पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२५) पंचांग सायनमानाचे असावे की निरयनमानाचें असावे याबद्दल सांप्रत वाद आहे. त्यांत सायन गणनेस अनुकूल अशी गोष्ट वरील सायन. विचारावरून दिसून येते की ब्रह्मगुप्ताचें मूळ मत सायनरविसंक्रमण तेंच वास्तविक संक्रमण असें होतें. आणि त्याप्रमाणे वर्षमानही बदलावे असा त्याचा उद्देश होता व त्याप्रमाणे त्याने बदलले. आपले सर्व आयुष्यांत वेध घेऊन त्यांची तो तुलना करिता तर सायनवर्षाचें खरें मान त्याच्यासारख्या शोधकास समजणे अशक्य नव्हते. कदाचित् तें मान त्यास समजले असले तरी परंपरागत वर्षमान सोडण्याचे धैर्य त्यास झालें नसेल. त्याचें वर्षमान इतरांहून कमी आहे याचे कारण मी काढले आहे तें मी सायनमताचा अभिमानी ह्मणून काडिलें असें नाहीं. निरयनमताच्या पूर्ण अभिमान्यासही तें कबूल केले पाहिजे. ब्रह्मसिद्धांतांतील ग्रहभगणसंख्या वर दिल्या आहेत त्या इतर सिद्धांतांहून थोड थोड्या भिन्न आहेत. तथापि शके १२१मध्ये ब्रह्मसिद्धांतावरून ग्रहशुद्धि. वेध. निघणाऱ्या मध्यमग्रहांची आधुनिक युरोपियन ग्रंथांवरून निघणाऱ्या ग्रहांशी तुलना पूर्वी केली आहे (पृ० २००), तीत दोहोंमध्ये फार अंतर नाही. यावरून स्वकालीं ग्रह वेधास मिळतील अशा भगणसंख्या ब्रह्मगुप्तानें कल्पिल्या असें दिसतें. मंदोच्चे आणि पात यांची तुलना वर केली आहे (पृ. २०५) तीवरून त्याबद्दलचाही त्याचा स्वतंत्र शोध दिसून येतो. तेव्हां वर्षमान, ग्रहभगणसंख्या, उच्चपातभगणसंख्या, यांवरून ब्रह्मगुप्त हा स्वतः वेध घेऊन स्वतंत्रपणे शोध करणारा होता असें स्पष्ट दिसून येते. आणि ज्योतिःशास्त्रांत हीच मुख्य महत्वाची गोष्ट आहे. अशा पुरुषाच्या अंगीं जें तेज व जो योग्य स्वाभिमान असावा तो त्याच्या ग्रंथांत जागोजाग व्यक्त झाला आहे. स्पष्टाधिकारांत तो ह्मणतोः ब्रह्मोक्तमध्यरविशशितच्चतत्परिधिभिः स्फटीकरणं कृत्वैवं स्पष्टतिथिर्दूरभ्रष्टान्यतंत्रोक्तैः ॥ ३१॥ । अ. २. यांत अन्यतंत्रांची तिथि दूरभ्रष्ट झाली, ब्राह्मावरून आलेले रविशशि आणि त्यांवरून आलेलीच तिथि शुद्ध होय, असें तो ह्मणतो. आर्यभटस्याज्ञानान्मध्यममंदोचशीघ्रपरिधीनां ॥ न स्पष्टा भौमाद्याः स्पष्टा ब्रह्मोक्तमध्यायः ॥ ३३ ॥ अ. २. यांत ब्रह्मसिद्धांताचे मध्यमग्रह, मंदोचें, शीघ्रपरिधि, यांवरून मात्र भौमादि स्पष्ट येतात, आर्यभटाचे चुकतात, असें तो ह्मणतो. अशी दुसरीही बरीच उदाहरणे आहेत. हा अभिमान किंचित् जास्त होऊन कांहीं स्थलीं तो दुरभिमान झाला आहे असें मटल्यावांचून मात्र राहवत नाही. दूषणाध्याय म्हणून ६३ आयींचा एक स्वतंत्र अध्याय (११ वा) त्याने आपल्या सिद्धांतांत दिला आहे. त्यांतील आर्यभटास दिलेली कांहीं दूषणे केवळ दुराग्रहाची आहेत. उपोद्घातांत सांगितलेले बहुतेक सिद्धांतांत असणारे जे अधिकार ते याने आपग्रामसिद्धांत विपल्या सिद्धांतांत आरंभी १० अध्यायांत दिले आहेत त्याने पुढे जास्त चवदा अध्यायांत पुष्कळ जास्त विषय