पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१७३) पडेल असे नाही. एका विवक्षित स्थितीत दोहोंचे मध्यमग्रह सारखे असतां दोहों चे स्पष्टग्रहही सारखेच आले तर दुसन्या एका स्थितीत ते भिन्न येतील. उदाहरणार्थ, सिंहराशीचा स्पष्टशनि असतां दोहोंचे मध्यम व स्पष्ट सारखे आले तर वृश्चिकराशीचा शनि असतां सारखेच येतील असे नाही. याप्रमाणे फलसंस्कारमानाचा भिन्नपणा आणि फलसंस्कार काढण्याच्या रीतीचा भिन्नपणा यामुळे दोहों ग्रंथांच्या फलांमध्ये कोणत्याही वेळी थोडे अंतर असले तरी त्यामुळे रचनाकाल ठरवावयाचा त्यांत कांहीं शतकांचा फरक पडेल. उदाहरणार्थ, बेंटलीने काढल्याप्रमाणे सांप्रतच्या सूर्यसिद्धांताच्या ग्रहांत खाली लिहिल्या चुका खाली लिहिल्या वर्षी होत्या. इ. स. ५३८ इ. स. १०९१ बिनचुक वर्ष इ. स. अं. क. वि. अं. क. वि. *चंद्र - १८ ३० - ११ १ ०९७ मंगळ + २२६ ३० +०५८ २९१४५८ गुरु - १ २ ४७ + ० ४१ १४ शनि + ५० १० -१ ४ २५ ८८७ यावरून दिसते की इ. स. ५३८ मध्ये मंगळाची चूक सुमारे २॥ अंश होती आणि इतरांची २ अंशांहून कमी होती. चंद्राची तर फारच थोडी होती. हे सर्व ग्रह त्या वेळच्या एका भगणामध्ये केव्हां तरी स्पष्टमानाने युरोपियन कोष्टकांवरून निघणान्या स्पष्टयहांइतके येण्याचा झणजे बिनचुक असण्याचा संभव आहे. आणि याप्रमाणे इ. स. ५३८ च्या सुमारास दहापांच वर्षांत सूर्यसिद्धांताची ग्रह युरोपियन ग्रहांशी मिळाले म्हणजे मूर्यसिद्धांत इ. स. ५३८ च्या सुमारास झाला असे म्हणतां येईल. भारतीयांचे मूलग्रंथ किंवा त्यांस जे संस्कार झाले ते निदान २५।३० वर्षांच्या अनुभवाने झाले असले पाहिजेत. आणि इतक्या कालांत कोणत्या दिवशी त्यांनी कोणत्या ग्रहांचे वेध कसे घेतले असतील हे समजण्यास कांहींच साधन नाही. ह्मणून बेंटलीच्या ह्या रीतीनें ग्रंथरचनाकाल ठरविणे निर्दोष नाही. प्रो. व्हिटने याने बॅटलीच्या रीतीचे काही दोष दाखविले आहेत; परंतु वरील महत्वाचा व मुख्य दोष दाखविला नाही. स्वतः बेंटलीने साधकबाधक गोष्टींचा विचार केला आहे, परंतु या आक्षेपाचा विचार त्याने केला नाही. आणखी असें की बेंटलीनें भारतीय आणि युरोपियन ग्रंहांची तुलना करतांना सर्व ग्रहांचें सूर्यापासून अंतर मात्र काढले आहे. परंतु आमच्या ग्रंथांचे निरयन वर्षमान किंचित् चुकीचे असल्यामुळे स्वतः सूर्याच्या स्थितीमध्ये भारतीय ग्रंथांत जी चूक आहे तिचा विचार केला नाही. तिचा विचार केला तर सूर्यसिद्धांताचा सूर्य इ.स. २५० या वर्षी शुद्ध होता असें प्रो. व्हिटनी याने दाखविले आहे. आमच्या “युरोपियन कोष्टकांप्रमाणे ग्रह असावा त्यापेक्षा सूर्यसिद्धांताने जास्त येतो,तेव्हां+ (धन),आणि कमी( मार्गे) येतो तेथे - (ऋण) चिन्ह केले आहे. बुधशक्रांची चूक इ. स. ५३८ मध्ये ३ अंशांहून जास्त होती म्हणून ते एथे दिले नाहीत. + दहापांच किंवा कदाचित् ३० वर्षांत निरनिराळ्या दिवशींचे सर्व ग्रहांचे दोनही ग्रंथांवरून गणित करून दोहींचे ग्रह अमुक दिवशी मिळतात हे दाखविता येईल, अशी माझी खात्री आहे. परंतु तें गणित करण्यास श्रम व वेळ फार लागेल, ह्मणून ते केले नाही.