पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७६) विलेच आहे. पंचसिद्धांतिकोक्त रोमक आणि वासिष्ट याहून सांप्रतचे रोमक आणि वासिष्टं भिन्न आहेत असेंही पूर्वी दाखविलेंच आहे. भगणादि मानांच्या तुलनेवरूनही ते दिसून येते. तर मग ब्रह्मगुप्ताच्या वेळी उपलब्ध असलेले श्रीषेणलत रोमक आणि विष्णुचंद्रकृत वासिष्ठ हे, आणि सांप्रतचे रोमक आणि वासिष्ट हे एकच असतील असें सहज मनांत येते. आणि त्यास प्रमाणेही सांपडतात. ती अशी की एक तर पंचसिद्धांतिकोक्त रोमक आणि वासिष्ठ आणि सांप्रतचे रोमक आणि वासिष्ठ यांखेरीज तिसऱ्या प्रकारचे रोमक आणि वासिष्ठ पूर्वी कधी होते असे प्रमाण नाही. सांप्रतही तसे उपलब्ध नाहीत. दुसरें असें की श्रीषेणाने आपला रोमकसिद्धांत आणि विष्णुचंद्राने आपला वासिष्ठसिद्धांत कोणत्या आधाराने केला त्यासंबंधे ब्रह्मगुप्ताच्या ३ आर्या वर दिल्या आहेत (पृ. १५५) त्यांवरून दिसते की ते दोन्ही एकाच प्रकारचे असावे. म्हणजे त्यांतील भगणादि माने एकच असावी. तिसरे असे की, ब्रह्मगुप्त म्हणतो की विष्णुचंद्राने दुसरा वसिष्ठसिद्धांत केला. सांप्रतच्या वसिष्ठसिद्धांतांत (काशी एथे छापलेल्या प्रतीत ) पुढील *श्लोक आहे: इत्थं मांडव्य संक्षेपादुक्तं शास्त्रं मयोदितं ॥ विस्तृतिविष्णुचंद्रायैर्भविष्यात युगेयुगे ॥ ८ ॥ हे वसिष्ठाचे मांडव्यास बोलणे आहे. यावरून विष्णुचंद्राचा याशी संबंध आहे हे उघड आहे. विष्णुचंद्राचें नांव कांहीं पर्यायाने आणिलें आहे. यावरून साक्षात् विष्णुचंद्राने जो केला तोच हा नसला तर विष्णुचंद्राची मानें घेऊन कोणी तरी हा केला असें स्पष्ट दिसते. रोमकसिद्धांतासंबंधे ब्रह्मगुप्ताच्या आर्या वर दिल्या आहेत, त्यांत लाट, वसिष्ठ, विजयनंदी यांच्या आधाराने रोमक केला असे म्हटले आहे; आणि सांप्रतच्या रोमकसिद्धांतांत आरंभीं असें वाक्य आहे :वसिष्ठो रोमशमुनिः कालज्ञानाय तत्वतः ॥ उपचासं ब्रह्मचर्यं प्रागेकं विष्णतत्परौ ।। २ ।। वसिष्ठसदभिप्रायं ज्ञात्वाषि मधुसूदनः ।। अर्पयामास तत्सिध्यै तावच्छास्त्रार्थपारगः ॥ ३ ॥ उभाभ्यां तोषितो विष्णुर्योगोयं तन्मुखद्वयात् ॥ उच्चारयामास... यांत कांहीं अशुद्धे आहेत तरी ह्या सांप्रतच्या रोमकसिद्धांताशी रोमक आणि वसिष्ठ ह्या दोघांचा संबंध आहे असें ह्या श्लोकावरून दिसते. ब्रह्मगुप्ताच्या वेळच्या रोमकसिद्धांतास वसिष्ठाचा आधार होताच. यावरून ब्रह्मगुप्ताच्या वेळचे श्रीषणरुत रोमक आणि विष्णुचंद्रकृत वासिष्ठ हे सिद्धांत आणि सांप्रतचे रोमश आणि वासिष्ठसिद्धांत एकच असें अनुमान निघतें. सांप्रतच्या रोमशसिद्धांतांत श्रीषेणाचें नांव नाही आणि सिद्धांताचें नांव कायम आहे, तरी रोमश हा एक मुनि कल्पिला आहे. त्यावरून श्रीषणरुत रोमकाहून सांप्रतच्या रोमकाची शब्दरचना कदाचित् भिन्न असेल असा संभव आहे. परंतु दोहोंतील भणगादि माने एकच असली पाहिजेत. सांप्रतचे सोम, रोमश, वासिष्ठ, यांशी सर्वांशी सदृश किंवा भगणादि मानांनी *डे. का. संग्रहांतील पुस्तकांतही हा श्लोक आहे, परंतु त्यांत उत्तरार्धाचा आरंभ "विस्मतिबेञ्च चंद्रायैः " असा आहे, परंतु ही चूक दिसते. “रोमश" याबहल “ लोमश" " सदभिप्राय " याबद्दल " तदभि" असे पाठ आढळतात. सिद्धांताचें नांवही रोमक किंवा रोमश असें दोन प्रकारचे आढळतें.. ॥४ ॥