पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८९) श्लोकापासून अध्यायसमाप्तीपर्यंत आहे. ह्मणजे एकंदर १३८ श्लोक याच कामाकडे लागले आहेत. त्यांत संक्रांतिपुण्यकाल, तिथिगंडांत; तिथि प्रदोषव्यापिनी कोठे घ्यावी, मध्यान्हव्यापिनी कोठे व्यावी, पूर्वविद्ध कोठे घ्यावी, इत्यादि विचार; तसेंच एकादशी, श्राद्ध, याग यांचा आणि तसाच उपाकर्म इत्यादि कर्मविशेष, गणेशचतुर्थी इत्यादि तिथिविशेष, यांचा कालनिर्णय; इत्यादि विषय आहेत. पहिल्या अध्यायांत ज्योतिषशास्त्र कोणापासून उत्पन्न झाले हे सांगितले आहे, काल. मग त्यांत असे म्हटले आहे. एतच मत्तः शीतांशोः पुलस्त्याच विवस्वतः ॥ रोमकाच वसिष्ठाच्च गर्गादपि बृहस्पतेः ॥९॥ अष्टधा निर्गतं शानं ... ... ... ... ... ... यांतील मत्तः हे म्हणणे या सिद्धांतांस अनुलक्षून आहे. गर्ग आणि बृहस्पति यांच्या नांवानें संहिताग्रंथ मात्र आहेत. बाकीचे सोम, पुलस्त्य, सूर्य, रोमक, वसिष्ठ हे सिद्धांत प्रसिद्धच आहेत. पुलस्त्याचा सिद्धांत म्हणजे पौलिशसिद्धांतच होय. “पौलिश" या नांवानेही त्याचा या सिद्धांतांत उल्लेख २।३ स्थलीं आला आहे. पहिल्या अध्यायांत तस्मात् पंचस सिद्धांतेषूक्तमार्गोवधार्यतां ॥ ९० ॥ असें एकदां आलं आहे. सूर्य, सोम, रोमश, पौलिश या नांवांचा उल्लेख आणखीही २।३ स्थली आला आहे. यावरून स्पष्ट दिसते की हे सर्व सिद्धांत झाल्यावर हा सिद्धांत झाला. हा अमुक काली झाला असे सांगणे कठिण आहे, परंतु यांत पहिल्या अध्यायांत असें मटलें आहे: प्रमाथिप्रथमं वर्ष सौरं कल्पस्य सर्वदा ॥ ३७॥ प्रभवादि जे ६० संवत्सर ते बार्हस्पत्यमानाने धरावयाचे अशी बहुतेक ग्रंथांत रीति आहे. सौरमानाने धरण्याविषयीच्या पद्धतीचा उल्लेख ह्या सिद्धांतांत, रोमशसिद्धांतांत आणि भटोत्पलटीकेंत मात्र आढळतो. त्यांतही कल्पाचे पहिले वर्ष सौरमानाने प्रमाथि असें या सिद्धांतांत मात्र आहे. ह्याप्रमाणे पाहिलें तर शकांत नेहमी १२ मिळवून संवत्सर निघतो. सांप्रत नर्मदेच्या दक्षिणेस संवत्सर बार्हस्पत्यमानाचे मानीत नाहीत, सौरमानाचे मानतात. या मानाने शकांत १२ मिळविले ह्मणजे संवत्सर निघतो. परंतु बार्हस्पत्यमानाने सुमारे ८५ वर्षांत एका संवत्सराचा लोप होतो. यामुळे शकांत नेहमी सारखाच आंकडा मिळवून बार्हस्पत्य संवत्सर निघत नाही. शके ७४३ च्या पूर्वी १२ हून कमी मिळवावयाचे असत. शके ७४३ पासून ८२७ पर्यंत १२ मिळवून संवत्सर निघे. दर ८५ वर्षांनी एकेक अंक वाढावयाचा. ह्मणजे १३, १४ इत्यादि मिळवावयाचे. दक्षिणेत वार्हस्पत्यमानानें संवत्सर मानण्याची पद्धति उत्तरेकडल्याप्रमाणेच शके ७४३ च्या पूर्वी होती असें कांहीं ताम्रपटादि लेखांवरून दिसून येते. परंतु शके ७४३ पासून ८२७ पर्यंत १२ मिळवावे लागत असत, तेव्हापासून दक्षिणेत सौरसंवत्सर सरू झाले असावे, असे माझे मत आहे. याविषयी सविस्तर विवेचन पुढे संवत्सरविचारांत येईल. कल्पाचे पहिले वर्ष प्रमाथि होय असें, ह्मणजे शकांत १२ मिटवून संवत्सर काढावयाची रीति ज्या पक्षी या सिद्धांतांत आहे त्या पक्षी शके ७४३ च्या नंतर केही तरी हा सिद्धांत झालेला असावा, त्यापूर्वी झालेला नाही, असें मला निःसंशय वाटते