पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९५) . तीय आर्यसिद्धांत यांत मात्र शुद्धगणितही आहे. भास्कराचार्याचे सिद्धांताचें लक्षण वर दिले आहे (पृष्ठ ७), त्यांत द्विधागणित ह्मणजे व्यक्त (अंकगणित ) आणि अव्यक्त (बीजगणित ) यांचा समावेश त्याने सिद्धांतांत केला आहे. व त्याप्रमाणे लीलावती आणि बीजगणित हे जे त्याचे दोन ग्रंथ ते सिद्धांतशिरोमणीचेच भाग असें तो ह्मणतो. तरी ते स्वतंत्र ग्रंथ अशासारखे त्याने रचले आहेत. आणि त्यांतील कांहीं उल्लेखांवरून दिसून येते की भास्कराचार्याच्या पूर्वीच केवळ बीजगणितावर स्वतंत्र ग्रंथ झाले होते. दोन्ही आर्यभट आणि ब्रह्मगुप्त यांनी सिद्धांतांतच बीजादि गणिताचा संग्रह केला आहे, तरी ते विषय निराळ्याच अध्यायांत दिले आहेत. आर्यभटाच्या गणितपादांतील विषय थोडक्यात सांगतो. पहिली मंगलाची आर्या सोडून या पादाच्या ३२ आर्या आहेत. त्यांत दशगुणोत्तर संख्यांच्या संज्ञा, वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ त्रिभुज, वृत्त, आणि इतर क्षेत्रे, यांचें क्षेत्रफळ; धन, गोल, यांचे घनफळ, भुजज्यासाधन आणि त्यांविषयी काही विचार; श्रेढी, त्रैराशिक, भिन्नकर्म (अपूर्णांक), त्रैराशिकाने किंवा बीजगणिताने होणान्या एकदोन चमत्कारिक उदाहरणांचे प्रकार, आणि कुट्टक ह्मणून गणिताचा प्रकार आहे तो; इतके विषय गणितपादांत आहेत. टालमी आणि त्याचे पूर्वीचे ग्रीक ज्योतिषी यांस भुजज्या ( Sines ) माहीत नव्हत्या. ते ज्यां (chords) चा उपयोग करीत असत. आमच्या ज्योतिषाची माहिती युरोपियनांस होण्यापूर्वी त्यांची अशी समजूत होती की ज्या टाकून देऊन भुजज्या (ज्याधैं) यांचा उपयोग प्रथम केला असा इ. स. च्या ९ व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला आरब ज्योतिषी अलबटानी याने.* परंतु या आर्यभटाच्या ग्रंथावरून दिसून येते की शके ४२१ मध्ये आह्मांस अर्धज्या माहीत होत्या. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतही अर्धज्या आहेत. आणखी एक गोष्ट विशेषतः सांगण्यासारखी आहे की वृत्ताचा व्यास आणि परिधि यांचे गुणोतर आर्यभटाने फार सूक्ष्म दिले आहे ते असें :चतुरधिकं शतमष्टगुणं द्वाषष्टिस्तथा सहस्त्राणां ॥ अयतद्वयविष्कंभस्यासन्नो वृत्तपरिणाहः ॥ १०॥ गणितपाद. यांत २००० व्यासाच्या वर्तुलाचा परिधि ६२८३२ सांगितला आहे. म्हणजे १: ३.१४१६ हे गुणोत्तर झाले. हे तरी आसन्न (जवळ जवळ) असेंच झटले आहे. पृथ्वी प्रत्यही आपल्याभोवती फिरते, झणजे तिला दैनंदिन गति आहे, असें मा नणारा ज्योतिषी आमच्या देशांत एक हा आर्यभट मात्र पृथ्वीची दैनंदिनगति. होय. तो म्हणतोः अनुलोमगतिनौस्थः पश्यत्यचलं विलोमगं यद्वत् ॥ अचलानि भानि तद्वत् समपश्चिमगानि लंकायां ॥ गोलपाद. भटप्रकाशिकाटीकाकारानें “भानि कर्तृभूतानि अचलानि भूमिगतानि वस्तूनि कर्मभूतानि विलोमगानीव प्राची दिशं गच्छंतीव पश्यंति. अशाप्रकारें पृथ्वी अचल असेंच आर्यभटाचे मत असे प्रतिपादण्याचा यत्न केला आहे. परंतु आर्यभटाने

  • वसचे सू. सि. भाषांतर पृ० ५६ पहा.