पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७४) ग्रंथकारांनी ग्रहांस बीजसंस्कार* दिले ते दोन प्रकारांनी दिले असतील, असा संभव आहे. एक प्रकार ग्रहांची नक्षत्रांशी होणारी युति पाहून बीजसंस्कार दिला असेल आणि दुसरा प्रकार नलिकावेध घेऊन त्यावरून दिला असेल. आमच्या ग्रंथांचे वर्ष निरयनमानाच्या वर्षाच्या जवळ आहे, परंतु ते सुमारे ८ पळे जास्त आहे. यामुळे नक्षत्रांच्या भोगांत उत्तरोत्तर चूक पडत आहे. सांप्रत ती चूक सुमारे ४॥ अंश झाली आहे. (पटवर्धनी पंचांग आणि इतर निरयन पंचांगें यांत फरक आहे तो यामुळेच ). म्हणून युतीवरून जर बीजसंस्कार दिला असेल तर स्वतः ज्या तारेशी युति झाली तिचेंच स्थान चुकीचे असल्यामुळे बीज चुकण्याचा संभव आहे. अर्थात् त्यावरून काढलेला ग्रंथरचनाकाल चुकणार. दुसरा प्रकार स्वतः ग्रहांचा नलिकावेध घेणे. ह्या वेधाच्या ज्या रीति आहेत त्यांत ग्रह सायन करावा लागतो. आणि संपातगति थोडी चुकीची आहे तरी ग्रह किंवा सूर्य संपातीं येण्याचा काल फारसा चुकीचा नाही, यामुळे बीज फारसें चुकण्याचा संभव नाहीं. ह्मणून तशा रीतीने काढलेल्या बीजावरून बेंटलीने काढल्याप्रमाणे केवलमूर्यसंबंधानें ग्रहाच्या चुकीवरून ग्रंथरचनाकाल काढला तरी चालेल. परंतु संपातीं सूर्य येण्याचा आमच्या ग्रंथाचा काल थोडासा चुकीचा आहेच. यामुळे, आणि वेध ज्या मानाने स्थूल असतील त्या मानानें बीज चुकल्यामुळे, त्यावरून काढलेला ग्रंथरचनाकाल चुकेल. तिसरी गोष्ट अशी की, बेंटलीची रीति बरोबर आहे अशी कल्पना केली तरी तीवरून ज्या ग्रंथाचा काल काढणे त्या ग्रंथकाराने स्वतः वेध घेऊन ग्रहगतिस्थिति दिली असेल तर त्यास बेंटलीची रीति लागू करणे योग्य होईल. परंतु त्या ग्रंथकाराने दुसऱ्या ग्रंथांतले ग्रह जसेच्या तसेच घेतले असतील तर त्यास ती रीति लागू करून उपयोग नाही. भास्कराचार्याच्या ग्रंथांत बीजसंस्कार आहे तो बाजूस ठेविला तर त्याच्या आणि ब्रह्मगताच्या सिद्धांतांतील भगणादि माने अगदी एक आहेत. यामुळे बेंटलीच्या रीतीनें दोहोंचा काल एकच निघणार. आणि वस्तुतः ब्रह्मगुप्तसिद्धांताच्या मागून ५२२ वर्षांनी भास्कराचार्यांचा शिरोमाण झाला. बीजसंस्कार भास्कराचार्यांच्या ग्रंथांत आहे तोच शके ९६४ मध्ये झालेल्या राजमृगांकग्रंथांत आहे. (याविषयी जास्त विवेचन पुढे येईल.) तेव्हां राजमृगांक (शके ९६४), सिद्धांतशिरोमणि (शके १०७२) किंवा करणकुतूहल (शके ११०५) यांचा काल बेंटलीच्या रीतीने एकच येणार. बेंटलीच्या रीतीने काढलेले काल आणि वास्तविक काल यांची तुलना केली असतांही बेंटलीची रीति निरुपयोगी ठरते. ती रीति मी पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांत आणि पहिला आर्यसिद्धांत यांस लागू करून पाहिली. त्यावरून असे निघतें: पंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांताचा प्रथमार्यसिद्धांताचा ग्रह ग्रह कधीं शुद्ध ते वर्ष. कधी शुद्ध तें वर्ष. शक शक ५२० ४६० चंद्रोच्च ४८२ ४८२ * एखाद्या सिद्धांताचा ग्रह वेधास मिळेनासा झाला तर त्या ग्रंथावरून निघणाऱ्या ग्रहांच्या गतिस्थितीस काही संस्कार देण्याचे ठरवितात. ह्या संस्कारास बीज म्हणतात. चंद्र