पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७८) होते असें निश्चयाने झणवत नाही. जरी झाले असले तरी त्यास प्राधान्य आले नव्हते असे स्पष्ट दिसते. कारण त्याने खंडखायांत स्वतःच्या सिद्धांतांतली किंवा प्रथमार्यसिद्धांतांतली किंवा सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतलीं माने न घेतां पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांतील घेतली आहेत. तेव्हां सांप्रतच्या सूर्यसिद्धांतास सूर्यसिद्धांत हे नांव केव्हां मिळाले व त्याचें पूज्यत्व केव्हां स्थापित झाले हे निश्चयाने सांगवत नाहीं; तथापि अनुमान करण्यास जागा आहे. सांप्रतचा सूर्यसिद्धांत लाटकत असला तरी त्यांतील सर्वच श्लोक लाटकत असतील असें नाही. मध्यमाधिकारांतील भगणादिमानें खेरीज करून बाकीचे बहुतेक किंवा कांहीं श्लोक मळच्याच झणजे पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांतांतले असतील. किंवा लाटाचा ग्रंथ सांप्रतच्या रूपाने नसला तर पंचसिद्धांतिकेनंतर लवकरच भगणादिमानें लाटाची घेऊन आणि बाकीचे श्लोक मूलसूर्यसिद्धांतांतले घेऊन कोणी सांप्रतचा सूर्यसिद्धांत रचला असावा. आणि त्यानंतर दोन तीन शकांनी तो कोणी रचला याचा मुद्दापत्ता नाहीसा होऊन त्याचे विस्मरण पडल्यावर त्यास पूज्यत्व आले असावें. ग्रहस्पष्टीकरण आर्यभटाचे घेऊन रोमक आणि वासिष्ठ हे केले असें ब्रह्मगुप्त ह्मणतो (पृ.१५५ आर्या ४९). परंतु स्पष्टीकरणार्थ एक प्रकारची मुख्य उपकरण जे परिध्यंश ते सांप्रतच्या सूर्यरोमकादिकांचे आर्यभटाशी मिळत नाहीत. ते मूलसूर्यसिद्धांताशी बहुतांशी मिळतात. ( पुढे स्पष्टाधिकारांत पहिल्या प्रकरणांत सर्व एकत्र दिले आहेत ते पहा.) यावरून असे अनुमान निघतें की लाटाने किंवा सूर्यसिद्धांताचा कर्ता जो कोणी असेल त्याने भगणादि माने मात्र निराळी घेऊन बाकी गोष्टी मूलसूर्यसिद्धांतांतल्या घेतल्या किंवा अक्षरशः मूलमूर्यसिद्धांतांतल्याच ठेवल्या. तसेंच श्रीषेणक त रोमक आणि विष्णुचंद्रकृत वासिष्ठ यांतील भगणादि मानें लाटाची आहेत असे स्पष्टच ब्रह्मगुप्त ह्मणतो. बाकीच्या गोष्टी प्रथम आर्यभटसिद्धांतांतल्या होत्या त्या सोडून मागाहून कोणी ते सिद्धांत सूर्यसिद्धांताशी सर्व मूलतत्वांसंबंधे मिळते असे केले असे दिसते. उत्पलानें बृ. सं. टीकेंत १८ व्या अध्यायांत "तथाच आचार्यः विष्णुचंद्रः॥ असें ह्मणून पुढील पद्य दिले आहे:दिवसकरेणास्तमयः समागमः शीतरश्मिसहितानां ॥ कुसुतादीनां युद्धं निगद्यतेन्योन्ययुक्तानां ।। ही आर्या आहे आणि सांप्रतचा दोन्ही प्रकारचा वसिष्ठसिद्धांत अनुष्टुपश्लोकबद्ध आहे. यावरूनही विष्णुचंद्ररुत वासिष्ठसिद्धांतांच्या आधारें सांप्रतचा वसिष्ठसिद्धांत कोणी रचला असेल असें संभवते. याप्रमाणेच रोमकाविषयीही होण्याचा संभव आहे. पुणे एथील आनंदाश्रमांत सूर्यसिद्धांताच्या कांहीं सटीक प्रती आहेत; कां हीत मूल मात्र आहे. त्यांत एका टीकाविरहित पुस्तकांत मय. (नं. २९०९) पहिल्या ( मध्यम ) अधिकारांत ७ वा श्लोक आढळला तो सटीक पुस्तकांत नाही. तो पूर्वापरसंदर्भाच्या श्लोकभागांसह असाः न मे तेजःसहः कश्चिदाख्यातु नास्ति मे क्षणः ।। मदंशपुरुषोयं ते निःशेषं कथयिष्यति ॥ ६॥ तस्मात त्वं स्वां पुरी गच्छ तत्र ज्ञानं ददाम ते । रामकनगर ब्रह्मशापान्म्लेंच्छावतारधक || ॥ इत्युक्त्वांतर्दधे देवः