पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महेश असे याच नांवाचे सिद्धांत ब्रम्हगुप्ता (शके ५५० ) च्या पूर्वी जर होते तर या तिहींशीं भगणादिमानांसंबंधे सर्वांशी सदृश परंतु ज्याचें ह्या तिहीपेक्षा फारच जास्त पूज्यत्व आणि महत्व सांप्रत आहे, असा सांप्रतचा सूर्यसिद्धांत ब्रह्मगुप्ताच्या पूर्वी नसेल असें कशावरून? सांप्रतचा सूर्यसिद्धांत किंवा सोम, रोमक, वासिष्ठसिद्धांत यांचे ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचा प्रथमार्यसिद्धांत आणि त्याच्या पूर्वीचे पंचसिद्धांतिकेंतील पांच सिद्धांत यांशी भगणादिमानांसंबंधे साम्य नाही. लाटाचार्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होता असें पूर्वी दाखविलेच आहे. आणि श्रीषेणाचा रोमक आणि विष्णुचंद्राचा वासिष्ठ यांतील सर्व मध्यमग्रह* लाटाच्या ग्रंथांतून घेतले असें ब्रह्मगुप्त म्हणतो. यावरून सांप्रतचे रोमक वासिष्ठ, सोम यांशी सदृश असा ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीच्या ग्रंथांत एक लाटाचार्याचा मात्र ग्रंथ दिसतो. ही गोष्ट, वर लिहिलेले दुसरे विचार, आणि अलबिरुणी म्हणतो की सूर्यसिद्धांत लाटकृत होय ही गोष्ट, यांचा एकत्र विचार केला असतां मला वाटते की यावरून एकच अनुमान निघतें, की सांप्रतचा सूर्यसिद्धांत म्हणजे त्यांतील मध्यमग्रह (भगणादिमाने) लाटाचार्याच्या ग्रंथांतील होत. आणि लाट हा वराहमिहिराच्या म्हणजे शके ४२७ च्या पूर्वी झाला. तेव्हां सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतील भगणादि मूलतत्त्वे शके ४२७ च्या पूर्वीची होत, असे मला वाटते. सांप्रतचा सूर्यसिद्धांत लाटकृत जरी नसला तरी सांप्रतचे सोम, रोमक, वासिष्ठ हे सिद्धांत ब्रह्मगुप्ताच्या पूर्वीचे आहेत. आणि त्या तिहींहून सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचें फारच जास्त पूज्यत्व आणि महत्व आहे. यावरून त्या तिहींच्या पूर्वीचा सांप्रतचा सूर्यसिद्धांत आहे. अर्थात् त्याचा रचनाकाल शकाच्या ५ व्या शतकाहून अर्वाचीन नाही. आतां पांच सिद्धांतांचा जास्त विचार निरनिराळा करूं. सूर्यसिद्धांत. सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचे १४ अधिकार आहेत. त्या सर्वामिळून अनुष्टुप् छंदाचे ५०० श्लोक आहेत. त्यांतील भगणादिमाने वर दिली आहेत विषय: काल. यांतील आरंभीच्या श्लोकांवरून पाहिले तर हा कृतयुगाच्या अंतीं सूर्याच्या आज्ञेनें सूर्यांशभूत पुरुषाने मयनामक असुरास सांगितला. मणजे ह्यास शके १८१७ च्या आरंभी २१६४९९६ वर्षे झाली. सांप्रतचा सूर्यसिद्धांत लाटकृत असावा आणि त्यावरून तो शक ४२७च्या बराच पूर्वीचा असावा असें अनुमान वर केले आहे. तथापि वराहमिहिराच्या वेळी त्याम सूर्यसिद्धांत असें नांव मिळाले नसावे असे वाटते. कारण पंचसिद्धांतिकेंत सूर्यसि द्वांत एकच आहे आणि तो सांप्रतच्याहून भिन्न आहे. ब्रह्मगुप्तसिद्धांतांत सूर्यसिद्धा ताचा उल्लेख दोन स्थली आलो आहे. त्या आर्या पूर्वी दिल्याच आहेत. (पृ. १५ त्यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळी सूर्यसिद्धांत दोन होते असे झणण्यास आधार नाही यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळीही सांप्रतच्या सूर्यसिद्धांतास सूर्यसिद्धांत हे नांव प्राप्त झालें. "कुजादि ग्रह वासिष्ठांतून घेतले असा अर्थ कोलक लावतो. परंतु सर्व गोष्टींचा पूर्वापर संदर्भ पाहिला असतां मी अर्थ लाविला आहे तसाच लाविला पाहिजे असे मला वाटते २३।