पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२११) संभव नाही. शके ४२७ मध्ये चैत्रशुक्ल (अमान्त वैशाख शुक्ल) प्रतिपदेच्या सुमारास मध्यम मेषसंक्रमण झाले. आणि त्या वेळची मध्यमग्रहस्थिति काढणे सोईचे, व अहर्गण शुक्ल प्रतिपदेपासून करण्याची रीति देणे सोईचे, म्हणून शक ४२७ हे वर्ष घेतले असेल. वस्तुतः ग्रंथ मागाहून झाला असेल, असा एक संभव आहे. परंतु तसे म्हटले तरी शके ४२७ च्या पूर्वी ४१९ मध्ये व नंतर ४३८ मध्ये मध्यममेषसंक्रमण शुक्लप्रतिपदेच्या सुमारास येतें.४१९ चा विचारच नको. ४३८ घेतले नाही. यावरून ४३८ च्या पूर्वी ग्रंथ झाला असें सिद्ध होतें. पंचसिद्धांतिकेंत आर्यभटाचें नांव आहे आणि त्याचा ग्रंथ शके ४२१ मधील आहे. तेव्हां ६ वर्षांत आर्यभटाचा ग्रंथ इतका प्रसिद्ध होण्याचा संभव कमी अशी एक शंका येते. परंतु तींत फारसा अर्थ नाही. वराहाचा ग्रंथ पुरा होण्यास ४२७ नंतरही पांच चार • वर्षे लागण्याचा संभव आहे. तेव्हां त्याच कामाकडे लागलेल्या आणि अवंतीसारख्या प्रसिद्ध राजधानीत राहणान्या प्रख्यात ज्योतिष्याच्या दृष्टीस आर्यभटाचा ग्रंथ पडणे किंवा त्यांतील मते त्यास कळणे असंभवनीय नाही. शके ४२७ मध्ये वराहमिहिर स्वतः उदाहरणे करण्यासारख्या वयांत होता असें खात्रीने दिसते. तेव्हां तो १५ वर्षांचा होता असे मानले तर त्याचें जन्म शके ४१२ मध्ये येते. आणि मृत्युकाल ५०९. धरला तर त्यावेळी त्याचे वय ९७ वर्षे येते. ही गोष्ट अगदी असंभवनीय आहे असें नाही. यावरून एकंदरीत पाहतां वराहाचा जन्मकाल शके ४१२ च्या सुमारे आहे याविषयी अगदी संशय नाही. कदाचित् शक ४२७ हा त्याचा जन्मशक असेल ह्मणून त्याने ते वर्ष घेतले असेल. तथापि त्याचा जन्म शक ४२७ हून अर्वाचीन नाही याविषयी अगदीच संशय नाहीं. विक्रमाच्या नवरत्नांत ह्मणजे विक्रमशकाच्या आरंभाच्या सुमारास एक वराहमिहिर होता असें धन्वंतरिक्षपणकामरसिंहशंकुवेतालभट्टघटखर्परकालिदासाः ।। ख्यातो वराहमिहिरो नृपतेः सभायां रत्नानि वै वररुचिर्नव विक्रमस्य । या ज्योतिर्विदाभरणग्रंथांतल्या श्लोकांत आहे. हा ज्योतिर्विदाभरणयंथ रघु, कुमार, इत्यादि काव्ये करणान्या प्रसिद्ध कालिदासाने केला असें त्यांत सांगितले आहे. आणि वर्षेः सिंधुरदर्शनांबरगुणे ३०६८ र्याते कलौ संमिते मासे माधवसंज्ञिते च विहितो ग्रंथक्रियोपक्रमः॥ या श्लोकांत गतकलि ३०६८ ह्मणजे विक्रम संवत् २४ या वर्षी या ग्रंथास आरंभ झाला असे त्यांत मटले आहे. परंतु - शाकः शरांभोधियुगो४४५नितो हृतो मानं खतर्के ६० रयनांशकाः स्युः॥ ही अयनांश काढण्याची रीति या ग्रंथांत दिलेली आहे. आणि “मत्वा वराहमिहिरादिमतैः" असें पहिल्या अध्यायांत आहे. यामुळे त्या ग्रंथावर भरवसा ठवितां येत नाही. या ग्रंथाप्रमाणे विक्रमसंवताच्या आरंभाच्या सुमारास कोणी वराहमिहिर असल्यास तो पंचसिद्धांतादिकांच्या कर्त्यांहून निराळा असला पाहिजे.* पुण्यास राहणार कै. वा. रघुनाथशास्त्री टेंभूकर नामक एक ज्योतिषी यांनी वराहमिहिराच्या कालाविषयी मला एक लोक सांगितला. तो बेदर ऐथे राजाराम व्यंकटेश शास्त्री यांपासून कुत (पुढे चालू.)