पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/196

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९६) भगणादिमानांत नक्षत्रपरिवर्तन सांगतां भूभ्रम सोगितल आहेत (पृ. १५१ पहा). तसेंच 'प्राणेनैति कलां भः। झणजे प्राणनामक कालपरिमाण (पळाचा षष्ठांश) यांत पृथ्वी एक कला फिरते असें तो दुसरे स्थली (दशगीतिक आर्या ४) ह्मणतो. तसेंच ब्रह्मगुप्तादिकांनी पृथ्वी फिरते असें आर्यभटाचे जे मत त्यास दूषणे दिली आहेत. ब्रह्मगुप्त म्हणतोः । प्राणेनैति कलां भर्यदि तहि कतो ब्रजेत् कमध्वानं | आवर्तनमुश्चिन्न पतंति समुच्छ्याः कस्मात् ॥ ब्र. सि. अ. ११. भटप्रकाशिकाकाराने प्राणेनैतिकलांभूः या आर्यभटोक्त आर्येत 'भूः, याबद्दल भं (भमंडलं) असा पाठ घेऊन टीका केली आहे. "अनुलोम" या पुढील आर्यभटाची आर्या अशी आहे:उदयास्तमयनिमितं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्तः ॥ लंकासमपश्चिमगो भपंचरः सग्रहो भ्रमति ॥१०॥ गोलपाद. तथापि एकंदर विचार पाहतां पृथ्वी फिरते असेंच आर्यभटाचे मत होते असें दिसून येते. तो तिची दैनंदिनगति मात्र मानतो . ती सूर्याभोवती फिरते असे त्याचे मत होते असे दिसत नाही. या आर्यभटसिद्धांतांत इतर ग्रंथांतल्याप्रमाणे अधिकार नाहीत, परंतु त्यांतले बहुतेक विषय आहेत. मात्र चंद्रशृंगोन्नति आणि भग्रहयुति ह्या अधिकारांतले विषय यांत नाहींत. चंद्रशूगोन्नतिछायादिज्ञान आर्यभटीयावरून होणार नाही, असा ब्रह्मगुप्ताने त्यास दोष दिला आहे. योगतारांचे भोग आणि शर इतर सिद्धांतांत असतात, ते यांत नाहीत. हेही एक मोठे न्यून ह्यांत आहे. ते असते तर आर्यभटाचा काल निःसंशयपणे माहीत असल्यामुळे त्यांचा ज्योतिःशास्त्रेतिहासास फार उपयोग झाला असता. त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या वेळी हा विषय अगदी अज्ञात होता असें नाहीं. पंचसिद्धांतिकेंत नक्षत्रयोगतारांच्या शरभोगाविषयी काही सांगितले आहे. अयनगति हा जो फार महत्वाचा विषय त्यासंबंधेही या सिद्धांतांत कांहीं नाहीं. - हा आर्यसिद्धांत फार संक्षिप्त आहे, तथापि यांत जे विषय आहेत ते चांगले स्पष्ट समजतील असे लिहिले आहेत. संक्षेपामुळे अतिदुर्बोधता आली आहे असें नाही. असें आहे तथापि त्याच्या एकंदर स्वरूपावरून असे दिसून येते की ज्योतिष्यांच्या नित्य व्यवहारास उपयोगी पडावा अशा हेतूनें तो केलेला नाही. तर सिद्धांतभूत महत्वाचे विषय सांगण्याच्या हेतूनेच केवळ तो केलेला दिसतो. नित्य उपयोगास सिद्धांतग्रंथ उपयोगी नाही, करणग्रंथ पाहिजे, हे खरे; तरी * Grant's History of Physical Astronomy (पृ. २) यांत असे म्हटले आहे: " साराक्यूज येथील निसिटस (Nicetas of Syracuse) याचे मत पृथ्वी आंसाभोवती मात्र फिरते असें होतें असें ह्मणतात. ग्रीस देशांतील तत्त्वज्ञानी पिथ्यागोरास ( Pythagoras इ. स. पू. ६वें शतक) याचे मत सूर्य हा विश्वाचा मध्य आहे, आणि पृथ्वी त्या भोवती फिरते, असें होते असे झणतात. परंतु वेधादिकांवरून ही मते झालेली होती आणि त्याप्रमाणे ग्रहस्थितीचे गणित करण्याच्या कांहीं रीति त्यांनी स्थापिल्या होत्या असे वाटत नाही. कदाचित् ह्या नुसत्या कल्पनाच असतील."