पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८५) सूर्यसंबंधाने इतर ग्रहांची स्थाने काढून त्यांची तुलना करण्याची बेंटलीची रीति लागू करून प्रो. व्हिटनीने हा बीजसंस्कार कधी देण्यांत आला त्याचा काल काढला आहे, तो इ. स. १५४१ (शके १४६३) येतो.* परंतु तो श. १४०० पूर्वीचा आहे हे उघड आहे. रंगनाथ, नृसिंह आणि विश्वनाथ यांनी टीकांत हा संस्कार सांगितला नाही, परंतु तो त्यांस माहीत असलाच पाहिजे. कारण त्यांच्या वेळी मकरंदग्रंथ प्रसिद्ध होता. मुळांत नाही ह्मणून त्यांनी तो सांगितला नसावा. रामविनोद (श. १५१२) करणांत हा संस्कार आहे. त्यांत भगणसंख्या वरच्याच आहेत, परंतु त्यांत चंद्रोच्च आणि बुध यांचा संस्कार धन आहे. मी पाहिलेल्या (डे. का. सं. नं. २०४ सन १८८३।४) पुस्तकांत कदाचित् तो लेखकप्रमाद असेल. बाकी सर्व वरच्याप्रमाणेच आहे. वार्षिकतंत्रग्रंथांतही बहुतेक यासारखाच बीजसंस्कार आहे, तो पुढे त्या ग्रंथाच्या वर्णनांत सांगितला आहे. रंगनाथ लिहितो की काही पुस्तकांत शेवटच्या अध्यायांत म्हणजे मानाध्यायांत सांप्रत असलेला २२ वा श्लोक नसून त्याच्या पुढील श्लोक झाल्यावर मानाध्यायाची समाप्ति होऊन पुढें बीजोपनयन नांवाचा अध्याय असून त्यांत २१ श्लोक देऊन पुढे सदरील मानाध्यायांतला २२ वा श्लोक देऊन व पुढें मानाध्यायांतले ४ श्लोक देऊन अध्यायसमाप्ति केलेली आढळते. बीजोपनयनाध्याय २१ श्लोकांचा प्रक्षिप्त दिसतो, असें म्हणून ते श्लोक रंगनाथाने नुसतेच दिले आहेत; त्यांवर टीका केली नाही. विश्वनाथी टीकेंतही हे श्लोक आहेत. त्या २१ श्लोकांत बीजसंस्कार ग्रहांस व मंदशीघ्र परिध्यंशांस । सांगितला आहे. बीजसंस्कार काढण्याची रीति सांगितली आहे तीवरून कलियुगारंभी बीज शून्य असून पुढे ९०००० वर्षे तें वाढत जाते, आणि पुढें तितकीच वर्षे कमी होत जाऊन आरंभापासून १८०००० वषांनी शून्य होते, असें निष्पन्न होते. मध्यमग्रहांस बीजसंस्कार एका वर्षांत निघतो त्याच्या विकलाःरवि + मंगळ + उप गुरु - ३० शनि+५० चंद्र - बुधशीघ्र - ७२३ शुक्रशीघ्र + पंक ह्यांत रविबीज उप विकला धन असल्यामुळे वर्षाचें मान सुमारे ५ प्रतिविपळे कमी होते. ह्मणजे बीज न देतां दि. ३६५।१५।३१।३१।२४ आहे ते दि. ३६५।१५। ३१॥३१।१९ होते. हे बीज कोणत्याही करणग्रंथांत घतेलले मला आढळलें नाहीं. आमच्या ज्योतिषसिद्धांतग्रंथांतील सर्व गोष्टींची मुख्य तीन प्रमेये आहेत असे प्रमेये. मटले असतां चालेल. पहिले भुवनसंस्था आणि आका शस्थ ज्योतींच्या गतीचे कारण इत्यादि; दुसरे ग्रहांची कांहीं विवक्षितकालांत मध्यमगति आणि कोणा एका काली त्यांची मध्यमस्थिति; आणि तिसरे त्यांची स्पष्टगति आणि स्पष्टस्थिति, रणजे मध्यम मानाने जी त्यांची स्थिति येते तीत काही फरक पडून त्यांची आकाशांत प्रत्यक्ष स्थिति दिसते ती, आणि ह्या फरकाचे कारण आणि तो फरक इष्टकाली किती आहे हे काढण्याची उपकरणे आणि रीति; ह्याप्रमाणे तीन प्रकारांत सर्व प्रमेये येतात असे म्हटलें असतां चालेल. इंग्रजीत ज्योतिषशास्त्राच्या ज्या शाखेस Physical Astronomy •बर्जेस सू. सि. भाषांतर पृ०२० पहा. + ह्या श्लोकांत "राम" आणि " जिन" हे शब्द संख्या दाखविण्याकरितां आले आहेत. २४