नाही. उलट त्या श्लोकांतील शब्दांवरून तो आर्यभटाचा शिष्य नव्हता असें सहज मनांत येते. यावरून त्याचा काल शके ४२० हा नव्हे. आर्यभटाच्या मागाहून बरेच वर्षांनी ता झाला असावा. लल्लाने रेवती योगतारेचा भोग ३५९ अंश दिला आहे. लल्लतंत्राप्रमाणे स्थिति मोजण्याचें जें आरंभस्थान (ह्मणजे स्पष्टमेषसंक्रमणकाली जें सूर्याचें स्थान ) त्याच्या पश्चिमेस एक अंशावर रेवती योगतारा असण्याचा काल सुमारे शके ६०० येतो. परंतु ब्रह्मगुप्तास लल्लाचा ग्रंथ माहित नव्हता असें वर दाखविलेंच आहे.व लल्लाच्या ग्रंथांत ब्रह्मगुप्ताने सांगितलेलें तुरीय यंत्र नाहीं, बाकी सर्व आहेत. यावरून ब्रह्मगुप्ताचा ग्रंथ लल्लास माहित नव्हता असे दिसते. यावरून दोघे समकालीन, परंतु परस्परांपासून दूर रहाणारे असावे असें अनुमान होते. लल्लरूत रत्नकोशाच्या आधारे श्रीपतीने रत्नमालाग्रंथ केला आहे. श्रीपतीचा काल शक ९६१ हा आहे. त्याच्या पूर्वी बराच काल लल्ल झाला असला पाहिजे. याच्या ग्रंथांत अयनचलनाचा विचार मुळीच नाही. यावरून तो ब्रह्मगुप्ताच्या सुमारासच झाला असावा. सर्व गोष्टींचा विचार करितां लल्लाचा काल सुमारे शके ५६० असावा असें अनुमान मी करितों. धीवृद्धिदकार लल्लास भास्कराचार्याने पुष्कळ दोष दिले आहेत, हे खरे, तरी पूर्वोक्त बीजसंस्कार त्याने स्वतः दृक्प्रत्यय घेऊन काढिला योग्यता. असें वरील २० व्या श्लोकांत तो ह्मणतो. यावरून तो स्वतः वेध घेणारा आणि शोधक होता असे दिसून येते; आणि ही गोष्ट त्यास मोठी भूषणास्पद आहे. बुधादिकांच्या संस्कारावरून दिसते की, तो संस्कार देणे आर्यभटानंतर कांहीं कालाने अवश्य झाले असले पाहिजे. हा लल्लोक्त संस्कार प्रथमार्यसिद्धांतोक्त ग्रहांस देऊन करणप्रकाश (शके १०१४) आणि भटतुल्य (शके १३३९) हे करणग्रंथ झाले आहेत, हे पूर्वी सांगितलेच आहे. पद्मनाभ. या नांवाच्या एका बीजगणितग्रंथकाराचा उल्लेख भास्कराचार्याच्या बीजगाणतांत आला आहे. पुढे वर्णिलेल्या श्रीधराच्या ग्रंथावरून तो श्रीधराच्या पूर्वी झाला असावा असें *कोलबकने लिहिले आहे. तेव्हां धीधराच्या कालावरून पद्मनाभाचा काल शके ७०० हून अर्वाचीन नाहीं असें दिसून येते. श्रीधर. पुढे वर्णिलेल्या महावीराच्या ग्रंथावरून दिसते की, त्याच्या पूर्वी श्रीधर नांवाचा एक ग्रंथकार होऊन गेला, आणि त्याचा व्यक्त गणितावर भास्कराचार्याच्या लीलावतीसारखा एक ग्रंथ होता. *कोलबकाला श्रीधराचा गणितसार म्हणून एक

  • Oolebrooke's Mis. Ess. pp. 422,450, 470 पहा.