पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२३) सिद्धांताप्रमाणे किंवा आर्यभटसिद्धांताप्रमाणे सूर्योदयीं न मानता मूलसूर्यसिद्धांताप्रमाणे अर्धरात्रीं मानावी लागली. खंडखायांत आरंभवर्ष शके ५८७ आहे, आणि त्या वर्षी स्पष्टमानाने अमांत वैशाख शुक्ल प्रतिपदा तिथि रविवारी येते. त्या रविवारच्या पूर्व मध्यरात्रीचे झणजे अमांत चैत्र कृष्ण ३० शनिवार मध्यरात्रीचे क्षेपक दिले आहेत. आणि तेव्हांपासून अहर्गण साधला आहे. मध्यममेषसंक्रमण मूलसूर्यसिद्धांताप्रमाणे त्याच शनिवारी घ. १२ प.९ यावेळी येतें. क्षेपक दिले आहेत ते असेःरा. अं. क. वि.. रा. अं. क. वि. सूर्य ३२ २२ बुध९ ० ४४ ४९ चंद्र० ९ ९ ४३ गुरु ६ ४ २५ १६ चंद्रोच्च १० ८ २८ ९ । शुक्र० ० १९१४ राहु . १८४७ २३ शनि ९ ६ ४११६ मंगळ३ १०, १३ ६ मूलमूर्यसिद्धांताची भगणादिमानें पूर्वी दिली आहेत (पृ. १६६), त्यांवरून शके ५८७ चैत्र कृष्ण ३० शनिवार मध्यरात्रीचे ग्रह काढले तर चंद्रोच्च आणि राहुखेरीज करून वरील क्षेपकांशी अगदी बरोबर मिळतात. आर्यभटसिद्धांतावरून काढलेल्या ग्रहांशी मिळत नाहीत. यावरून वर्षमान, अहर्गणारंभ आणि बहुतेक क्षेपक या सर्व गोष्टींनी खंडखायकरण मूलसूर्यसिद्धांताशी मिळतें. मूलसूर्यसिद्धांतांतले राहुभगण समजले नाहीत. चंद्रोच्च मूलसूर्यसिद्धांताशी मिळत नाही, परंतु आर्यभटसिद्धांताशी किंवा ब्रह्मसिद्धांताशीही मिळत नाही. राहु शेवटल्या दोहोंपैकी कोणाशीही मिळत नाही. ब्रह्मासिद्धांताचें वर्षमान आणि वर्षारंभ ह्यांहून खंडखायांत वपमान आणि वर्षारंभ भिन्न स्वीकारल्यामुळे ब्रह्मसिद्धांतांतील चंद्रोच्च आणि राहु खंडखायांत घेऊन उपयोग नव्हता हे उघड आहे. खंडखाय आर्यभटसिद्धांताशी सर्वांशी मिळत नाही हे खरे आहे, तरी आर्यभटीयांतील कांहीं मानें मूलसूर्यसिद्धांताबरोबर असल्यामुळे शके ५८७ मध्ये खंडखायावरून येणारी ग्रहमध्यमस्थिति आर्यभटसिद्वांताशी फारच मिळती निघत होती. खंडखाद्याच्या उत्तरार्धात ब्रह्मगुप्त प्रथमच म्हणतो की, आर्यभटाचे ग्रहस्पष्टीकरण स्फुट (हकप्रत्ययद ) नाही म्हणून ते सांगतों. त्याजवर टीकाकार वरुण म्हणतो की, 'आर्यभटतुल्य ग्रंथ करितों असें ब्रह्मगुप्ताने म्हटले त्याप्रमाणे पूर्वार्धात केलें. उत्तराधीत दृप्रत्यय येईल असा फलसंस्कार आपल्या सिद्धांतावरून सांगितला आहे. त्यांत जे सांगितले नाहीं तें आर्यभटकरणावरून घ्यावें. ' यावरून आणि उत्तरार्धातील इतर प्रकरणांवरून दिसते की दृक्प्रत्यय येण्याजोगा फेरफार मात्र त्याने खंडखाद्यांत केला आहे. वर्षमान, ग्रहमध्यमगति, क्षेपक, युगारंभवेला, ह्या महत्वाच्या गोष्टी आर्यभटाच्या ग्रंथांतून घेतल्या आहेत. हा आर्यभटाचा ग्रंथ त्याचा सिद्धांत हल्ली उपलब्ध आहे तो नव्हे, तर आर्यभटाचा करणग्रंथ होय असें वरुणाचा वरील उल्लेख इत्यादिकांवरून दिसते. स्वतःच्या सिद्धांताशी तुल्य असें करण करण्याचे सोडून, ज्या आर्यभटावर याने दृषणांची वृष्टि केली आहे, ज्याचा हा पूर्ण प्रतिस्पर्धी, त्याच्या ग्रंथासारखा ग्रंथ

  • पंचसिद्धांतिकेंतही अमावास्येच्या सुमारास मध्यममेषसंक्रमण हीच सोय साधली आहे, हे वराहमिहिरवर्णनांत सांगितलेच आहे. इतर गोष्टींतही दोहोंचें पुष्कळ साम्य आहे.