पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८६) म्हणतात त्यांतील बहुतेक विषय मी पहिल्या प्रकारांत म्हणजे भुवनसंस्थेत गणितों. या शाखेचें ज्ञान जसे जसे वाढत जाते तसे वरील तिहींपैकी दुसन्या व तिसऱ्या प्रकारांचे त्यांतही विशेषतः तिसऱ्या शाखेचें ज्ञान वाढत जाते. परंतु युरोपियन ज्योतिषशास्त्राच्या इतिहासांत कोपर्निकसाच्या वेळेपासून जसे महत्वाचे अनेक शोध होत गेले तसे आमच्या देशांत कांहींच झाले नाहीत मटले तरी चालेल. यामुळे सृष्टिसंस्थातत्त्वाचा इतिहास हा जसा युरोपियन ज्योतिषांत महत्वाचा विचार आहे तसा भारतीय ज्योतिषांत नाहीं झटले तरी चालेल. सर्व ग्रंथांची बहुधा एकसारखींच मते आहेत. आणि त्यांत नवीन शोध होत गेले नाहीत, ह्मणून वरील पहिल्या प्रकारची आमच्या ग्रंथांतील प्रमेयं एकाच ठिकाणी सांगणे बरें. त्यांपैकी काही गोष्टी उपोद्घातांत सांगितल्या; कांहीं पुढे येतील. दुसऱ्या प्रकारांतील प्रमेये मात्र प्रत्येक सिद्धांताची भिन्न आहेत. ती मात्र जेथल्या तेथे सांगितली आहेत. आणि तिसऱ्या प्रकारांतील काही गोष्टी पुढे सृष्टिसंस्थाविवेचनांत येतील, आणि बाकीच्या गोष्टी स्पष्टाधिकारांत येतील. त्याही बहुतेक सर्व सिद्धांतांच्या एकच असल्यामुळे एके ठिकाणी स्पष्टाधिकारांत सांगणे बरें. त्यांत सिद्धांतपरत्वें भेद आहेत ते तुलनेनें सांगणे बरें. आणि याप्रमाणे विवेचन झाले झणजे यांत सर्व सिद्धांतांची प्रमेये आली. - पंचसिद्धांतिकोक्त सिद्धांत आणि ह्या प्रकरणांतील पांच सिद्धांत यांतील भगणादि माने वर आलीच आहेत. पंचसिद्धांतिकोक्त सिद्धांतांतील मध्यमग्रहस्थितीची युरोपियन ग्रंथागतस्थितीशी तुलना पूर्वी केलीच आहे. • सूर्यसिद्धांतादिक वर्तमान पांच सिद्धांतांवरून येणारे मध्यमग्रह आणि युरोपियन ग्रंथांवरून येणारे ग्रह यांची तुलना पुढे आर्यभटवर्णनांत केली आहे. सोमसिद्धांत. हा चंद्राने शौनकऋषीस सांगितलेला आहे. यांत अहर्गण करितांना सृष्टयुत्पत्ती पासून वर्तमानकलियुगारंभापर्यंत अमुक वर्षे गेली आणि त्यांत काल. "वर्तमान कलीपासून इष्ट वर्षे मिळवावी? असें सांगितले आहे. यावरून हा सिद्धांत कलियुगांत झाला असे सिद्ध होते. याचा वास्तव काल वर्तमानसर्यसिद्धांताचा जो वर ठरविला तोच किंवा त्याहून कांहीं अर्वाचीन आहे. याचे १० अध्याय आहेत. त्यांत अनुष्टुप् छंदाचे ३३५ श्लोक आहेत. ज्योतिषदर्पण नांवाचा ग्रंथ वर सांगितला त्यांत सोमसिद्धांतांतला एक श्लोक आला आहे. रंगनाथी सूर्यसिद्धांतटीकेंत एके ठिकाणी यांतला एक श्लोक आला आहे. सिद्धांततत्त्वविवेककार कमलाकर याने ब्रह्मा प्राह च नारदाय हिमगुर्यच्छौनकायामलं ॥ मांडव्याय वसिष्ठसंज्ञकमुनिः सूर्यो मयायाह यत् ।। ६५ ॥ भगणमानाध्याय, ह्या श्लोकांत सोमसिद्धांताचा उल्लेख केला आहे. यांत मध्यमाधिकारांत "गायश्लोकौ ? असें म्हणून पुढील श्लोक दिले आहेत.