पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९०) सप्तर्षीचे शरभोग इतर कोणत्याही सिद्धांतांत आढळत नाहीत, ते यांत आहेत. हा यांत विशेष आहे. पहिला आर्यभट. याचा आर्यभटीयनामक प्रसिद्ध ग्रंथ आहे. उपलब्ध असलेल्या पौरुष ज्यो तिषग्रंथांत याच्याहून प्राचीन दुसरा नाही. तो आपल्या नांव. SSDN ग्रंथास आर्यभटीय असेंच ह्मणतो. परंतु इतर पुष्कळ ज्योतिज्यांनी त्यास आर्यसिद्धांत मटले आहे, व तसें ह्मणणे अगदी योग्य आहे. दुसरा एक आर्यभट याच्या मागाहून झालेला आहे; आणि त्याचा एक आर्यसिद्धांत आहे. ह्मणून या आर्यभटास प्रथमार्यभट आणि याच्या सिद्धांतास प्रथमार्यसिद्धांत ह्मणणे हे सोईचे आहे, ह्मणून मी तसें मटलें * आहे. या सिद्धांताचे मुख्य दोन भाग आहेत. पहिल्यांत १० पयें गीतीछंदाची आहेत. इतर सिद्धांतांत मध्यमाधिकारांत असणान्या बहुतेक सर्व गोष्टी ह्मणजे इष्टकालांत ग्रहभगणसंख्या इत्यादि माने त्या १० गीतींत सांगितली आहेत. ह्या भागास दशगीतिक ह्मणतात. दुसन्या भागांत तीन प्रकरणे आहेत. त्यांत इतर सिद्धांतांतल्या इतर गोष्टी आहेत. त्यांत १०८ आर्या आहेत. म्हणून त्यास आर्याष्टाशत म्हणतात. हे दोन भाग हे निरनिराळे ग्रंथ असे कोणी म्हणतात. याचा एक टीकाकार सूर्ययज्वन् हा या दोहोंस दोन प्रबंध म्हणतो. या दोहोंपैकी प्रत्येकाच्या आरंभी निरनिराळे मंगल केलेले आहे, यामुळे हे दोन निरनिराळे ग्रंथ कोणी मानले असावे. परंतु ते दोन्ही परस्परांवर अवलंबून आहेत. एकावांचून दुसऱ्याचा काही उपयोग नाही म्हटले तरी चालेल. म्हणून दोहोमिळून एकच सिद्धांत मानावा हे युक्त होय. स्वतः आर्यभटाचाही तसाच उद्देश दिसतो. पहिल्या भागास त्याने निराळें कांहीं नांव दिले नाही. व त्याच्या शेवटी उपसंहार केला नाही. एकंदर ग्रंथाच्या शेवटी मात्र उपसंहार केला आहे, आणि तेथे मात्र "आर्यभटीय" हे नांव दिले आहे. तसेच एकंदर ग्रंथांत चार प्रकरणे आहेत. त्या प्रत्येकास स्वतः ग्रंथकार पाद म्हणत नाहीं, तरी पाद म्हणण्याची इतरांची रूढि आहे. दशगीतिक निराळा ग्रंथ मानला तर एकांत एकच आणि दुसऱ्यांत तीन पाद राहतील; त्यांस पाद (चतुर्थांश) म्हणणे शोभणार नाही. तेव्हां एकंदरीत विचार करितां दशगीतिक आणि आयीष्टाशत मिळून एकच सिद्धांत मानणे योग्य होय. दशगीतिकामध्ये १० पद्यांशिवाय आणखी दोन गीती जास्त आहेत. एकांत मंगल आहे आणि दुसन्यांत संख्यापरिभाषा आहे. ह्मणजे एकंदर ग्रंथांत १२० पये आहेत. आर्याष्टाशत हा शब्द भ्रामक आहे. यावरून त्यांत ८०० आर्या असाव्या अशी काही युरोपिअन विद्वानांची समजूत झाली होती असे दिसते. सांप्रत डा. कर्न याने हालंडदेशांत लेडेन एथे सन १८७४ साली हा आयसिद्धांत परमादीश्वरकत भटदीपिकाटीकेसहित छापला आहे. त्यापूर्वी युरोपिअन विद्वानांस याची फारशी माहिती नव्हती.

  • प्रथम किंवा द्वितीय या विशेषणावांचूनच जर पुढे कोठे उल्लेख आला तर तो याविषयींच समजावा.