पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१८४) येथील आहे. आर्यभटीयंटीकाकार परमादीश्वर हा मलवार प्रांतांतला आहे असे वाटते. ज्योतिषदर्पणकार कोंडपल्ली येथील आहे. हा गांव कर्नाटकांत कोठे तरी आहे. व त्याचे उत्तर अक्षांश सुमारे १६।४६ आहेत असे त्या ग्रंथावरून निघते. वार्षिकतंत्रकार विद्दण कर्नाटकांतला आहे. वाविलाल तैलंगणांतला आहे. येल्या वगैरे टीकाकार तेलंगणांतले दिसतात. रंगनाथाची व विश्वनाथी ह्या टीका काशी एथे झालेल्या आहेत. दादाभाई हा दक्षिण कोंकणांतला आहे. रामविनोद ग्रंथ दिल्ली एथे अकबरच्या वेळी झालेला आहे. यावरून दिसून येतें कीं शकाच्या १३ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत सूर्यसिद्धांत भरतखंडांत बहधा सर्वत्र पसरला होता. आतां हे खरें की हा काल फार प्राचीन नाही, परंतु भास्कराचार्याच्या वेळी व त्यापूर्वीही तो सर्वमान्य होता. आणखी असें की करणग्रंथ जसजसे नवीन होतात तसतसे जुने करणग्रंथ नेहमीच्या गणितास निरुपयोगी होतात, यामुळे ते लोपून जातात. यामुळे शके १२२० च्या पूर्वीचे सांप्रतच्या सूर्यसिद्धांताच्या आधारे रचलेले करणग्रंथ लोपले असतील. राम हा शब्द तीन या अर्थी, नंद हा शब्द नऊ या अर्थी, जिन किंवा सिद्ध शब्दयोजना. म हा शब्द २४ या अर्थी, याप्रमाणे शब्द ज्योतिषग्रंथांत पुष्कळ वेळा येतात. परंतु मूर्यसिद्धांतासंबंधे ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की, तो कृतयुगांती झाला असें मटले आहे, त्याप्रमाणे कृतयुगानंतर झालेले राम, नंद, जिन यांचे वाचकशब्द संख्या दाखविण्याकरितां सूर्यसिद्धांतांत कोठेच आलेले नाहीत. तसेंच ग्रहांची जी नांवें यवनी भाषेतील असें ह्मणणे आहे त्यांतील एकही नांव सूर्यसिद्धांतांत नाही. जे ग्रीक भाषेतले आहेत असे ह्मणतात असे लिप्ता किंवा लिप्तिका (स्पष्टाधिकार ४५, ६४,६५, ६६), होरा (भगोलाध्याय १९), केंद्र ( स्पष्टाधिकार २९, ४५)हे शब्द मात्र आले आहेत. पंचसिद्धांतिकोक्त मूल सूर्यसिद्धांत व इतर ४ सिद्धांत यांत असे शब्द होते की नाही याचा विचार करण्यास साधन नाही. कारण वराहमिहिराने ते सिद्धांत मूलरूपाने दिले नाहीत. बीज. मकरंदग्रंथांत सूर्यसिद्धांतोक्त ग्रहादिकांस बीजसंस्कार आहे तो असाः महायुगांत. ग्रह इत्यादि भगणांस बीजसंस्कार बीजसंस्कृत भगण. भगण. सूर्य. ४३२०००० ५७७५३३३६ ४८८१९९ चंद्रपात. २३२२४२ मंगळ. २२९६८३२ बुध. १७९३७०४४ गुरु. ३६४२१२ शुक्र. ७०२२३६४ १४६५८० चंद्र. चंद्रोच्च. 1००००० ।+ ।। शनि. +