पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) वराहमिहिर बृहज्जातकांत ह्मणतो:-- कुल स्थल आदित्यदासतनयस्तदवाप्तबोधः कापित्यके सवितृलब्धवरप्रसादः ॥ इत्यादि आवंतको मुनिमतान्यवलोक्य सम्यघ्योरां वराहमिहिरो रुचिरां चकार ॥९॥ उपसंहाराध्याय. यावरून त्याच्या पित्याचे नांव आदित्यदास होते; त्यापासून त्यास ज्ञान प्राप्त झाले होते; कापित्थक ऐथे त्यास सूर्याचा वरप्रसाद प्राप्त झाला; आणि तो अवंती एथील राहणारा होता; असे निष्पन्न होते. कापित्थक हे अवंतीच्या आसपास एखादे गांव असेल आणि तेथे तो काही दिवस राहिला असेल. तो सूर्यभक्त होता हे सर्व ग्रंथांत त्याने आरंभी मंगलांत मुख्यतः सूर्याचें स्तवन केले आहे त्यावरून दिसून येते. त्याचा ज्योतिःशास्त्राचा गुरु त्याच्या पित्याहून निराळा होता असें पंचसिद्धांतिकेंतील पुढील आर्येवरून दिसते. दिनकरवसिष्ठपूर्वान् विविधमुनीन् भावतः प्रणम्यादौ ॥ जनक गुरुं च शास्त्रे येनास्मिन नः कृतो बोधः ॥ २ ॥ अध्या . . तो अवंती ह्मणजे उज्जयिनी एथील रहाणारा होता असे त्याच्या दुसऱ्या स्थलींच्या ४५ उल्लेखांवरूनही दिसून येतें. भास्कराचार्य हे यवनदेशांत जाऊन त्यांनी ज्योतिःशास्त्र संपादिले अशी काही लोकांची समजूत ऐकण्यांत येते. परंतु त्यांचे ग्रंथ व त्यांच्या न पूर्वीचे ग्रंथ यांचा विचार करून पाहतां ही समजूत अगदी चुकीची आहे. ही गोष्ट कोणी वराहमिहिराविषयी सांगतात. परंतु त्याचे ग्रंथ व त्यांवरील भटोत्पलाची टीका पाहिली असता असे दिसतें की वराहाने केलेल्या सर्व ग्रंथांतल्या विषयांवर त्याच्या पूर्वीच विपुल ग्रंथ या देशांत झालेले होते. तेव्हां वराहास परदेशांत जाण्याचे काही कारण नव्हते. याने यात्रा, विवाह, गणित (करण), होरा आणि संहिता या विषयांवर ग्रंथ याचे ग्रंथ. केले. संहिताशाखेवर बृहत्संहिता ह्मणून याचा प्रसिद्ध ग्रंथ आहे तो सर्वांच्या शेवटी रचिला असें वक्रानु वक्रास्तमयोदयाद्यास्ताराग्रहाणां करणे मयोक्ताः। होरागतं विस्तरतश्च जन्म यात्राविवाहैः सह पूर्वमुक्तं ॥ १० ॥ अध्या१. या बृहत्संहितेंतील त्याच्या ह्मणण्यावरून दिसून येतें. होराशाखेवरील ग्रंथ वरील श्लोकांत झटला आहे तो बृहज्जातकच होय. बृहज्जातकापूर्वी विवाहावरील ग्रंथ (मागील पृष्ठावरून पढे चाल.) हलमंजरीनामक ग्रंथांतून घेतला असें त्यांनी सांगितले. तो श्लोक असाः-स्वस्तिश्रीनृपसूर्यसून जशके याते द्विवेदांबर ३०४२ मानाब्दामिते त्वनेहसि जये वर्षे वसंतादिके । चैत्रे श्वेतदले शुभे वसतिधावादित्यदासादभूद्वेदांगे निपुणो वराहमिहिरो विप्रो रवेराशिभिः ॥ यांत युधिष्ठिर शक ३०४२ या वर्षी सूर्याच्या आशीर्वादाने आदित्यदासपुत्र वराहमिहिर जन्मला असें झटले आहे. पंचसिद्धांतिकादिकार वराहमिहिरही 'आदित्यदासतनय ' आणि 'सवितृलब्धप्रसाद' होता. परंतु या श्लोकांतील संवत्सर कोणत्याही पद्धतीने गणिताशी मिळत नाही. यावरून हा श्लोक विश्वसनीय नाही.