पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२१) दिले आहेत, आणि ते फार महत्वाचे आहेत. त्यांत एक दूषणाध्याय आहे. एकांत अंकगणित आणि एकांत बीजगणित आहे. एकांत यंत्रे आहेत. बाकी बहुतेकांत मुख्यतः पूर्वार्धातील गोष्टींची उपपत्ति आह. १२ वा अध्याय अंकगणित आणि क्षेत्रफलदिक यांविषयी आहे.त्यांत ५६ आर्यांत भास्कराचार्याच्या लीलावतीत असलेले बहुतेक विषय आहेत. 30वांत मुख्यतः बीजगणित आहे. त्याच्या १०२ आर्या आहेत. बीजगणित हा शब्द त्यांत कोठे आढळत नाही. अध्यायास कुटक असें नांव आहे. भास्कराचार्याच्या बीजगणितांतले बरेच विषय त्यांत आहेत. त्यांत कुट्टक म्हणून एक प्रकरण आहे.तें मुख्यतः ज्योतिषांतील मध्यमग्रहादिकांकडेच योजना करण्याच्या हेतूने दिले आहे. ब्रह्मसिद्धांताचे २४ अध्याय आहेत. त्यांच्या १००८ आर्या आहेत. ब्रह्मसिद्धांताच्या पहिले १० अध्यायांवरील पृथूदकटीका डे. का. पुस्तकसंग्रहांत आहे. संपूर्ण टीका कोल ब्रूक यास मिळाली होती असे त्याने टीका. लिहिले आहे. संपूर्ण टीका माझ्या पाहण्यांत नाही. कोलब्रूकनें इ. स. १८१७ मध्ये ब्रह्मसिद्धांतांतल्या अंकगणित आणि बीजगणित या दोन अध्यायांचे इंग्लिश भाषांतर केले आहे. ब्रह्मगुप्ताने ब्रह्मसिद्धांतांत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आर्यासंख्या सांगितली आहे. मूलग्रंथांत मागाहून फेरफार होतात असे त्याच्या प्रक्षेप. अनुभवास आल्यावरून त्याने हा बंदोबस्त केला असावा असे दिसते. इतका बंदोबस्त आहे, तथापि पांच सात आर्या कमजास्त झाल्या आहेत असे दिसते. तीन आर्या तर टीकेशिवाय असलेल्या पुस्तकांत आहेत, परंतु पृथूदकटीकापुस्तकांत नाहीत. त्यांत एक लक्ष्यांत ठेवण्यासारखी आर्या स्पष्टाधिकारांत विष्कंभादिक योगांसंबंधे आहे. तीत योगसाधनरीति आहे. परंतु सटीक पुस्तकांत ती मुळीच नाही. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळी सांप्रतच्या पंचांगांतले वि योग. R_कंभादि २७ योग हे एक अंग, अर्थात् त्यांतले व्यतिपात वैधृति इत्यादि योग नव्हते, असे मला वाटते. पंचसिद्धांतिकेंतही ते नाहीत. याविषयी जास्त विवेचन पंचांगविचारांत करूं. याच्या खंडखाद्यग्रंथाविषयी थोडेसें विवेचन करूं. खंडखाद्य हे नांव चमत्कारिक खंडखाद्य. आहे. असें नांव देण्याचा काय हेतु नकळे. याचे पूर्व आणि उत्तर असे दोन भाग आहेत. पूर्वार्धात ९ अधिकार आहेत. त्यांच्या १९४ आर्या आहेत. उत्तरांत ५ अधिकार आणि ७१ आर्या आहेत. पूर्वार्धात प्रथमच ब्रह्मगुप्त म्हणतोः वक्ष्यामि खंडखाद्यकमाचार्यार्यभटतल्यफलं ॥ २॥ प्रायेणार्यभटेन व्यवहारः प्रतिदिनं यतोऽशक्यः ॥ उद्वाहजातकादिषु तत्समफललघुतरोक्तिरतः ॥ २ ॥ आर्यभटाच्या ग्रंथाने प्रत्यहीं व्यवहार प्रायः अशक्य म्हणून ज्याने त्याच्याशी तुल्य असें फल येईल म्हणजे त्याच्यासारखे ग्रहादि येतील असें हें करण सांगतो असे यांत तो म्हणतो. खंडखायांत वर्षमान मूलसूर्यसिद्धांताचें म्हणजे ३६५।१५।३१।३० घेतले आहे. आर्यसिद्धांताचें घेतले नाही. आणि त्यामुळे युगप्रवृत्ति स्वतःच्या