पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१११) असला पाहिजे. याच्या मृत्युकालाविषयीं एक आधार देत असतात. तो असा की नवाधिकपंचशतसंख्यशाके वराहमिहिराचार्यो दिवं गतः ॥ हे वचन मूळचे श्लोकबद्ध आहे की गद्य आहे हे समजत नाही. लोकबद्ध असेल तर तें फारच अशुद्ध आहे. हे ब्रह्मगुप्तटीकाकार पृथुस्वामी याने दिले आहे असे कोणी म्हणतात; परंतु ब्रह्मगुप्तसिद्धांतावरील पृथूदकटीका पहिल्या १० अध्यायांवरची मी वाचली तींत हे वचन नाहीं. १० अध्यायांखेरीज गोलाध्यायावरील त्याची टीका व इतर अध्यायांवरची त्याची टीका मी वाचली नाही. तीत किवा खंडखाद्यावरील पृथूदकटीकेंत हे वचन असले तर नकळे. या पृथूदकाचा काल सुमारे शके ९०० आहे. तेव्हां वरील वचन पृथूदकाचेंच असेल तर स्वतः वराहाच्या ग्रंथांत आलेल्या ४२७ शकापेक्षा त्याच्या मागाहून चारशे वर्षांनी झालेल्याच्या लिहिण्यावर भरंसा ठेवणे तो विचारानेच ठेविला पाहिजे. प्रो० वेबर# म्हणतो की ब्रह्मगुप्तटीकाकार आमराज हा म्हणतो की वराहमिहिर शके ५०९ मध्ये मृत्यु पावला. त्याने मूलवचन दिले नाही, परंतु ते बहुधा वरीलच असावें. तेव्हां हे वचन पृथूदकाचें की आमराजाचें हाच संशय. आमराजाचे आणखी एक म्हणणे वेबरने दिले आहे कीं शतानंदाचा जन्म शके ९१७ मध्ये झाला. परंतु शतानंदाच्या भास्वतीकरणांत आरंभवर्ष शके १०२१ आहे. दुसरा एखादा शतानंद प्रसिद्ध नाही. तेव्हां शतानंदासंबंधे आमराजाचे म्हणणे अगदी चुकीचे आहे. अर्थात् वरील वचन आमराजाचे असेल तर त्याचीही योग्यता तितकीच. दुसरें असें की आमराज शके ९१७ नंतर म्हणजे वराहानंतर सुमारे चार पांच शतकांनी झाला. म्हणूनही त्याच्या म्हणण्याची योग्यता कमी. आणखी आमच्या लेखी पुस्तकांच्या शुद्धाशुद्धतेच्या मानाने पाहिले तर वरील वचन गद्यात्मक असल्यास ते जसेच्या तसेंच आजपर्यंत आले असेल याविषयीही संशयच. तर अशा ह्या वचनावर विश्वास ठेवून वराहमिहिर शके ५०९ मध्ये मृत्यु पावला असें म्हणण्यापेक्षां स्वतः त्याच्याच ग्रंथांतील शक ४२७, ज्याविषयी त्या वेळच्या दिलेल्या ग्रहस्थितीवरून संशयास जागाच नाही, तो विश्वसनीय होय हे स्पष्ट आहे. आतां हे खरे आहे की, करणग्रंथांत जो शक घेतला असतो त्याच वर्षी तो ग्रंथ पूर्ण झाला असेंच असेल असें नाहीं. केरोपंतांच्या ग्रंथांत शके १७७२ मधील उदाहरणे आहेत आणि तो शके १७८२ मध्ये छापला आहे. त्याप्रमाणे वराहाचा ग्रंथ, शके ४२७ च्या मागाहूनही पूर्ण झाला असेल. तसे असले तथापि शके ४२७ मध्ये किंवा त्या सुमारास मागे पुढे एक दोन वर्षांत त्या ग्रंथासंबंधे गणित करण्यास आरंभ झाला असला पाहिजे. एन्हवीं शके ४२७ हे आरंभवर्ष मानण्याचे कारण नव्हते. ४२७ मध्ये त्याचा जन्मच नसेल, तर तो शक घेण्याचा अगदीच संभव नाही. यावरून शके ४२७ च्या नंतर त्याचा जन्म झाला नाही हे उघड आहे. इतकेच नाही तर मला वाटते की तो त्या वर्षी निदान १५।१६ वर्षांचा असला पाहिजे. आणि तें वर्ष त्याने उदाहरणांस घेतले असले पाहिजे. ह्मणून करणग्रंथांत तें आलें. एन्हवीं येण्याचा फारसा

  • बेबरचे पुस्तक टीप २९३ पहा.