पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९४) सृष्ट्युत्पत्तीस काही वर्षे लागली असे मानले नाही, असेंच सिद्ध होते. सर्व ग्रहांची उच्चे आणि पात यांचे भगण त्याने दिले असते तर कल्पारंभ तोच ग्रहप्रचारारंभ या गोष्टीस अनुसरूनच ते दिले असते. आर्यभटाने आपला काल असा दिला आहे:काल. षष्ट्यब्दानां षष्टियंदा व्यतीतात्रयश्च युगपादाः।। व्यधिका विंशतिरब्दास्तदेह ममजन्मनोतीताः॥ कालक्रियापाद. यावरून तीन युगपाद गेल्यावर ३६०० वर्षे गेली तेव्हां ह्मणजे गतकलि ३६०० या वर्षी, म्हणजे शके १२१ या वर्षी त्याच्या वयाची २३ वर्षे गेली होती. यावरून त्याचा जन्म शके ३९८ या वर्षी झाला असें सिद्ध होत. पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांताचें वर्ष ३६५।१५।३१।३० इतके आहे. आणि वर्षमान. आर्यभटसिद्धांतांतील माने वर दिली आहेत त्यावरून त्यां तील वर्षमान ३६५।१५।३१।१५ आहे. म्हणजे १५ विपळे कमी आहे. परंतु मूल (पंचसिद्धांतिकोक्त) सूर्यसिद्धांतांत कलियुगारंभ गुरुवार मध्यरात्री आहे. आणि आर्यभटानें तो शुक्रवारसूर्योदयीं मानिला आहे, म्हणजे १५ घटिका मागाहून मानिला आहे. परंतु याचें वर्षमान १५ विपळे कमी असल्यामुळे ३६०० वर्षांत बरोबर १५ घटिका कमी होतात. आणि त्यामुळे गतकलि ३६०० (शके ४२१) या वर्षी मूलसूर्यसिद्धांत आणि आर्यसिद्धांत यांप्रमाणे सूर्याचें मध्यममेषसंक्रमण म्हणजे वर्षारंभ एक कालींच झाला. आणि यावरून असे दिसून येते की युगारंभ सूर्योदयीं मानल्यामुळे जें अंतर पडेल ते न पडावं म्हणून याने वर्षाचें मान १५ विपळे कमी मानले आहे. याच्या कालाविषयी कदाचित् कोणास संशय असेल तर वरील वर्षमानावरून याच्या कालाविषयी संशयच रहात नाही. त्याचें जन्म शके ३९८ या वर्षीच होय. गणितपादाच्या पहिल्या आर्यंत आर्यभट म्हणतो की: स्थल. आर्यभटस्त्विहनिगदति कुसुमपुरेभ्यचितं ज्ञानं॥ यावरून याचे वसतिस्थान कुसुमपूर होय. हे बंगाल्यांतलें पाटणा होय असें समजतात. या आर्यभटाच्या सिद्धांतांत दशगीतिकपादामध्ये ग्रहभगणादि माने आहेत. पुढें गणित, कालक्रिया, गोल असे तीन पाद आहेत. गणित विषय. या पादामध्ये शुद्धगणितापैकी अंकगणित (पाटीगणित ), बीजगणित, भूमिति, त्रिकोणमिति यांतले काही विषय आहेत; आणि बाकी दोन पादांत केवळ ज्योतिषशास्त्रविषयक असेच विषय आहेत. ज्योतिःशास्त्र हा मटला ह्मणजे वस्तुतः सांप्रतच्या दृष्टीने प्रयुक्त गणिताचा विषय होय. तेव्हां त्यांत शुद्ध गणिताच्या संख्यागणित इत्यादि शाखा असण्याचे कारण नाही. परंतु ज्योतिषशास्त्रास शुद्ध गणिताने वारंवार कारण लागणारच. तेव्हां इतम्या प्राचीनकालाच्या ग्रथांत दोन्ही प्रकार एका ग्रंथांत असणे साहजिक आहे. असे मिश्रण तरी थोड्याच ग्रंथांत आढळते. मळच्या सूर्यादि सिद्धांतांत तें होत काय हे समजण्यास साधन नाही, परंतु पंचसिद्धांतिकेंत तें नाही. तसेच सांप्ररिता ही योमादि सिद्धांतांत नाही. हा आर्यसिद्धांत, ब्रह्मगुप्तसिद्धांत, आणि द्वि