पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथवर्णन. करू. गणितस्कंधावरील याचा ग्रंथ जो पंचसिद्धांतिका त्याविषयी बहुतेक विवेचन पूर्वी झालेच आहे. राहिलेलें एथे करूं. ग्रहांच्या वक्रानुवक्रास्तोदयादिकांविषयी मी करणग्रंथांत सांगितलें अशी त्याची एक आर्या वर दिलीच आहे. तसेच आणखी तो म्हणतोः युद्धं यदा यथा वा भविष्यमादिश्यते त्रिकालज्ञैः ॥ तद्विज्ञानं करणे मया कृतं सूर्यसिद्धांतात् ॥ बृ. सं.अ. १७. आणि या सर्व गोष्टी त्याने पंचसिद्धांतिकंत सांगितल्या आहेत. या व दुस-याही प्रमाणांवरून पंचसिद्धांतिका हाच त्याचा करणग्रंथ होय. पंचसिद्धांतिका हे नांव त्याने त्या ग्रंथांत कोठे दिले नाही. अष्टादशभिर्वध्वा ताराग्रहतंवमेतदध्यायैः ।। भजते वराहमिहिरो ददाति निर्मत्सरः करणं ॥ ६५ ॥ पं. सि.अ. १८. यांत तो त्यास करण आणि तंत्र असे म्हणतो. पंचसिद्धांतिकेंत आणखी एके स्थली त्याने त्या ग्रंथास करण किंवा तंत्र असे म्हटले आहे. उत्पलाने त्यास पंचसिद्धांतिका म्हटले आहे. या ग्रंथांत त्याने पांच सिद्धांतांचा अनुवाद केला आहे असें पूर्वी दाखविलेंच आहे. सूर्यसिद्धांतोक्त मध्यमग्रहांस त्याने स्वतःचा एक बीजसंस्कार सांगितला आहे तो असाः क्षेप्याः शरेंदु १५ विकलाः प्रतिवर्ष मध्यमक्षितिजे । दश १० दश गुरोविंशोध्याः शनैश्चरे सार्धसप्त ३० युताः ॥ १० ॥ पंचद्वया २५ विशोध्याः सिते बुधे खाश्विचंद्र १२० युताः ॥ पंचसिद्धांतिकेंतला कोणताही सिद्धांत वराहमिहिरकत नव्हे असें पूर्वी सांगितलेंच आहे. आणि या बीजसंस्कारावरून तर ती गोष्ट निर्विवाद सिद्ध होते. जर त्यांतील एखाया सिद्धांतांतील ग्रहगतिस्थिति याच्या असत्या तर हा बीजसंस्कार सांगण्याचे कारणच नव्हते. हा बीजसंस्कार धरून भास्वतीकरणांतले क्षेपक मिळतात असें पूर्वी सांगितलेच आहे. मध्यमग्रह वराहमिहिराने निरनिराळ्या सिद्धांतांतले दिले आहेत. ग्रहणविचारही निरनिराळ्या सिद्धांतांचे निरनिराळे दिले आहेत. तथापि यत्तत्परं रहस्यं भ्रमात मतिर्यत्र तंत्रकाराणां ॥ तदहमपहाय मत्सरमस्मिन् वक्ष्ये ग्रहं भानोः ।। ५ ।। दिकस्थितिविमर्दकर्णप्रमाणवेलाग्रहाग्रहाविंदोः ।। ताराग्रहसंयोगं देशांतरसाधनं चास्मिन् ॥ ६ ॥ सममंडलचंद्रोदय यंत्रछेद्यानि तांडवछाया ।। उपकरणाद्यक्षज्यावळंबकापक्रमाद्यानि ।। ७॥ अध्याय . तसेंच प्रद्युम्नो भूतनये जीवे सौरे च विजयनंदी ।। ५९ ॥ भग्नावतः स्फुटमिदं करणं दृष्टं वराहमिहिरेण ॥ अध्याय १८ यावरून ह्याच्या पूर्वीच्या तंत्रकारांस ज्या काही गोष्टी बरोबर साधल्या नव्हत्या