पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) मा इदं । तुच्छेनाभ्वपिहितं यदासीत ॥ तमसस्तन्महिमा जायते ॥ कामस्तदने समवर्तताधि। मनसो रेतः प्रथमं यदासीत् ।। सतो बंधुमसति निरविंदन् । हादि प्रतीष्या कवयो मनीषा ॥ तिरथीनो विततो रश्मिरेषां ! अधस्विदासीदपरिस्विदासी३त् ॥ रतोधा आसन् महिमान आसन् । स्वध. अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥ तै. बा. २. ८.९. या वाक्यांत पूर्वसृष्टीचा प्रलय होऊन उत्तरसृष्टि उत्पन्न होण्यापूर्वी, सत् नव्हते असत्ही नव्हतें; आकाशही नव्हतें उदक नव्हते; मृत्यु नव्हता अमृत नव्हतें: रात्रि दिवस प्रकाशित करणारे कोणी ( सूर्यचंद्र) नव्हते; केवल ब्रह्म मात्र होते: पढ़ें त्याच्या मनास सृष्टि उत्पन्न करण्याची इच्छा झाली; पुढे सर्व जगत् उत्पन्न झालें. इत्यादि वर्णन करून पुढे असें मटले आहे: को अद्धा केद क इह प्रवोचत् ॥ कुत आजाता कुत इयं विसृष्टिः ॥ अर्वाग्देवा अस्य विसर्जनाय॥ अथा को वेद यत आबभूव ॥ इयं विसृष्टिर्यत आबभूव ॥ यदिवादधे यदिवा न ॥ यो अस्याध्यक्षः परमे व्योमन् । सो अंग वेद यदि वा न वेद ॥ किं* स्विदूनं कउस वृक्ष आसीत् ॥ यतो द्यावापथिवी निष्टतक्षुः ।। तै. बा. २. ८. ९. ही विविधसृष्टि कशापासून झाली, कशाकरिता झाली, हे वास्तविक कोण जाणतो ? अथवा कोण सांगू शकतो? देवही मागाहून झाले. मग ज्यापासून ही सृष्टि उत्पन्न झाली तें कोण जाणतो! ज्यापासून द्यावापृथ्वी घडल्या तो वृक्ष कोणता, कोणत्या वनांत होता हे कोण जाणतो! या सर्वाचा अध्यक्ष परमाकाशामध्ये आहे तोच हे जाणतो. अथवा तो तरी जाणतो किंवा नाही हे कोणास ठाऊक ? जगदुत्पत्तीचे कारण जाणणारा कोणी नाही, तर उत्पत्तिक्रमही प्रत्यक्ष कोणाला ठाऊक नाही, असाही अभिप्राय वरील विचारांत आहे हे उघड आहे. ऋग्वेदांतही एके ठिकाणी तिलो द्यावः सवितुर्दा उपस्था एका यमस्य भुवने विराषाद ॥ आणिं न रथ्यममृताधि तस्थुः. क.सं. १. ३५.६ "द्युलोक तीन. त्यांतून दोन सवित्याच्या उदरांत [ आणि ] एक यमाच्या भुवनांत...[आहे]...[चंद्रतारादि] अमर [त्या] वर बसले आहेत." असे सांगून पुढे त्याच कचेंत ऋषि ह्मणतोः इह ब्रवीतु य उ तचिकेतत् ।। "हे सर्व ज्याणे जाणलें असेल असा कोणी असल्यास त्यास एथे येऊन तें सांगू या. " सारांश हे प्रत्यक्ष जाणणारा कोणी नाही, असे सांगण्याचा ऋषीचा हेतु आहे. असें जरी आहे तरी जगत्संस्थानाचे, निदान पृथ्वीसंस्थितीचे तरी ज्ञान वेदकालीही चांगले होते असे दिसून येते. सर्व जगाविषयी काही सांगावयाचे असतां रोदसी, यावापृथ्वी, ह्या किंवा ह्या अर्थाच्या दुसन्या शब्दांनी आकाश आणि पृथ्वी यांच्या विश्वसंस्था. समुच्चयास अनुलक्षून सांगितलेले पुष्कळ ठिकाणी आढळतें. ह्मणजे जगाचे यौ आणि पृथ्वी हे दोन भाग मानले आहेत असे दिसून येते. कोठ कोठे द्युलोक तीन आहेत असे वर्णन आहे. ऋक

  • किं रिवहनं हा मंत्र वाजसनीयसंहितेतही ( १७. ३२.) आला आहे. तसेच. हे सर्व मंत्र नरवसंहितेतही (१०. १२९) आहेत.