पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८७) अथ माहेश्वरायुष्ये...ब्रह्मणोधना ।। सप्तमस्य मनोर्याता द्वापरांते गजाश्विनः ।। २८ ।। खचतुष्केभनागार्थशररंध्रनिशाकराः १९५५८८०००० ॥ सृष्टेरतीताः सूर्याब्दा वर्तमानात्कलेरेथ ।। हेच श्लोक रोमशसिद्धांतांतही "गर्गः " असे म्हणून आले आहेत. त्यांत पहिल्या श्लोकाचे पूर्वार्ध “ परार्धप्रथमाहेस्मिन्नायुषो ब्रह्मणोधुना " असें आहे. या सिद्धांतांत एके स्थली नंद हा शब्द आला आहे. या सिद्धांताचे सर्वांशी सूर्यसिद्धांताशी साम्य आहे असें पूर्वी सांगितलेच आहे. वसिष्ठसिद्धांत. ज्यांतील मूलतत्त्वे एकसारखींच परंतु रूप मात्र निराळे असे दोन वसिष्ठ सिद्धांत सांप्रत उपलब्ध आहेत, असें वर सांगितलेच आहे. त्यांत विषय. काशी एथे छापलेला जो आहे त्याचे ५ अध्याय मिळून अनुष्टुप् छंदाचे ९४ श्लोक आहेत. हा वसिष्ठऋषीने मांडव्यऋषीस सांगितला असे त्यांत प्रथम व शेवटी सांगितले आहे. हा सिद्धांत फारच संक्षिप्त आहे. इतर सिद्धांतांत भगणादि माने सांगितलेली असून ग्रहांची कक्षामानेही असतात. यांत कक्षामाने मात्र आहेत. त्यांवरून युगांतील ग्रहभगणांची संख्या काढावी लागते. ती काढतां येते आणि ती सूर्यसिद्धांताशी मिळते. काही गोष्टींसंबंधे हा अपुताही आहे. यांत युगांतील सावन दिवस सांगितले नाहीत. अहर्गण कोठपासून करावा हे सांगितले नाही. उत्कमज्यांचा उपयोग सांगितला असून त्या सांगितल्या नाहीती. मंदोच्च आणि पात मुळीच सांगितले नाहीत. त्यांविषयी मंदोचपातभगणानुपपत्यानयागे ॥ यत्र मंदफलं शून्यं मंदोचस्थानमुच्यते ॥ ३१ ॥ याम्यकेंद्रफलं शून्यं पातस्तत्रविनिर्दिशेत् ॥ मध्यमाधिकार. असें सांगितले आहे. म्हणजे गणितकानें वेध घेऊन उच्चपात काढावे, म्हणजे नवीन सिद्धांतच करावा, असे सांगितल्यासारखें होय. कर्ण काढावयाची रीति दिली आहे ती अपुर्ती आहे. याचे ५ अध्याय आहेत. त्यांत मध्यमाधिकार, स्पयाधिकार, छायाधिकार (त्रिप्रश्न ), प्रकीर्ण आणि भूगोल हे मात्र अधिकार आहेत. प्रकीर्णाध्यायांत ग्रहणाचे दिग्दर्शन मात्र केले आहे. छायाधिकारही संक्षिप्तच आहे. स्पष्टाधिकारांत एक श्लोक सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतलाच आहे. यात अहर्गण निघतो तो लंकार्धरात्रीपासून निघतो असे सांगितले आहे. यावरूनहीं याचें सूर्यसिद्धांताशी साम्य सिद्ध होते. यांत राम, नंद, सिद्ध हे शब्द आले आहेत. रंगनाथाने यांतील एक श्लोका लघुवासिष्ठसिद्धांतांतले ह्मणून घेतले आहे. तसेच त्यानें “वृद्धवसिष्ठोक्त " म्हणून ग्रहणासंबंधे एक श्लोक वसिष्ठ- दिला आहे; आणि एकदां स्पष्टाधिकारटीकेंत वृद्धवसिष्ठाचें सिद्धांत. नांव दिले आहे. यावरून रंगनाथाच्या वेळी वृद्धवसिष्ठसिद्धांत निराळा होता की काय न कळे. त्याने ग्रहणसंबंधे श्लोक दिला आहे

  • डे. कॉ. संग्रहांतील प्रतींत नक्षत्रभ्रमसंख्या आहे तीवरून सावन दिवस निघतात. परंतु ते भिन्न येतात याविषयी पूर्वी सांगितले आहे. (पृ० १७१) क्रिमज्या सांगितल्या आहेत, त्यांवरून त्या काढतां येतात.