पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८८) तो उपजाति छंदाचा आहे. अनुष्टुप् छंदाचा नाही. कमलाकरानें वसिष्ठसिद्धांताचा उल्लेख केला आहे (पृ. १८६), तो ह्या लघुवसिष्टसिद्धांताचाच दिसतो. डे. कॉलेज संग्रहांतील दुसऱ्या रूपाचा वसिष्ठसिद्धांत वर सांगितला आहे, त्यांत सृष्टिसंस्था आणि ग्रहांच्या कक्षा मात्र ह्मणजे मध्यमाधिकार मात्र आहे; सिद्धांतांत असणारे इतर अधिकार मुळीच नाहीत. सर्व श्लोक अनुष्टुप् छंदाचे आहेत. शेवटी " वृद्धवसिष्ठप्रणीतं गणितस्कंधे विश्वप्रकाशे' असें ह्मटले आहे. तसेंच त्यापुढे “कक्षाध्यायश्चतुर्थः" असे म्हटले आहे. बाकीचे तीन अध्याय कोठे संपले हे मुळीच नाही. यावरून हे पुस्तक अपूर्ण दिसते. आरंभीच्या उल्ल खांत हा सिद्धांत वसिष्ठाने वामदेवास सांगितला असें आहे; मांडव्याचें नांव नाहीं. रोमशसिद्धांत. हा सिद्धांत वसिष्ठ आणि रोमश यांस विष्णूने सांगितला. याबद्दलचे श्लोक पूर्वी दिलेच आहेत (पृ. १७६). याचे ११ अध्याय आहेत. त्यांत अनुष्टुप् छंदाचे ३७४ श्लोक आहेत. भगणमानादिकांसंबंधे याचें सूर्यसिद्धांताशी सर्वांशी साम्य आहे हे पूर्वी सांगितलेच आहे. या सिद्धांतांतील श्लोकादिकांचा उल्लेख दुसन्या एखाद्या ग्रंथांत मला आढळला नाही. यांत नंद, सिद्ध, हे शब्द आहेत. मंगळाबद्दल "आर " शब्द एकदां आला आहे. नया सांगितल्या आहेत त्यांत "कृष्णवण्या " ह्या आहेत. यावरून कदाचित् याचा कर्ता कोणी दक्षिणेतील असेल. 'शाकल्योक्त ब्रह्मसिद्धांत. याचे ६ अध्याय आणि ७६४ श्लोक आहेत. हा ब्रह्मदेवानें नारदास सांगितला कर्ता. आहे. मूळ श्लोकांत कोठेही शाकल्याचें नांव नाहीं; परंतु प्रत्येक अध्यायाच्या शेवटी "शाकल्यसंहितायां द्वितीयप्रश्ने ब्रह्मसिद्धांते" असे म्हटले आहे. शाकल्यसंहितेचे इतर प्रश्न सांप्रत उपलब्ध असल्याचे माझ्या ऐकण्यांत नाही. रंगनाथी टीकेंत या सिद्धांतांतील पुष्कळ वाक्ये निरनिराळ्या प्रसंगी घेतली आहेत. ती देतांना कोठे “शाकल्योक्तेः" असें मटले आहे; कोठे “ब्रह्मसिद्धांते " असे झटले आहे. सिद्धांततत्त्वविवेककाराने या सिद्धांताचा उल्लेख केला आहे तो श्लोक पूर्वी दिलाच आहे (पृ.१८६). यांतील काही श्लोकही कमलाकराने घेतले आहेत. यांतील भगणादिमाने सर्वांशी सूर्यसिद्धांताप्रमाणे आहेत. ती पूर्वी दिलीच आहेत. यांत इतर सिद्धांतांप्रमाणे मध्यमाधिकार, स्पष्टाधिकार, असे निरनिराळे अधि 2 कार नाहींत. एकेका अध्यायांत निरनिराळ्या अधिकारचना, विषय. रातले विषय आहेत; आणि ६ अध्याय मिळन सिद्धांतांतले बहुतेक विषय आणले आहेत; इतकेच नाही तर ज्योतिषसिद्धांतांत न येणारा धर्मशास्त्राचाही विषय यांत आला आहे. तिसऱ्या अध्यायांत चंद्रसूर्यांचें क्रांतिसाम्य (महापात) याचे विवेचन आले आहे. त्यांतच त्या वेळच्या स्नानदानाचें फल सांगून पुढे त्या ओघानेच धर्मशास्त्राचा विषय सुरू झाला आहे, तो ३४ व्या