पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७९) अर्थ-[ हे मया ] माझें तेज कोणास सहन होणार नाही. [व] सांगण्यास ला वेळ नाही. हा माझा अंशभूत पुरुष तुला सगळे सांगेल. ॥ ६॥ तर तूं आल्या नगरीस जा. त्या रोमक नगरांत ब्रह्मशापामुळे मी म्लेंछावतार घेऊन तुला शनि देईन. ॥ ७ ॥ असें ह्मणून [ सूर्य ] देव अंतर्धान पावला. सटीक पुस्तकांतील ६ वा आणि ७ वा या श्लोकांच्या मध्ये वरील ७ वा श्लोक आहे. याचा पूर्वापरसंदर्भ पाहिला असतां ७वा श्लोक मध्ये अगदीच असंगत आहे. व्यसिद्धांताचे इंग्रजी भाषांतर करणारा रे.बर्जेस ह्याच्या जवळील टीकाविरहित दोन पुस्तकांत हा श्लोक होता, सटीक पुस्तकांत नव्हता. सदर्दू भाषांतराच्या टीपांत व्हिदन याने या श्लोकावरून पुढे लिहिलेल्या अर्थाचें आपलें मत दर्शविलें आहेः 'हा श्लोक सांप्रतचा ६ वा आणि ७ वा यांच्यामध्ये असंगत आहे हे खरें, तथापि बन्याच पुस्तकांत तो आढळतो. व मुद्दाम नवीन कोणी करून घातला असेल असें संभवत नाही. तेव्हां सूर्यसिद्धांत मयास कसा प्राप्त झाला याबद्दल सांप्रतचे सटीक पुस्तकांतले आरंभीचे ७८ श्लोक केव्हां तरी कोणी नवीन करून घातले. त्यांच्या जागी पूर्वी वरील श्लोक किंवा तो आणि त्यासारखे आणखी काही श्लोक असावे. आणि यावरून दिसते की,सूर्यसिद्धांताचा निःसंशय यवनांशी काहीतरी संबंध असावा. किंबहुना यवनांपासून ते शास्त्र हिंदूंस प्राप्त झाले असावें. सूर्यसिद्धांत मयासुरास प्राप्त झाला असें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतही आहे. सूर्योपदेशाचे स्थान असुरच कल्पिण्याचे कारण काय ? व त्यावरूनही यवनांशी संबंध दिसतो.' वेबर ह्मणतो की इजिप्तचा राजा तालमयस ( Ptolemaias) याचें नांव हिंदु स्थानांतील कोरीव लेखांत नुरुमय असें येते. यावरून दालमी. तुरुमय याचें असुरमय हे रूपांतर असावें, आणि यावरून मय हा आलमाजेस्ट ( Almajest ) ग्रंथाचा कर्ता टालमीच असावा. परंतु टालमीच्या ग्रंथाचा मूलसूर्यसिद्धांताशी काही संबंध नाही, हे पूर्वी दाखविलेंच आहे. तसेंच सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतील भगणादि माने वर दिली आहेत त्यांचेही टालमीच्या मानांशी कांहीं साम्य नाही. यावरून सांप्रतच्या सूयंसिद्धांताशीं टालमीचा काही संबंध नाहीं असें स्पष्ट दिसतें. मिलानांचा उत्पलकत बृ. सं. टीकेंत पुढील श्लोक सूर्यसिद्धांतांतले संबंध. ‘ह्मणून दिले आहेतः महतश्चाप्यधःस्थस्य नित्यं भासयते रविः ॥ अर्ध शशांकबिंबस्य न द्वितीयं कथंचन ।। तेजसां गोलकः सूर्यो ग्रहाण्यंबगोलकाः ॥ प्रभावंतो हि दृश्यते सूर्यरश्मिविदीपिताः ।। विप्रकर्ष यथा याति ह्यधस्थश्चंद्रमा रवेः ॥ तथा तस्य च भूदृश्यमंशं भासयते रविः॥ अध्याय ४ चंद्रचार. भूछायां शशिकक्षागां रवीभावां (?) तरस्थिते ।। यदा विशत्यविक्षिप्तश्चंद्रः स्याचद्ग्रहस्तदा॥ इंदुना छादितं सूर्यमधोविक्षिप्तगामिना ॥ न पश्यति यदा लोके तदा स्याद्भास्करग्रहः ॥ तमोमयस्य तमसो रविरश्मिपलायिनः ॥ भूछाया चंद्रबिंबस्थोर्दू । परिकल्पितः ।। अध्याय ५ राहुचार. * बर्जेसचे सू. सि. भाषांतर पृ० ३ पहा. वर वेबर, ह्मणणे अक्षरशः दिले नाही त्याचे ता. त्पर्य दिले आहे. + एका लेखी पुस्तकावरून हे श्लोक यथामूल दिले आहेत.