पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आणि करणग्रंथ हे झाले होते आणि यात्रा या विषयावरील ग्रंथ बृहज्जातकानंतर झाला असें बृहज्जातकांतील पुढील श्लोकांत आहे. अध्यायानां विंशतिः पंचयुक्ता जन्मन्येतयात्रिकं चाभिधास्ये ॥३॥ ...विवाहकालः करणं ग्रहाणां प्रोक्तं पृथक तद्विपला च शाखा ॥ ६॥ बृ. जा. उपसंहाराध्याय. यांत करणग्रंथ मटला आहे तो पंचसिद्धांतिका हाच होय. त्यांत पूर्वी एखादा ग्रंथ रचिला असल्याचा उल्लेख नाही. यावरून व त्याच्या वयाच्या विचारावरून पंचसिद्धांतिका हाच वराहाचा पहिला ग्रंथ असे दिसते. त्याच्या विवाहावरलि ग्रंथाचे नांव बृहद्विवाहपटल असें होते, असें उत्पलरुत बृ. सं. टीका अध्या १. यावरून दिसून येते. तो आणि त्याचा यात्रेवरील ग्रंथ हे सांप्रत उपलब्ध नाहीत. होरा या शाखेवर बृहज्जातकावेरीज त्याचाच लघुजातक ह्मणून एक ग्रंथ आहे. त्यांत तो ह्मणतोः होराशानं वृत्तैर्मया निवर्दू निरीक्ष्य शास्त्राणि ॥ यत्तस्याप्यार्याभिः सारमहं संप्रवक्ष्यामि ॥ १॥ यावरून दिसते की, लघुजातक हा बृहज्जातकाचाच संक्षेप आहे. एकंदरीत याच्या ग्रंथांचा कालक्रम असा लागतो. पंचसिद्धांतिका, विवाहपटल, बृहज्जातक, लघुजातक, यात्रा, बृहत्संहिता. यांतील लघुजातक ग्रंथ कदाचित् यात्रा आणि बृहत्संहिता यांच्या मागाहून झाला असेल. यांपैकीं बृहज्जातक, लघुजातक हे अद्यापि ज्योतिष्यांच्या पुष्कळ प्रचारांत आहेत. आणि ते दोन्ही मुंबई, पुणे, काशी वगैरे ठिकाणी छापले आहेत. आणखीही कितीक ठिकाणी ग्रंथप्रसार. कितीक लिपीत छापले असतील. बृहत्संहिता ग्रंथ नुस्तें मूळ डा. केर्न याने छापिलें आहे, आणि त्याने त्याचे इंग्रजी भाषांतरही करून रायल एशियाटिक सोसायटीच्या ५ व्या पुस्तकांत छापले आहे, कलकत्ता एथे बिब्लिओथिका इंडिकामध्ये बृहत्संहितामूल छापले आहे. रत्नागिरी एथे जगन्मित्र छापखान्यांत बृहत्संहितामूल आणि तिचे मराठी भाषांतर छापलें आहे. मटोत्पल हा वराहाचा प्रसिद्ध टीकाकार होय. बृहत्संहिता आणि बृहज्जातक हे ग्रंथ स्वतःच उपयुक्त असल्यामुळे अद्यापि प्रचारांत आटीका. हेत हे खरे; तरी त्यांच्या प्रचारास उत्पलटीका विशेष कारणीभूत झाली असें ह्मटले असतां चालेल. बृहत्संहिताटीकेत नीराजनविधिविषयांत “यात्रायां व्याख्यातं " असें उत्पल म्हणतो. यावरून यात्राग्रंथावर उत्पलटीका होती असे दिसते. लघुजातकावरही उत्पलव्याख्या आहे. बाकीच्या वराहाच्या ग्रंथांवर उत्पलटीका होती असें दिसत नाही. उत्पलटीकाकाल सुमारे शके ८८८ ह्मणजे वराहाच्या मागून सुमारे ४०० वर्षे आहे. उत्पलाच्यापूर्वीही बृहत्संहितेवर काही टीका होत्या असें राहुचार टीकेंत व इतर २।३ स्थली अन्ये एवं व्याचक्षते' असें तो ह्मणतो त्यावरून दिसते. · बृहज्जातकावरील महीदास आणि महीधर यांच्या टीका डे. कालेजसंग्रहांत आहेत (नं. ३४१,३४३ सन १८८२८३). याच्या बृहत्संहिता आणि बृहल्लघुजातक या ग्रंथांविषयी जास्त विवेचन पुढे